Tuesday, July 9, 2019

I & रहमान (18th ऑगस्ट २०१९ , मुंबई, १०.३० pm)



मित्रहो, गेल्या quarter मध्ये commit केल्या प्रमाणे पुढचा ट्रॅव्हल ब्लॉग पब्लिश करत आहे. एअरपोर्ट वर सगळे formalities आणि checks करून फ्लाईट ची वाट बघतोय.पण फ्लाईट delayed आहे हे काही वेळापूर्वी कळलं. middle east मधले tensions हे reason दिलंय.  खरंतर ब्लॉग मी 'actual ' ट्रॅव्हल करून आलो कि फोटो सहित अपलोड करतो. पण आज थोडं वेगळं करूयात म्हणलं  .

माझ्या ह्या ट्रॅव्हल ट्रिप बद्दल ची तुमची उत्सुकता बघून आनंद झालाच पण excitement पण वाढली. आत्तापर्यंत गेले वर्ष प्रत्येक quarter ला वीक कोडींग पासून रजा घेऊन मी भारतातले काही, तर परदेशातले काही जागा सोलो ट्रिप करत आलोय.घेऊन  १६ देश, ४३ शहरं to be precise . and my  passion  to  explore  journeys  is  growing . ते experiences share केले आणि तुमचे कंमेंट्स आणि following बघून पुढच्या पण काही ट्रिप्स ठरवल्या. हि croatia ची ट्रिप तशीच प्लॅन केली आहे.
#GoT फॅन्स :)

फ्लाईट उशिरा आहे त्यामुळे as usual कुठली तरी वेब सिरीज बघणार इतक्यात काही मंडळी अचानक येऊन नाचायला लागली. फ्लॅशमोब आहे हे रजिस्टर व्हायला - मिनिटं लागली खरी पण पहिली reaction काहीतरी security breach झाल्याची होती. असो तर इंडिपेन्डेन्स डे निमित्त 'रंग दे बसंती ' गाण्यावर कमाल नाचले. काय energy होती. interestingly काही ट्रॅव्हलर्स आपणहून जॉईन झाले. वातावरणात एकदम चैतन्य पसरलं.

इन्स्टा वर विडिओ पोस्ट केल्यावर लगेचच तुमचे लाईक्स , कंमेंट्स आले. एक इंटरेस्टिंग कमेंट आली- 'आदित्य , तुझ्या सोलो ट्रिप मध्ये तुझे साथीदार कोण होते ?'
सोलो ट्रिप मध्ये साथीदार ?i was bit confused . कारण लोकं म्हणाल तर ज्या ठिकाणी गेलो तिथे जी लोक भेटली ती त्या दिवसांसाठीच. गॅजेट्स म्हणाल तर फोन आणि कॅमेरा सोडला तर काही नाही. पण हा फ्लॅशमोब बघितला आणि लक्खकन प्रकाश पडला. एक व्यक्ती माझ्यासोबत ह्या सगळ्या ट्रिप मध्ये होती ती म्हणजे रहमान !

म्हणूनच हा ब्लॉग before ट्रॅव्हल चा प्रपंच.इतके दिवस जागा, तिथली माणसं, एक्सपेरियन्सस,adventures लिहिलं पण ज्यांच्यासोबत ते सगळं अनुभवलं ते कधी एक्सप्रेस केलं नाही.
we all know रहमान त्यामुळे त्याचं biography etc मी सांगणार नाहीये. तरी पण ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी हि विकी लिंक.(https://en.wikipedia.org/wiki/A._R._Rahman )

गेली वर्ष तो माझासोबत सोलो ट्रिप ला होताच पण त्याही आधी गेली २५ वर्ष आम्ही एकत्रच होतो. मी १० वर्षांचा होतो तेव्हा रोजा आला होता. (टेक्स्ट- रोजा १५ ऑगस्ट १९९२ ला तामिळ मध्ये release  झाला होता )

<गाणी- रोजा + तामिळ >

आमच्या बिल्डिंग मध्ये गौरव दादा राहायचा त्याच्या कडे सोनी चा walkman होता.त्याचं कडून ओळख झाली रहमान ची. - मिनटात तो किंवा अजून कोणीतरी हेडफोन काढून घ्यायचा त्यामुळे संपूर्ण गाणं तेव्हा ऐकलंच नाही. फिलिप्स टॉप १० मध्ये - नंबर वर रोजा ची गाणी असायची ती सुद्धा अर्धवट ऐकायचो. तेव्हा रोजा theatre मध्ये पहिला नाही पण नंतर एका फेस्टिवल मध्ये रोजा दाखवला होता तेव्हा बघितला!

 - वर्षांनी पुन्हा १५ ऑगस्ट ला DD1 वर तो tv वर बघितला . तेव्हा सुद्धा फार काही भारी वाटलं नव्हतं. खरी मजा आली ते शाळेत असताना मुक्काला मुकाबला गाणं बघताना. ते गाणं अजूनही त्या whitewalker सारखं डान्स करणाऱ्या प्रभू देवा पण फक्त त्याचे नाचणारे कपडे लक्षात राहिलंय.

पण खरी किक बसली जेव्हा बॉम्बे मी theatre मध्ये बघितला.

<गाणं - केहना हि / तू हि रे / हम्मा हम्मा +AV मणी रत्नम + सिनेमा visual +  बॉम्बे थिम)

शेवटी बॉम्बे थिम वर ती मुलं सापडतात आणि लोकं एकमेकांचा हाथ धरतात त्यावेळी मी आईचा हाथ घट्ट पकडला होता. त्या काळोखात ते टिंग-टिंग आवाज, ती बासरी आणि आई ने ठेवलेला तो डोक्यावर हाथ. कित्येक वर्ष मला हाथ सुटल्याची स्वप्न पडायची. मी आजही बॉम्बे थिम अव्हॉइड करतो.
कदाचित यात मणी रत्नम चा काँट्रीब्युशन जास्त आहे. त्या visuals वर थे मुसिक अजून अंगावर येत किंवा कदाचित त्या music मुळे ते visuals चा इम्पॅक्ट जास्त होतो. they really complement each other . आणि ते त्याच्या पुढच्या movies मध्ये कायम दिसत आला.

<गाणं -- दिलसे + chaiya chaiya >

मला कायम प्रश्न पडतो कि कसा - लोकांचा ट्युनिंग एवढा परफेक्ट जमत असेल? जॉनी ive आणि स्टिव्ह जॉब्स बघा..प्रत्येक प्रॉडक्ट कसा भारी असू शकतं ? हे मेंटॉरशिप भानगड नक्की काय आहे हे जाणून घ्यायचाय मला. दोघांना आपापल्या कामाबद्दल असलेली clarity हे त्यामागचा कारण असू शकेल . किंवा मग genuinely पडलेले प्रश्न आणि quest to fulfill देम .त्यातून कोणी मेंटॉर life मध्ये येत असेल.

