Tuesday, August 10, 2010

DEV 'D'

Dev 'D'
" समाजात मनुश्याला इत्क्या वाईट परिस्तिथीन्ना सामोरा जाव लागता की त्याच आयुश्यच बद्लुन जाता." खरतर blog ची सुरुवात कशी करावी ह्या वर खूप विचार केला.पण "आयुश्य ,ह्या जगात ,आज काल समाजात .." असे funde मारले की blog ला थोड वजन येत अस मला वाट्तय.निदान मी वाचतो तेव्हा तरी असा अनुभव येतोच..असो ,रात्रीचा १ वाजलाय ,बाहेर मस्त पाऊस पड्तोय न मी blog लिहितोय.(हा अजिबात रोमानटिक blog नाहिये).. २ महिन्य़ान पूर्वी मी चेन्नईला माझ्य़ा internship करता गेलो होतो.(हा blog म्हण्जे तिथला प्रवास वर्णन असेल अस वाट्त असेल तर तो सुधा नाहिये)..
"अरे माकडा मग हा blog अहे तरी कशावर?"(तुमच्या मनात येणारा प्रश्न) .

असो तर साधारण ३-४ महिन्य़ान पूर्वी मी चेन्नईला जाणार हे माहित होत.त्यामुळे तिथे रहायची सोय ,work profile ह्याबद्दल बरच विचार आणि हाल चाल सुरु होती."तिथल वातावरण खुप खराब आहे" , " अरे रोज इड्ली खावी लागेल","तमीळ सिनेमे अन गाणी ऐकावि लागतील" "office मधले सगळे मद्रासी लोक असतील!" अशी वेगवेगळ्या लोकान कडुन सारखीच वाक्य ऐकयला मिळाली.बरीच फ़ोन-फ़ोनी केल्या नन्तर एक flat मिळाला.त्यातुन रूममेट हा महाराश्ट्रीयन हे समजल्यावर तोच flat finalise केला.२२ तास आणि रिक्शा वाल्याशी (यशस्वी रित्या) हुज्जत घालुन रूम वर पोचलो.’तो’ सामान घ्यायला खाली आला होता.(ह्या ’तो’च आणि पु.ल.च्या ’तो’ च काडिमात्र सम्बन्ध नाहिये) उन्ची सधारण ५ फ़ुट ३ इन्च..एक loose tshirt आणि loose bermuda.ती नावाला bermuda होती,त्याच्य उन्ची मुळे त्याला ति 3/4th सारखी दिसत होती.मला माझ्या लहानपणाची आट्ठ्वण आली,सन्घाच्या शाखेत जायचो..तिथे घालावी लागणारी चड्डी अशीच होती..’नमस्ते सदा वत्सले मात्रुभुमि..’ सोबत ’चला जाऊ सन्घात ,एक चड्डी दोघात’ हे म्हणायला शिकलो...पण ’तो’ च्या चेहरयाकडे बघुन ’तो’ कधी सन्घात गेला नसेल अस उगाच वाट्ल मला.."काय रे कसा झाला प्रवास?घर सापडायला काही problem तर नाही ना आला?",मी-" अरे प्रवास एकदम छान,हा रिक्शा वाल्याने थोडा त्रास दिला की luggage चे extra पैसे द्या पण मी logically त्याला explain केले की बाबा रे माझ्यासोबत rickshaw मधे अजुन काहि लोक असती तर तू extra पैसे घेतले असतेस का?" हे त्या rickshaw वाल्याला कितपत पट्ल मला माहित नाही पण "ஔஹ்ச்ஜ்ப்க்ஜச்த்பைல்கஜ்த்னஶ்ஹ்த்லஜ்ச்ல்" (वाकड तोन्ड करुन बोलला अन निघुन गेला)..