मी वर्ष US ला असताना आमच्या ऑफिस मध्ये mentor-mentee प्रोग्रॅम होता. इंटर्नशिप ला आलेले bright young  किड्स.  interns per manager  .लकी किड्स. त्यातला एक पुण्यातून आलाय. माझ्याच कॉलेज चा आहे.  खूपच क्लिअर आहे नक्की काय करायचंय. इतका exposure  मिळतंय कि decision making सोप्पं झालंय. मी त्याला full time job  ऑफर केलं इथे बे एरिया मध्ये. मला म्हणाला कि "सर मी फक्त चेक करायला आलो होतो कि सध्या किती फरक आहे पुण्यात आणि इथे. with  technology i dont  think  there  is  any  difference . मी रिटर्न तिकीट काढूनच आलो होतो ". (हसतो ) i envy him 


टेकनॉलॉजि ने खरंच सगळे barriers मोडून टाकले.खरंतर सिनेमा, गाणी, ते आपल्यापर्यंत पोहोचणं हे सगळी त्याच टेकनॉलॉजि ची देण आहे. पण काही musicians  त्याचा वापर केवळ storage , transport पुरता ना ठेवता  क्रीटीव्हिटी मध्ये use केला. RD burman was known for  using new technical instruments . त्याचा वारसा पुढे नेला तो रहमान ने.

<गाणं-१०  रंगीला + राम गोपाल वर्मा AV +११ है रामा >
(टेक्स्ट - रंगीला ची जाहिरात रहमान चा पहिला हिंदी सिनेमा अशी केली होती . दिलवाले दुल्हनिया  ने १९९६ ची सगळी filmfare अवॉर्ड्स जिंकली except music जे रंगीला ला मिळाला. )

गाणं संपत तेव्हा आदित्य बसलाय..
आदित्य- या गाण्याने आणि उर्मिलामुळे मी आठवी ची परीक्षा नापास होता होता राहिलो. नुकताच आमच्या घरात केबल tv आला होता. जिथे लागेल तिथे हे गाणं बघत बसायचो. काय व्हायचा ते माहित नाही. कदाचित ते वयचं तसं होतं. सध्या जे काही असेल ते भडक पणे थेट स्क्रीन वर दिसतं त्यामुळे titillation हे फीलींगचं येत नाही. १० वि नंतर मी बक्षीस म्हणून माझा पहिला CD प्लेअर घेतला . आणि रहमान ची गाणी पूर्ण पणे ऐकायला लागलो . मी तेव्हाच ट्रेकिंग आणि भटकायला जाऊ लागलो सोबत होता तो CD player आणि ठराविक CDs .त्यामुळे तीच गाणी पुन्हा पुन्हा ऐकली जायची बॅटरी संपे पर्यंत. जरा कुठे त्याच्या western music pattern चा अंदाज येत होतं तोवर त्याने पुढचा धक्का दिला .

<गाणं ताल AV +१२ सरफरोशी + १३ लगान>
(टेक्स्ट - ताल आणि लगान मुळे उत्तर भारतीय संगीतावर चा त्याचा अभ्यास आणि वापर थक्क करणारा होतं. he truly became a national level musician ) 

<गाणं नुसरत + १४  ईश्वर अल्ला >


<गाणं १५ वंदे मातरम >  

Thursday, September 14, 2017

काल काळ्या गेला...

काल काळ्या गेला ..काळ्या sucker मासा  होता .. आता  guilt घेऊन  किंवा  वाईट  वाटून  उपयोग  नाही ..
फिश  टॅंक  आणला  त्या  सोबत  तो  आला  होता ..आईला  वाटलं  तो  मेलाय  म्हणून  त्याला  फेकून  देणार  इतक्यात  तो  हलला  ..त्यानंतर  गेले  ३  वर्ष  तो  होता ..
आकर्षण गोल्ड  फिश  होता  पण  काळ्या आपला  इमाने  इतबारे  टॅंक  साफ  करायचा ..गोल्ड  फिश  ची  घाण  खायचा ..आणि  आम्हाला  बरं वाटायचं  कि  त्याला  वेगळा  काही  खायला  द्यावा  लागत  नाही  आणि  मुळात  काही  दिवस  टॅंक  साफ  ना  केल्याने  काही  फरक  पडत  नाही ..काळ्या  आहे  ना ..
हळू  हळू  फिश  टॅंक  ची  excitement कमी  झाली  आणि  आई  वर  सगळी  responsibility अली ..एक एक  करत गोल्ड  फिश  पण गेले ..हा  एकटा  राहिला ..त्यासाठी  फिश  टॅंक  काही  महिने  तसाच  ठेवला  होता  पण  पंप  बंद  पडला  होता  , बल्ब  गेला  होता  पण  काळ्या  ला  काही  लागत  नाही  म्हणून  दुरुस्त  करायचे  कष्ट  घेतले  नाहीत ..
रेवा  आता  उभी  राहायला  लागलीये ..उगा  कुठे  तो  टॅंक  अंगावर  ओढून  घेईल  ह्या  भीतीने  तो  टॅंक  काढायचा  निर्णय  घेतला ..काळ्या  ला  एका  नवीन  कोऱ्या  डस्टबिन  मध्ये  पाणी  घालून टेरेस   वर  ठेवला  आणि  टॅंक  माळ्यावर .

टेरेस वर  ठेवल्यावर एखादा  पक्षी त्याला उचलून नेईल  असा  वाटलं  होता  म्हणून  त्यावर  एक  फळी  ठेवली ..नंतर  ती  काढली ..
हळू  हळू  पाणी  गढूळ  व्हायला  लागला ..आतला  काही  दिसेनासा  झालं ..

एक  दिवस  संध्याकाळी  आल्यावर  आई म्हणाली कि बहुतेक काळ्याला उचलला पक्ष्या ने ..थोडा  वाईट  वाटलं ...
मग  अजून  2-4 दिवसांनी  आई  टेरेस  वर  गेली  आणि  तिचा  धक्का  लागला  डस्ट  बिन  ला  आतून  हालचाल  जाणवली  ..

मला  कळल्यावर  आनंद  झालं ..guilt निघून  गेलं.गणपती  विसर्जनाच्या रात्री अंधारात मी त्या डस्ट  बिन मधलाकाळ गढूळ पाणी काढलं आणि  नवीन  फ्रेश  पाण्यात त्याला सोडला आणि  पुन्हा  टेरेस  वर  ठेवलं..

ऋतिका ने  एक  aquarium  च्या  दुकानात  चौकशी  केली  तर  ते  म्हणले  कि  संभाजी  बागेत  किंवा  ताथवडे  उद्यानात  मासे  घेतात .. मी  हो  म्हणलं  आणि  काही  केलं  नाही .. संभाजी  बागे  समोर  ऑफिस  असून  काही  केलं  नाही  आणि  दर  शनिवारी  रविवारी  ताथवडे  शेजारी  2-3 तास  चहा  प्यायला  बसायचो  तरी  काही केला नाही ...


गेल्या  आठवड्यात  भयंकर  पाऊस  झालं ... एकदा  आला  डोक्यात  कि  गच्चीत  चक्कर  मारावी ...पण  काही  केलं  नाही ..

काल  रात्री  घरी  आलो ..ऋतिका  ला  म्हणलं  कि  मी  आज  linkedin वर  मेलबॉर्न मधले  जॉब  opportunities शोधात  होतो . एकुणातच  मला  ते  शहर  फार  आवडलंय . त्यावर  एक  वाद -चर्चा -संवाद  झालं ...इथली  लोकांपासून लांब जायचं का ? तुला मिसळ कुठे मिळणार?
मी म्हणलं कि फक्त option बघत  होतो  ..कुठलाही  निर्णय  घेतला  नाहीये ..

झोपताना  आई  म्हणाली  आज  काळ्या  खरंच  गेलं ..त्याला  झाडाच्या  कुंडीत  ठेवून  दिलाय  खत  म्हणून . त्याचे  कधी  काही  नखरे  नव्हते , कधी  विशेष  लक्ष  द्यावा  लागला  नाही ..त्याने  काही  डिमांड  केला  नाही ..माझा मलाच राग येत होता..

झोपताना विंदांची कविता वाचत होतो
"कधी  धावतो  विश्व  चुंबावयाला
कधी  आपणाला  स्वहस्तेच  शापी"

रात्री  मला  माझ्या  आजूबाजूची  सगळी  काळी  माणसं  दिसायला  लागली ...

Sunday, March 26, 2017

रविवार सकाळ!

रविवार सकाळ-
(ह्या लेखाचा आणि पु.लंच्या लेखाचा काही संबंध नाही. माझी सकाळ त्यांच्या इतकी समृद्ध आणि सांस्कृतिक नाही पण अगदी सामान्य नक्कीच आहे म्हणून हा घाट !)

माझी सकाळ मुळातच ९.३० ला सुरु झाली.आता ह्याला सकाळ म्हणावी हा वेगळा मुद्दा आहे. असो.आणि त्याचा सगळं श्रेय माझ्या बायकोला आणि मुलीला जातं कारण त्या दोघी माहेरी गेल्यात.त्या असत्या तर कदाचित ५-१० मिन आधी उठलो असता इतकच.

सकाळी उठून हातात चहा , पेपर मध्ये असणाऱ्या त्याच त्याच आणि नकोश्या बातम्या , टीव्ही वर क्रिकेट. तासभर निवांत गेल्यावर सोसायटीची ११ ला मीटिंग आहे हे आठवला (मीच सेक्रेटरी आहे).पण कोणीतरी नोटीसच फाडून टाकली आहे असा कळलं याने एक असुरी आनंद झाला. योगायोग बघा कि मीटिंग घ्यायचा कारण बिल्डिंग मध्ये होणारे काही उपद्रव यासाठी  CCTV  कॅमेरे लावण्याबाबत चर्चा  करणे हे होता.

११ची मीटिंग होत नाहीये म्हणल्यावर आता काय करावे हा मुद्दा होता.तेव्हा आपल्या डोक्यावरची अजून एक जबाबदारी आहे ती कमी करावी हे लक्षात आलं - 'कटींग'

वारजे मधले सगळे सलून ट्राय केले होते आणि सध्या डोक्यात असलेला 'explore' करण्याचा भूत घेऊन कोथरूड च्या दिशेने निघालो.  'पायल मेन्स पार्लर' हि पाटी दिसली.
नाव नक्की काय आहे हे बघण्यासाठी मी थांबलो तर त्या दुकान बाहेर २-३ लोकं होती. गर्दी असेल म्हणून मी निघणार तितक्यात एकाने मला हाथ केला आणि बोलवून घेतले.माझे उभे राहिलेले केस बघून त्याला समजलेला असावा. सारसबागेतल्या पाव भाजी स्टॉल वाल्यांची आठवण अली. तिकडे फिरताना प्रत्येक स्टॉल च्या बाहेर एक माणूस मेनू कार्ड घेऊन आपल्याला जमलं तर आत ओढून न्यायच्या प्रयत्नात असतो.हे तसाच काहीसा होतं.

आत गेल्यावर माझं लक्ष नेहमी टेबल वर ठेवलेल्या मासिकांकडेच जातं . कित्येक वर्ष मी कटिंग ला केवळ त्याच कारणासाठी जातो आणि वेळ काढून जातो. आता ती मासिके बघितल्यावर लक्षात येत कि काही स्वप्न कधीच पूर्ण होणार नसतात. हा विचार आणि हातात मासिक चाळत असतानाच AC ची थंड हवेने अंगावर काटा आला.
मी खुर्ची वर जाऊन बसलो.सगळीकडे L'oreal चे प्रॉडक्ट्स होते, reclining खुर्च्या,चकाचक बेसिन ,२.१ सौउंड सिस्टिम .पुढचा एक तासभर मस्त जाणार याची खात्री होती.
ज्या मनुष्याने मला आत बोलावला तो स्वतः आत आला आणि माझी कटिंग तो करणार होता.त्याने ड्रॉवर मधून एक काळं कापड काढलं आणि माझ्या मानेभोवती बांधला . समोर आरश्यात बघून मी उडालोच. त्या कापडावर एक 'blonde' चा मोठा फोटो होतं. माझी नजर आरशावर खिळून राहिली . मला सेट करून तो मागे वळला आणि तोंडात एक पुडी टाकली, आणि रिमोट ने साऊंड सिस्टिम सुरु केली.
आणि कुमार सानू च्या आवाजात 'हेssss...हेsss' हे स्वर कानावर पडले.
एक्दम २ विरोधाभासी गोष्टी घडल्यामुळे मी भानावर आलो.
"सर ,कशी कटिंग करायची ?"- असा पुडीयुक्त प्रश्न ऐकलं.
"मिडीयम "
"मिडीयम" हा एक विलक्षण शब्द आहे. सांगणारा आणि करणारा दोघेही सेफ असतात.पाणीपुरी कशी हवी- मिडीयम,कटिंग कशी- मिडीयम ,कल्ले कसे ठेऊ- मिडीयम ,अंघोळीला पाणी कसा हवा - मिडीयम , प्यायला पाणी कसा देऊ - मिडीयम.

"वेगळी style करू का?"
"नको"- मी
"अहो मस्त केस वाढलेत.बघा ह्यात " असा म्हणत त्याने मला एक brochure दिला. चित्र विचित्र styles होत्या.सध्या असे बरेच लोकं मी डियो वर ट्रिपल सीट फिरताना बघतो.मी त्यातला नाही हे दाखवण्यासाठी हे कट नकोत.
"करून तर बघा.महिन्याभराचा प्रश्न आहे.हे नको असतील तर विराट कट, अक्की कट ?"
"नको म्हणलं ना"
त्याला सगळं समजला च्या आवेशात त्याने कंगवा ,कात्री घेऊन सुरु केलं. machine वगैरे मारून झाल्यावर त्याने अगदी प्रेमाने डोक्यातून हाथ फिरवला.
"ओके?"
"ओके !"- मी उगाच आरश्यात मान वाळवून म्हणालो.
खरंतर आहे ते केस मी फक्त कमी केले होते. ना त्याला काही वळण होतं ना 'style'. त्याने मागून पण एक आरसा धरला ..मला काही कळत नव्हतं तो काय दाखवतोय पण मी आपला हो बरोबर आहे म्हणून सोडून दिला.

"दाढी,तेल मसाज ?"