"अरे इथल्या लोकान्ची mentality खुप वाईट आहे" -’तो’ ने माझी एक bag उचलली .मला ह्या वाक्याचा प्रत्यय नुकताच आल होता.घर शोधताना ज्या building मधे मला जायच होता त्या building समोरुन किमान ३ वेळा गेलो.त्याच building खाली एक म्हातारा उभा होता.त्याल पत्ता विचारला तर त्याने चक्क माहित नाही म्हणला.आणि आता बघतो तर काय हा म्हातरा त्याच building च्या ground floor ला आपल्या galleryतुन बघत होता.कदाचित त्याला एक सुन्दर मुलगी असेल आणि आमच्यात काहितरी होइल ह्या चिन्तेने त्याने मला पत्ता नीट सान्गित्ला नसेल.मी लगेच त्याची मुलगी कशी असेल आणि २ महिन्यात आम्च्यात काय होइल ह्याच विचार करायला लागलो.
"अरे ते non-tamil लोकान्नाशी बोलतच नाहित,हरामखोर साले"- ’तो’ च्या वाक्याने मी भानावर आलो.मला त्याच म्हणन एकदम पट्ल."खवचट म्हतारा साला!!!"
" तु lucky आहेस,आजच रूम वर T.V आणि DTH connection लावलय".."वाह!! क्या बात है! म्हण्जे football worldcup बघता येणार."
चला म्हणजे रुम मेट मराठी , ground floorवर सुन्दर मुल्गी (असेल अशी अपेक्शा,इच्छा,प्रार्थना) आणि रुम वर TV असा ऐकल्यावरच छान वाट्ला..आता फ़क्त रुम मधे गेल्यावर छान अगरबत्तिच्या धुराने आणि घमघमाटाने स्वागत होणच बाकी होत.अस म्हणत रुम मधे शिरलो आणि खरच धुर होता पण cigarette चा. इनमीन १०*१० ची खोली एका कोप्र्यात सगळे कपडे ओसन्डुन वाहत होते. दारुच्या बाट्ल्या छान रचुन ठेवल्या होत्या.ashtray म्हणुन newspaper खोली भर पसरव्लेले होते.खिड्की मधे सगळे कपडेच कपडे होते.त्यामुळे अन्धार होता. त्यातुन खोलीच रन्ग हिरवा."तु येणार म्हणुन खॊली आवरली!!"-तो.
मला आता काय reaction द्यावी खरच कळत नव्ह्त.हे जर आवरण असेल तर आधीची परिस्तिथि काय असेल मला imagine करवेना.(मला माझ्या खोलीची आठवण आली :))
"आयुश,तु drinks घेतोस का रे?"(marathi graphiti आठवली-’हअ प्रश्न आहे कि आमन्त्रण’?),
"कधी कधीच ,काही occasion असेल तरच,आणि माझ नाव आशय आहे,आयुश नाही"-मी(मला ह्यच खुपदा अनुभव आलेला आहे न राग ही,"आक्श्य","असाय", पासुन "अशोक" पर्यन्त माझा उद्धार झालेला आहे)..
"अरे sorry,aso आज drinks घेणार?"-’तो’
"नाही रे,आज नको.."-मी
"मी घेतली तर चालेल? काही problem नाही ना तुला?"- ’तो’
(घरातल्या दारुच्या बाटल्या बघुन हे प्रकरण occasional नसुन रेगुलर आहे हे समजत होत मला,पण जो पर्यन्त आप्ल्याला त्या गोश्टीचा त्रास होत नाही तो पर्यन्त चालुदे म्हण्ल)
"छे रे..problem कसला त्यात,(फ़क्त पिऊन उल्ट्या न तमाशे करु नका),काय विशेष आज?"
" माझ्या परी च बारस आहे आज..(शान्त्पणे दारुचि बाट्ली उघडत ’तो’ म्हणाला)"
"परी?"
"माझी मुल्गी"
"अरे मग तु इथे चेन्नईत काय करतोयेस?ठाण्याला नाही गेलास?"
"झक मारतोय,सुट्टी नाही"-’तो’(शान्त्पणे)
"अरे मग bossला सान्गयच ना..२ दिवस द्या"
"मित्रा तुला अस वाटतय का की मी हे विचारल नसेल?"
"मग?"
"माझी इथे transfer झालिये एका महिन्यापुर्वी..किमान २ years तरि इथेच आहे.......असो तु सान्ग घरी कोण कोण असत तुझ्या?किती दिवसानसाठी आलायेस?"