"अ..." मोबाईल मध्ये वेळ बघितली. ११.३० . match मध्ये जस्ट लंच झाला असेल सो अजून अर्धा तास आहे.
शेजारी बसलेला अजून एक ग्राहक मस्त चंपी करून घेत होतं. त्याचे बंद झालेले डोळे बघून मला पण राहवलं नाही.

"शेजारी आत्ता हे केलं ना डोक्यला ते करा "( हॉटेल मध्ये पण शेजारच्या टेबल वरचा बघून ऑर्डर करतो )

"तेल कोणता ?"-तो
"तुम्हीच सांगा "-मी
"थंडा थंडा "-तो
l 'oreal च्या बाटल्यांमधून त्याने एक नवरत्न तेलाची बाटली काढली. ती धार त्याने डोक्यावर सोडल्यावर 'अहाहा' झालं.माझे दोन्ही डोळे आपोआप बंद झाले. शंकराने आपला तिसरा डोळा उघडू नये म्हणून शिवलिंगावर गार दूध ओतत असतील असा उगाच मला वाटलं.
हे सगळं सुरु असताना मागची गाणी काही थांबायचं नाव घेईनात. कुमार सानू, मोहम्मद अझीझ, नितीन मुकेश, 'अ-शास्त्रीय' सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल,अलका ताई, कविता काकू यांची सुमधुर प्लेलिस्ट सुरु होती." तुझे ना देखू तो चैन मुझे आता नाही है ","पेह्ली पेह्ली बार मोहब्बत कि है", "धीरे धीरे प्यार को बढाना है ", "ना काजरे  कि धार ना मोतीयो कि हार" असे एक से एक गाणी होती.

"कल कॉलेज बंद हो जायेगा  तुम अपने घर को जाओगे" .असा एक काव्याने भरलेले गाणं ऐकल्यावर माझं patience संपला. सकाळीच कवी ग्रेस यांचा आज स्मृतिदिनावरचा लेख वाचून आलो होतो. सांस्कृतिक अध:पतन झाल्यासारखा वाटलं.
मी न राहवून विचारला.
"का हो..हि प्लेलिस्ट तुम्ही स्वतः बनवलेत का?"
"नाही हो आमच्या गावाकडे readymade  CD मिळतात."
"कुठला गाव ?"
हे ऐकल्यावर त्याने पुडी ची पिंक बेसिन मध्ये मारली आणि पाणी सोडला.
"उस्मानाबाद . एकदम relaxe  वाटतं ना ऐकताना ?"
त्याचा उत्साहित आवाज आणि डोळ्यातील चमक बघून मी हो म्हणालो.
त्याने अजून उत्साहात चंपी सुरु केली.
मान वाळवून कडकड मोडली. अक्षय कुमार च्या खिलाडी सिनेमाची आठवण आली.मग त्याने माझं कान टॉवेल मध्ये धरून मोडून दाखवला तेव्हा मला सरफरोश मधल्या त्या शेळी सारखा वाटलं जिचा कान गुल्फम हसन ने कापला होतं.
मी आधारासाठी काही तरी शोधात होतो तेव्हा आरश्यात मागे स्वामी समर्थांचा फोटो आणि वाक्य दिसला.
"भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे" आता हे वाक्य मला भिऊ नको म्हणून होतं कि माझ्या पाठी मागे सगळे प्रयोग करणाऱ्या त्या कटिंग वाल्याचा होतं हे कळेनासा झालं.
मी फारसा विचार करणं सोडून दिला.

१० मिनिटांनी मला जाग आली. एका ग्लानीत होतो मी. आणि serene वाटत होतं.

त्याचा निरोप घेऊन घरी आलो.
दुपार झालीये. डोक्यात शांतता आहे..दर महिन्याला मी कटिंग करतो पण एखादा काम उरकल्यासारखा. पण ते इतका छान असू शकता असा वाटलं नव्हता. आपला डोकं एखाद्या माणसाच्या हातात द्यावा आणि निश्चिन्त व्हावा.म्हणलं तर किती विरोधाभासाच्या गोष्टी होत्या पण तरीही तिथून बाहेर पडताना 'relaxed ' होतो.

हेअर कंडिशनिंग सारखा brain unconditioning काही निघाला तर फार बरं होईल.
निदान मी वेगळी हेअर style तरी ट्राय करेन.मध्ये इन्व्हेस्टमेंट च्या एका सेमिनार ला एक जण म्हणाले होते कि सध्या आपण 'community ' मध्ये राहतो 'crowd ' मध्ये नाही. आणि crowd  इस रिऍलिटी. त्या दुकानात जे मी बघत होतो ते म्हणजे रिऍलिटी आणि virtual रिऍलिटी मधला फरक होता. रिऍलिटी shows च्या गोंधळात थोडा रिऍलिटी चेक दिसला इतकाच .IT मध्ये नोकरी करत असल्यामुळे US कडे लक्ष आहे पण USmanabad मध्ये काय चाललंय ह्याचा काहीच अंदाज नाहीये.

असो रविवार सकाळ इतकी वैचारिक गेल्यानंतर निदान दुपार सत्कारणी लावतोय . कलकत्ता सादा पान , चमन चटणी युक्त पुडी मुखात सरकवली आहे , रेडिओ वर 'nostalgic nineties ' ऐकत डोळे बंद होतायेत.

खास  तुमच्यासाठी  काही  एपिक  गाणी !
https://www.youtube.com/watch?v=guxbAb6p81Y
https://www.youtube.com/watch?v=cJf1pzCnBx4
https://www.youtube.com/watch?v=Y2n-SuONw7E
https://www.youtube.com/results?search_query=dil+jigar+nazar+kya+hai

Saturday, October 22, 2016

'वारीच्या निमित्ताने...'


रेवा गेल्या आठवड्यात सव्वा महिन्याची झाली. डॉक्टर विझिट व्यतिरिक्त कुठे बाहेर पडलो नव्हतो . आता 'एन्जॉय' करण्यासाठी कुठे बाहेर जायचं  म्हणल्यावर माझ्यातला सजग,सांस्कृतिक जबाबदारी असलेला 'बाप' जागा झाला.नुकतंच सुरु झालेल्या 'वारी- बुक कॅफे अँड क्रिएटिव्ह स्पेस ' मध्ये जायचं  ठरलं. आत गेल्यावर तिथली लोक आपल्याकडे कौतुकाने बघतील असं वाटलं पण तास काही झालं नाही. फारशी गर्दी नव्हती आणि मधोमध असलेली उश्या, लोड ची जागा रिकामी होती. तिथे आम्ही रेवा ला घेऊन बसलो. माझी बायको ऋतिका रेवा शेजारी बसली आणि मी त्या स्पेस मध्ये चक्कर मारू लागलो.काही पुस्तकं बघून , 'हि आपल्याकडच्या कलेक्शन मध्ये आहेत' असा विचार मनात सुरु असतानाच ऋतिका  ने 'अरे हा फोटो कोणाचाय असा माझा इगो सुखावणारा प्रश्न विचारला.'जिदडु (जे) कृष्णामूर्थी ' असं उत्तर दिलं.
मी एक पुस्तक घेऊन बसलो आणि ऋतिका फेरी मारायला गेली.अधून मधून कॉफी मशीन चे आवाज येत होते. आता मस्त कॉफी पियूआत असं म्हणेपर्यंत रेवा च्या विशेष कार्यक्रमाचा गडगडाट झाला. आम्ही लगेच सतर्क पालकांसारखे तिथून बाहेर पडलो आणि परत आत आलोच नाही.

ना आम्ही तिथे काही वाचलं, ना कॉफी घेतली,ना अर्ध्या तासापेक्षा जास्त बसलो, ना #Revafirstvisit असं टॅग केलं , ना feeling blissful असं चेक इन केलं. पण तरीही तिथून बाहेर पडताना एक 'sigh of relief ' घेऊन बाहेर पडलो.

15 सप्टेंबर च्या जवळपास बाळ येणार हे कळताच आनंदसोबत ऐन गणपतीत ट्रॅफिक आणि आवाजाचं काय करायचा हा प्रश्न पडला होता. मृत्यू नंतर माणसाची 'बॉडी' होण्यात जसा वेळ लागत नाही तसंच पोटातून बाळ बाहेर आल्यावर जबाबदारीची जाणीव व्हायला देखील वेळ लागत नाही.बाळाला हातात घेतल्या क्षणापासून गोष्टी वेगळ्या दिसायला लागतात . वाढणारा ट्रॅफिक, वातावरणातला pollution , DJ चे आवाज.पेपर मध्ये शिक्षक मंत्री काय म्हणले हे देखील नजरेत पडायला लागतं.अशात सतत नेगेटिव्हिटी पोचवणाऱ्या बातम्या नको म्हणून न्यूज चॅनेल पण बंद केले. तरी आजूबाजूला लागणारे फ्लेक्स, ट्रिपल सीट होंडा डियो वरून प्यां प्यां  करत जाणारी पोरं, रखडलेला फ्लाय ओव्हर , मोर्चे , संप जाणवत राहतात.सध्या पुण्यात चिमण्या जाऊन आजार पसरवणारे आणि कसलाही उपयोग नसणारे कबुतरं वाढतायेत हे त्याचाच लक्षण आहे . एकी कडे नुसता संघर्ष दिसतोय काहीतरी मिळवण्यासाठी तर दुसरीकडे 'एन्जॉय' करणारे गट . सतत भरलेली हॉटेल,शॉपिंग फेस्टिवल, वाढदिवस, 4 दिवस चालणारे लग्न समारंभ. मध्ये एका वाढदिवसाला गेलो होतो तिकडे एक इव्हेंट मॅनेजर आला होता. 'hey  people  we are here to enjoy ' हे एकच वाक्य तो सारखं म्हणत होता.शेक्सपिअर म्हणाला होता ' life is a stage ', मध्यंतरी 'life is a race ' अशी भावना होती आता एकुणात 'life is  an event'  अशी म्हणायची वेळ आलीये. TV  वर सतत कुठला तरी सोहळा त्याचे  डोळ्यात जाणारे LED , निऑन रंगांचे कपडे-accesesories , ओरडून बोलणारी लोकं , वाजणारे DJ  .कुमार गंधर्वांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं 'फार noise वाढतोय सध्या ' ते सतत आठवत राहतं.
मला स्वतःला हे बोम्बार्डमेंट आणि बटबटीतपणाने  गुदमरल्यासारखं होतं.
हे सगळं सुरु असताना त्या वारीतल्या अर्ध्या तासाने असं काय दिलं कि जे दिलासा देणारा होतं?
 तिथे खूप पुस्तकं होती पण दाटीवाटी करून न ठेवलेली , लोड ,उश्या, चटया , टेबलं, खुर्च्या असं हवं तसं बसायची मुभा असलेली जागा होती. दिव्यांचं हि तसंच, हँगिंग लॅम्प्स मध्ये पिवळे दिवे, tubelight पण डोळ्यात ना जाणारा प्रकाश.सर्व्ह करणारी मंडळी होती पण ऑर्डर घ्यायची घाई नव्हती. कुठेही 'पॅटर्न' नव्हता.अघळ पघळ पण एक cozyness होतं.
मी इकडे सारखा येईन असं 'मोठ्यांदा' ठरवलंय पण खरंच किती वेळा येईन माहित नाही.
वारी म्हणजे प्रवाह चा एक रूप. पण हि वारी कोथरूडच्या मॅकडोनाल्ड culture च्या 180 डिग्री opposite  एक 'ठेहराव' देणारी वास्तु आहे .
" एक दिवा जपायचा तर आयुष्य पुरत नाहीये मला आणि इथे तर झुम्बरेच्या झुंबरे शोभेला लावण्याची अहमहमिका सुरु आहे ".कवी ग्रेस यांच्या ओळींचा प्रत्यय वारी ने दिलाय.
वारी ने हे दिवा लावायचं काम केलं आहे ..ह्यापेक्षा ह्या समाजाला आणि एका बापाला दिवाळी ची दुसरीकाय भेट असू शकते.

एक वारकरी.

Sunday, November 1, 2015

My experiments with Gandhi - 1

गांधी ह्या व्यक्तीबद्दल ओळखीच्या लोकांकडून कायमच negative ऐकलं आहे.कळत-नकळत पणे 'टकल्या','म्हातारा' असा बिनधास्त पणे उल्लेख घरच्यांसमोर केला जात होता आणि त्यावर कधीच बंदी नव्हती...कशी त्यांनी फाळणीला मंजुरी दिली..त्यामुळे कसा पाकिस्तान निर्माण झाला आणि आपल्याला त्रास झाला..शाळेत असताना पाकिस्तान चा त्रास म्हणजे सैइद अन्वर ! तेव्हा उगाचच हिटलर भारी वाटत होता..उगाचच ह्यासाठी कारण एका धड्यात त्याच्याबद्दल ची माहिती होती आणि इंग्लंडचा शत्रू तो आपला हिरो...नंतर college ,नोकरी च्या धावपळीत गांधी हा माणूस कायमच ignore झाला.. २००६ मध्ये 'लगे रहो मुन्नाभाई ' सिनेमा आला पण impact 'रंग दे बसंती ' चा झाला.. आता तिशीत एन्ट्री मारताना जिथे routine  आणि life सेट आहे..पण निर्णय घेणे वाढले आहे तिथे समाज,स्वार्थ ह्या गोष्टी हळू हळू कळू लागलेत..अश्यावेळी प्रत्येक ठिकाणी आपला अनुभव पुरेलंच असा नाही..त्यासोबत एकाच शहरात,locality मध्ये कायम राहत असल्या मुळे हळू हळू लोकांचं, system मधले flaws किंवा सवयींमुळे चीड चीड होते ..त्यातून बाहेरच्या देशांचा exposure मिळत असल्याने चांगल्या गोष्टी नेहमीच डोळ्यात भरतात आणि लक्षात राहतात.हे बदलायला पाहिजे हे खरच वाटत असता पण 'जाऊदे', 'चलता है ' attitude मुळे ignore केला गेला..काही बाबतीत भीती पण होतीच esp लोकल गुंठा मंत्री  आणि त्यांचे चेले किंवा 'अरे' ला 'का रे' करणार्यांची ..हे रोज पाहून राग यायचा , ते आत धुमसत राहायचं आणि इतर लोकांवर बाहेर पडायचं..ह्या रागाचं मनातल्या हिंसेत रुपांतर होऊ लागलं..धमक नसल्यामुळे कृतीत ती उतरली नाही..त्याच दरम्यान विनोबांचा एक वाक्य वाचला ' मनात हिंसा केली तर ती प्रत्यक्षात केल्यासारखीच आहे..'सुदैवाने हे वाक्य मनातून पुसलं नाही गेला..हे सगळे विचार चालू असताना 'schindlers list ' हा सिनेमा आणि 'Game of  thrones ' बघितले..त्यातली हिंसा नाही बघवली .माणूस हा evolved प्राणी आहे तर मग हि पशुता अजूनही का overpower  करते ?  वि .स खांडेकरांनी  लिहिलंय   कि 'गांधी ने माणसातला  पशुत्व  कमी करण्यास मदत  केली.'
हिंसेच्या backdrop वर अहिंसे चा शोध घ्यायला लागलो..आणि गांधी ह्या माणसाबद्दल कुतूहल वाढला..consciously त्यांच्याबद्दल वाचू लागलो..त्यांची political philosophy पेक्षा way  of  life  वर focus करू लागलो..गांधी 'वाचून' काही कळत नव्हता..बुक शेल्फ मधल्या पुस्तकांचा count  आणि २-४ quotes पलीकडे काही value  addition  झाली नाही..मग ठरवलं छोटे प्रयोग करून बघायचे..गेल्या ६ महिन्यात ३ प्रयोग केले आहेत..त्यातला एक प्रयोग आणि त्याचे result मांडत आहे ...