"आई-बाबा, २ महिने..आणि एक महिन्यपुर्वी म्हण्जे ? तुझी मुल्गी होति किति दिवसान्चि?"
"११ दिवसान्ची"
"त्यानन्तर.."
"एकदा हि नाही बघितला.." माझ वाक्या पुर्ण व्हाय्च्या आत ’तो’ म्हण्ला.
पण मी बघत होतो तिला माझ्या येणारया २ महिन्यात...२ quarter आणि १ पाकिट cigrette च सम्प्वुन रात्रि १२ला त्याने घरी फ़ोन केला आणि त्या १.५ महिन्याच्या परी शि गप्पा मारल्या.त्याने तिच्यासाठी चेन्नई हुन चेन पाठवली होति.आवड्ली का विचारत होता...
तिच आ..उउउ..ऊऊऊ एवढच ऐकुन ’तो’ तिच्यशी सन्वाद साधत होता.
पुढ्चे २ महिने मी हा सन्वाद रोज ऐकला...
एवढ्च नाही तर बायकोशी होणारे वाद,"मी नीट आहे,तुम्ही तुम्ची काळजी घ्या.."अस वड्लान्शी खोट बोललेला,"खुप भूक लाग्लिये ग आई..तुझ्या कार्ल्याच्या भाजी ची खुप आठवण येतिये ग(कार्ल्याची भाजी खुप छान लागत असेल अशि मझी समज झाली)..तिकडुन fax कर ना भाजी.."उपाशी पोटी आई शी बोलण,कट्ट्यावरच्या मित्राला मी गणपती मधे घरी येतोय तेव्हा मिरवणुकित नाचु ह्याच अश्वासन..तुम्ही म्हणाल की हे तर बरयाच लोकान्च्या बाबतीत घड्त आम्ही स्वत: ऐक्लय...पण एका बापाला "plz..मला परीचा निदान फ़ोटो पाठव..पाया पड्तो मी तुझ्या..."अस रड्ताना पाहिलय?..हे सगळ झाल्यवर ’तो’ खाली जायचा..१ पाकिट cigrette,1 quarter घेऊन यायचा..."आशय,तुला त्रास नाही ना रे होत? मी प्यायलो तर चालेल ना?"..त्याच guilt मला दिसुन यायच..
"छे रे..problem कसला त्यात?" पण ह्यावेळी तुसडे पणा नव्ह्ता...
दुसरया दिवशी येताना एक उद्बत्तिचा पुडा घेउन आलो..रोज रात्रि त्याचा ठरलेला प्रश्न "आशय,प्यायलो तर चलेल न?"..
"हो..पण एक cigrette नन्तर एक उद्बत्ति लावायची..."हि एक अट घातली मी त्याला...त्याने ति पाळली देखिल..
सकाळी ८ला घर सोडायचॊ आणि रात्री ८ला घरी यायचो..मी juice पिउन आणि ’तो’ either दारु पिऊन किन्वा दारुची तयारी करुन..पेप्सि ची बाट्ली,एक plastic चा ग्लास आणि ’दारु’(specific असा brand नाही,मुळात chennai मधे govt चेच दारु ला permission दिलिये त्यामुळे local brands खुप आहेत)..एक दोन वेळा त्याला emotionally blackmail करुन दारु cigarette कमी कर सान्गाय्च प्रयत्न केला देखिल..पण "कौन कम्बखत दुख बर्दश्त करने के लिये पिता है, हम पिते है क्युकी timepass हो सके"..त्याच reason हेच होता...पिऊन out झालाय अस कधिच झाल नाहि..