प्रयोग १:
माझं रोज bike driving असता आणि बऱ्यापैकी  कॅब मधून फिरतो  ..वाहन  चालवताना  थुंकणारी  माणसे  - हे बघून  होणारी  चीड चीड मी  explain करायची  गरज नाही..हि कृती करणारी सगळ्या क्लास/इकॉनॉमिक status ची लोकं आहेत

उपाय १ - 'अरे  काय..बापाचा रस्ता आहे का ?'
उत्तर - तुझ्या बापाचा आहे का?
category - अरे ला का रे !
result - 0 badal ...मला झालेला मनस्ताप .आणि त्याने आपलं न ऐकल्याने hurt  झालेला 'इगो'

उपाय २- 'काय मस्त थुंकलात हो तुम्ही !'
उत्तर- अए चल निघ ....
category - ignore करणारे
result - 0 बदल  ...मला झालेला मनस्ताप ..आणि त्याने आपलं न ऐकल्याने hurt  झालेला 'इगो'

उपाय ३- थुन्क्ल्यावर tissue काढून देणे..
उत्तर- thanks  !
category - जाणीव झालेले
result - रस्त्यावर  घाण  झालेलीच  आहे..next time कदाचित  तो थुंकणार  नाही अशी  अपेक्षा ..कमी  झालेला त्रास

उपाय ४- थुंकणार आहे असं लक्षात येताच tissue काढून देणे ...किंवा कॅब मध्ये बसतानाच driver ला tissue देणे आणि विनंती करणे ..(5-६ वेळा करून बघितला)
उत्तर- thanks ..नाही थुंकणार..
category - जाणीव आणि जबाबदारीने वागणारे..
result - अपेक्षित बदल..मेंटल पीस ..आणि घडलेला 'constructive' संवाद ..

हा खूपच छोटा प्रयोग मी करून बघितला ..sample size म्हणावा  तसा  मोठा  नाहीये ..पण
माझा  स्वार्थ बघता  मला झालेला कमी त्रास आणि समोरच्या माणसाने केलेला बदल हे महत्वाचा  आहे..ह्यात  कुठेही  आर्थिक  मुद्दे नव्हते..नंतर केलेले  २ प्रयोगांमध्ये  पैसा  ,देणं -घेणं  involved आहे..ते पुढच्या  आठवड्यात  लिहीन ..

आज FB वर दिवसभर हिंसायुक्ता Halloween मुखवटे चे पोस्ट मध्ये हा पोस्ट कदाचित हरवून हि जाइल..पण समोरचा बदल करेलच अशी अपेक्षा न ठेवता त्यांच्यापर्यंत पोचवायचा काम नक्कीच करत राहीन..
शेवटी एक quote मारूच शकतो ' Be the  change  you  want  to see ' महात्मा गांधी-जी

Monday, November 28, 2011

प्रवास ...

घटना अगदी परवाचीच आहे ..मित्राच्या लग्नासाठी मी नाशिक ला चाललो होतो..हैदराबाद ते नाशिक हा प्रवास मनमाड ला ट्रेन बदलून रावा लागतो..संध्याकाळची ची गाडी होती ..१२ तास प्रवास..म्हणून मी पुस्तक सोबत घेतले होती..सध्या मला पुस्तक वाचण्याचा 'भस्म्या' झालाय...(ऑफिस च्या वेळामध्ये सुधा पुस्तक वाचतो)..असो तर सांगायचा मुद्दा हा कि..प्रवासाची जय्यत तयारी करून गेलो होतो.. एखादातरी पुस्तक वाचू.. (choice साठी ३ पुस्तकं सोबत ठेवले होती)..अनिल अवचटांचा " जे दिसेल ते" हे अनुभवपर पुस्तक होता...ट्रेन मध्ये ५.३०लच जाऊन बसलो ..वेळ वाया नको जायला म्हणून लगेच पुस्तकं काढून वाचायला सुरुवात केली..१५ मीन झाली आणि हळू हळू सगळे सह प्रवासी येऊन बसू लागले..सुदैवाने खिडकीची जागा होती त्यामुळे उठावं लागत नव्हता ..पण एक "कुटुंब नियोजनाच्या " सगळ्या नियमांचे उल्लंघन करून जैन / गुजराती/ मारवाडी असा तत्सम दिसणारी लोक येऊन बसली...त्यात ३-४ मुला, नवरा बायको,दीर ,सासू, असे एकुणात ८-९ लोक होती..त्यांना सोडायला येणारे एक गृहस्त जणू काही पुढच्या २ min ट्रेन सुटेल ह्या भीतीने बाहेरूनच बोलत होते..नुसतेच बोलून नाही तर ओरडून बोलत होते..त्यातून ते माझा खिडकीपाशी आले आणि हाथ आत घालून हाथ वारे करू लागले..मी irritate झालो होतो ...i was not able to concentrate..तरी मी लक्ष देऊन वाचू लागलो..(वेळ नव्हता वाया घालवायचा )..त्या कुटुंबातल्या एकाने एक भली मोठी bag माझा बुडाखाली ठेवायचे प्रयत्न चालू केले ...माझे पाय वरती अधांतरी ..हातात पुस्तक(ते काही मी सोडत नव्हतो..."वेळ......") आणि खिडकीतून येणारे त्या इसमाचा हाथ आणि रेल्वे च्या सूचना...अशी सगळी कलकल आजूबाजूला होती..मी एरवीच लवकर चिडतो त्यामुळे ह्या गोष्टींचा मनस्ताप व्हायला फार वेळ लागला नाही..मी डोळे मिटले न पुस्तक बंद केला..

उघडले तर समोर अजून एक म्हातारा प्रवासी येऊन बसला होता..पांढरे शुभ्र केस, पांढरी मिशी,थोडीशी वाढलेली दाढी, t -shirt ,वरती एक निळा jacket .त्याची एकाच bag होती ..बराच घाम आला होता त्याला..हुस्श्ह हूश करत बसला.मला पु.लं च्या पेस्तान्काकांची आठवण आली..म्हणलं " व!!" जर तशी वल्ली असेल प्रवासात तर मजा येईल.आणि आजी-आजोबांचा सहवास कमी लाभल्याने मला खूप आवडता कोणी मोठा भेटला कि . .पण कसला काय .तेवढ्यात एक चहा वाला आला..ह्याने चहा मागवला..५ रुपये झाले..त्याने पाकीट उघडला आणि ५० ची नोट चहा वाल्याला दिली.. चहावाल्याने सुट्टे द्या असा सांगितला..हा म्हातारा नाहीयेत म्हणाला ..माझा समोरच बसलेला कारणाने मला त्याचा पाकीट दिसत होता... जुन्या काळ्या रंगाच्या १० रुपयाच्या ७-८ कोर्या करकरीत नोटा होत्या ..हा अतिशय खवचट म्हातारा असणार अशी माझी खात्री पटली.साफ खोटा बोलत होता तो ."अरे भाई..नाही है छुट्टा..धंदा करते हो तो रखा करो पैसा " खणखणीत आवाज,त्यात एक उत्तर भारतीय पंजाबी जरब जाणवली..सुदैवाने त्या शेजारच्या कुटुंबाने सगळ्यांनी चहा घेतला त्यामुळे सुट्ट्यांचा प्रश्न सुटला...

गाडी सुटली (वेळेवर)..तो खिडकीतला हाथ पण गेला होता..सगळे लोक चहा पिण्यात मग्न होते..मी खुश..आणि माझा पुस्तक काढला..पण माझा आनंद फार वेळ टिकला नाही..शेजारच्या कुटुंबाने प्लास्टिक च्या पिशव्यांचा कारकुर आवाज करत खाण्याच्या विविध गोष्टी काढायला सुरुवात केली...कानांपेक्षा माझ्या नाकाला जास्त त्रास होत होता..शेव,फरसाण,पापड..ह्या गोष्टी नाकात जाऊ लागल्या होत्या..concentrate करण्यासाठी मी एक मोठा श्वास घेतला आणि तो वास अजूनच माझा नाकात गेला..कसा बसा पुस्तक वाचू लागलो..एक पान पण वाचून झाला नव्हता..व्यत्यय आला कि परत पहिल्या पासून सुरु करत होता..( हि सवय कॉलेज पासून आहे..त्यामुळे आमची गाडी पुढे गेलीच नाही )

"किधर जा राहे हो ?" म्हातार्याने त्या कुटुंबाला विचारला.." औ.रन..औ..ग..रन..ग..ब..ग..द..ग.द.द " न कळेल असा सामुहिक उत्तर मिळाला .."बढीया है..मी भी वही जा राहा हु.."..

प्रश्न -उत्तर होऊन सुधा मला घंटा काही कळलं नव्हता.. "औरंगाबाद उतर के अहमेद नगर जाउंगा " म्हातारा बडबडला..मला उत्तर कळला होता..ह्या आनंदात मी पुस्तक डोळ्यासमोरून खाली घेतला तर हा म्हतार माझा अगदी समोर होता..दोन खिडक्यांच्या मध्ये एक फोल्डिंग table असता..ते वरती करून हा त्यावर कोपर टेकवून माझ्या पुस्तकात पाहत होता..मी दचकलोच..

"महाराष्ट्र मै कहा रेहते हो ?" मी वाचत असलेल्या मराठी पुस्तक वरून त्याने बहुदा ओळखला असेल..

"पुणे!" मी...

"पूना मै किधर ?" तो

पूना ऐकून माझा जाज्वल्य अभिमान दुखावला होता .." पुणे मै वारजे मै " मी अभिमानाने

"ये कौनसा area है ? मेरा एक flat है ,खाली पडा है " तो

" कोथरूड से थोडा आगे है..मेन city से ६-७ कि मी " मी ह्याला फारसा काही माहित नसावा आणि कुठे तरी लांब शहर बाहेर एकदा flat असेल असा समजून उत्तर दिला..

"वो बोंब ब्लास्ट कहा हुं था ?"तो..

" german bakery ..कोरेगाव पार्क area है.." त्या ठिकाणी एखादा तरी flat असावा ह्या स्वप्नात मी कायम असतो..

" क्या करते हो ?" तो

" MBA हु.." मी

"यहा कहा पे काम करते हो ?" तो

"Infosys !!!!" मी अभिमानाने..

"MBA होके infosys जैसे चोर कंपनी मै काम करते हो ? " तो..

माझी पार लायकीच काढली होती त्याने ..आणि त्यातून इतके प्रश्न विचारून माझा पुस्तक वाचनाचा प्लान तो हाणून पाडत होता...

आता त्याला उत्तर देणा तर भाग होता..पण काय द्यावा हेच काळात नव्हता..

"हो" म्हणलं तर मी मूर्ख आहे हे सिद्ध करणार होतो नाहीतर कंपनी चोर आहे हे तरी..

म्हणून मी " चोर?" असा उलट प्रश्न त्याला केला..प्रश्नाचा उत्तर येत नसेल तर उलट प्रश्न विचारून मोकळा व्हावा..हे मी शोधून काढलेला उत्तम उपाय आहे..

"चोर नाही तो क्या..क्या बनाते है और क्या बेचते है ये कभी पता हि नाही चालता..सब झूठ है..भेण****" ह्या शिवी मध्ये '' च्या ऐवजी "ण" ऐकला कि माणूस पंजाबी असलाच म्हणून समजा ..

तो बोलत होता त्यात तथ्य होता म्हणा..पण आपणच आपली का मारून घ्या..

"MBA किसमे किया है ? और post क्या है " तो

" मार्केटिंग, consultant हु " मी..

त्याने डोक्याला हाथ मारला..त्यावरूनच त्याला काय म्हणायचा होता ते कळला..

मला ह्या म्हातार्या माणसाबद्दल आदर संपला होता..

"आप क्या करते हो ?"त्याची जिरवावी म्हणून मी त्याला विचारला ..

तो फक्त हसला .." i am an MBA, 1969 pass out in Marketing "

माझी तंतरली होती..शब्दच फुटत नव्हते..

"३० साल Good year tyre मै Sales और मार्केटिंग किया , ८०० रु salary थी १९६९ मै ! चंदिगढ, हैदराबाद, मुंबई,पूना मै घुमता राहा..हर एक शहर मै property बनाई.. पूना मै वो bakery के पीछे के लेन मै ३ BHK flat है ..खाली पडा है..जब कभी जाता हु तो वहा रेहता हु.."