त्याला एकुणातच चेन्नई बद्दल राग होता..त्यातुन मुम्बईकर असल्यमुळे ते शहर सोडुन चेन्नईत transfer होण त्याच्या जिव्हारी लागला होता.एका चान्ग्ल्या TV channel मधे कामाला होत..लग्न झाल होत..बायकोला दिवस गेले आणि recession मधे ह्याची नोकरी...दुसरया ठिकाणी job मिळाला आणि त्याची परी जन्मली..पण चेन्नईला transfer झाली..परी लहान अस्ल्यामुळे आणि इथल वातावरण एकतर वाईट.."इथ्ल्या लोकान्च्या घामाला देखिल साम्बार आणि रस्सम चा वास येतो" थोड्क्यात काय तर इथल खाण,लोक,शहर या बद्दल त्याच मत वाईट होत..
मी घरी जाताना मानसिक तयारी करुन जायचो..cigrette,दारु चा वास,फ़ोन वरची भान्ड्ण पण त्या दिव्शी काही तरी वेगळच घड्ल..घरात शिरल्यावर उद्बत्त्यान्च घमघमाट,छोटी छोटी खेळ्णी..’तो’ला १ आठवड्याची सुट्टी मिळाली होती..त्याच्या चेह्र्यावरचा आनन्द बघण्यासारखा होता.४ sizes चे frocks घेऊन आला होता."परी किति मोठी झालिये ग? हाथ भर लाम्ब कि अजुन छोटिशी आहे?"असे प्रश्न ऐकाय्ला मिळाले..त्याने परी जन्म्ली त्या दिवसाच वर्णन केल..OT च्या बाहेर tension मधे होता..एक nurse एका कपड्यात एका बाळाला घेऊन आले..म्हण्ली " लक्श्मी आलिये".."तिला हातात घेतला(परिला,nursela नाही) आणि ढ्साढ्सा रडायला लागलो..,आशय जेव्हा तु बाप होशिल तेव्हा मला नककी फ़ोन कर..."तो त्याच्या परीला कुशीत घेउन झोपल्याचा भास मला त्या रात्री झाला..
..पण दुसरया दिव्शी त्याची रजा cancel झाली..रात्र भर परी चा video बघत होता...रात्रिचा १ वाजला होता..मी कुस बद्लत होतो..तो भिन्तिला टेकुन बसला होता.."आशय?झोपलायेस का रे?"-’तो’
"ह्म्म,बोल",
"माझी परी मला ओळखेल का रे??"
माझे डोळे खाड्कन उघड्ले(हा प्रश्न माझ्यासाठी नव्ह्ताच मुळी)
"अरे वेडायेस का?ओळखेल की" मी उगाच त्याला समजवण्याचा प्रयत्न करत होतो...
एवढा एक प्रश्न विचारुन तो झोपला अन मी जागा रहिलो...
नुक्ताच सन्दिप खरे आणि सलिल कुलकर्णिच्या दमलेल्या बाबाची कहाणी ने बरयाच लोकाना रडवलेल..पण निदान ते बाबा आपल्या मुलान्न खर खुर तरी बघत अस्तिल...ह्या दमलेल्या पेक्शा एकटा पडलेल्या बाबाच काय??
आप्ल्या मुली च्या सग्ळ्यात छान moments ना miss करत होता तो...रोज दारु,cigrette ह्याचा दिवस सुरु व्हाय्चा आणि सम्पाय्चा..
हा नविन DEV'D' जिथे D stands for Daddy पहिल्यन्दच बघित्ला..

माझी परत पुण्याला यायची तयारी सुरु झाली...मी त्याच्या साठी एक branded full bottle whisky दिली..बाट्ली कडे काही वेळ बघितल न हसत म्हणला.."हे तर २ दिवसात सम्पेल,पुढे?"मी निघालो,तेव्ढ्यात हाक ऐकु आली "आयुश!!" (मला खरच राग आला होता..२ महिने होऊन देखिल शेवट्च्या दिवशी माझा नाव चुकिच घेतला" माझ्या हातावर ५१/- ठेवले ,"दगडुशेठ गणपतिला जा आणि पूजा कर,माझ्यासाठी नाही परी साठी"...
"नक्की"पैसे खिशात ठेवत मी म्हणालो..
"by the way एक गोश्ट विचारायची राहुनच गेली,परी च नाव काय रे ठेवलस?"
"आयुशी !!!"
मला नावामुळे आलेला राग गिळुन घराबाहेर पड्लो......