आता मात्र तो म्हातारा च्या ऐवजी ते आजोबा झाले होते ..

"वो बहुत अच्छा area है ..." डोळ्यासमोर ओशो आश्रम आणि ओशाळलेला मी उभे राहिले..

" मार्केटिंग के बंदे हो तो स्लीपर क्लास मै क्यू जा राहे हो.. you should travel in AC.. "

"नही uncle ..थोडा महेंगा होता है..परवडता नही है "

"तुम मराठी लोक यही पे मार खाते हो..you get to know people from higher class,managers ..contacts,networking बढता है..""मैने काफी देखा है..तुम लोग जल्दीsatisfied हो जाते हो..भूक नही राहती कभी..बडे पोस्ट पे एक भी मराठी आदमी नही दिखा.."

"हा uncle ..वोह है..लेकीन we believe in quality of life ..पेट के लिये पैसे कमाव .बाकी आराम करो.."आता हि पळवाट म्हणा किंवा आळस म्हणा ..पण आहे हे असा आहे

" हा ये बात भी सही है.."त्यांना माझा म्हणणं थोडा पटला होता..

"मेरे बेटे को भी इंफोस्य्स ने ऑफर दे थी ७-८ लाख" ..मैने उसे बोला.."भाई बिलकुल नही जन..उसने भी मेरी बात सुनी"..1st attempt मै CA बना..अभी अमेरिकन एक्ष्प्रेस्स मै है..बडा बेत भी C A है..बाद मै ISB से M B A किया..१८ लाख फी थी ...मैने पुरे पैसे भरे..सब white money ..एक भी गलत धंदा नही किया..

"आप भी जो अच्छा लागे वही करना"हे मला म्हणले ..

" हा पता है..लेकीन जब priority बीच मै आती है तो passion पीछे पड जाता है " मी हे उत्तर त्याला आणि परत एकदा मला देत होतो..

"मेरी ३ बेहने है ..२ छोटे भाई ..मै सबसे बडा था..तीनो कि शादी मैने करी..भैयो कि पढाई पुरी कि ..पिताजी का सपना था..अपना खुद का घर हो..जिंदगी भर वो भाडे के घर मै रहे.मैने उनका सपना पुरा किया..घर बनवाय..उनके नाम से..ख़ुशी से आंखे बंद कि उन्होने..उनको गर्व था मुझपर..अब मुझे अपने बेटो पर है..बस अब बहु अच्ची आणि चाहिये..सुना है आजकाल लडकिया बहुत शराब पिती है "१९७० मधून आजोबा २०११ मध्ये आल्याने मला आनंद झाला होता..आजूबाजूला कलकल सुरूच होती पण मी लक्ष देऊन ते काय म्हणतात हे ऐकत होतो..

येणाऱ्या सुना ह्याचा खूप जास्त tension घेतला होता त्यांनी.."तुम्हारी शादी हो गई ?"

"नही..अगले साल है !"मी

"लव या अर्रेंज ?"ते

"लव"

"ये एक आजकल कि बिमारी है ...जिसे देखो लव marriage करता है..तुम लोग एक दुसरे को इतनी अच्ची तऱ्ह जानते हो कि बाद मै कूच जानने के लिये रेह नही जाता ..शादिया तुट जाती है..हमारी अर्रेंज थी ..३५ साल तक साथ निभाया..फिर चली गई..३ महिने हो गये..३५ साल मै एक भी बार demand नही कि शिवाय एक ..वो रोज शेव करणे को कहती..लेकीन अब इच्छा नही होती "दाढीतून खाजवत ते म्हणले..

".जो घर मै आता था उसमे घर चलाती थी..अकेले जिना बहुत तकलीफ का काम है.." डोळे लाल झाले होते त्यांचे..

मला काय करावा कळत नव्हता..मी शांत बसून राहिलो..ते बोलायची वाट बघत..कोणी ऐकायलाच नव्हता त्यांच्याकडे..बायको गेल्यानंतर एकटेच होते..मुला कामानिमित्त बाहेर ..मुलगी नगर ला होती..तिच्या कडे चालले होते..नातवासोबत खेळायला..एक ऐकणारा मिळाला होता त्यांना..इथे मला उगाच पु.ला च्या अंतू बरवा ची आठवण झाली..

दारिद्र्य वगेरे नव्हता पण एकटेपणा होता...तरुण पणी कष्ट कि केले होते पेस्तान्काकांसारखे ...

"घर से निकलते वक्त बिवी के आलमारी मे नोटो का एक बंडल मिला..सारे १० रुपये के कडक नोट थे.."मैने बेटी को फोन करके बताया..उसने कहा कि मां वो जमा करके रखती थी और हम बच्चो को और बादमे अपने पोते को वो जब मिळते थे तब देती थी ...पोते के साथ खेलने जा राहा हु..उसे और एक नोट दुंगा.."मगाशी त्यांने त्या नोटा चाह्वाल्याला का नाही दिल्या ह्याचा उलगडा मला झाला आणि त्यावरचा राग निवळला

ते माझाशी एवढे का बोलत होते ह्याचा मला पत्ता लागत नव्हता..आणि मी का ऐकत होतो हे हि मला कळत नव्हता ..त्या छोट्या table वर आम्ही समोरासमोर बसलो होतो.. मी स्वताला ३५ वर्षानंतर कसा असेन आणि ते स्वताला ३५ वर्षापूर्वी कसे होते हे एकमेकांकडे पाहताना दिसत असेल..

"तुम्हारी बिवी भी शराब पिती है?"खाडकन मी जमिनीवर आलो..

"अभी तक तो नही.."मी

"अच्छा है..अच्ची बिवी मिलना बहुत किस्मत कि बात होती है..संभाल के रखना उसे..और अपने माता पिता को भी..बीवी को केहना कि अगर सास ससुर ने डाटा या बोले तो उनको कभी वापस नही टोकना .हुमारी उम्र हि ऐसी है कि कभी कभी निकल जाता है मुह से..और दर्द भी जल्दी होता है.."

मला त्यांचा बोलना ऐकून त्यांना एक insecurity आहे असा वाटू लागला..बायको नही..मुलांची लग्न व्हायची आहेत..सुना कश्या असतील माहित नही..आणि कोणी समोर ऐकायला नही..

पेस्तान्काकांच्या वेशात अंतू बरवा भेटला होता मला...

१०.३०-११ वाजले होते..ते झोपायला गेले.."नींद तो आती नाहीये लेकीन चूप चाप लेटा रेहता हु ..किसी को तकलीफ ना हो इसलिये "

औरंगाबाद पहाटे ३.३०ल येत आणि मनमाड सकाळी ६ ला ..ते उतरताना मी उठेन असा ठरवला होता पण गाढ झोप लागली..एका माणसाचा प्रवास मी ह्या प्रवासात पहिला होता

सकाळी उठलो तर सगळ्या जागा रिकाम्या होत्या माझा पुस्तक आहे त्या पानावर उघडा पडला होता ,माझ्या हातात एक जुनी काळी पण कोरी करकरीत १० रुपयाची नोट होती आणि माझा वेळ अजिबात वाया नव्हता गेला..