Saturday, October 22, 2016

'वारीच्या निमित्ताने...'


रेवा गेल्या आठवड्यात सव्वा महिन्याची झाली. डॉक्टर विझिट व्यतिरिक्त कुठे बाहेर पडलो नव्हतो . आता 'एन्जॉय' करण्यासाठी कुठे बाहेर जायचं  म्हणल्यावर माझ्यातला सजग,सांस्कृतिक जबाबदारी असलेला 'बाप' जागा झाला.नुकतंच सुरु झालेल्या 'वारी- बुक कॅफे अँड क्रिएटिव्ह स्पेस ' मध्ये जायचं  ठरलं. आत गेल्यावर तिथली लोक आपल्याकडे कौतुकाने बघतील असं वाटलं पण तास काही झालं नाही. फारशी गर्दी नव्हती आणि मधोमध असलेली उश्या, लोड ची जागा रिकामी होती. तिथे आम्ही रेवा ला घेऊन बसलो. माझी बायको ऋतिका रेवा शेजारी बसली आणि मी त्या स्पेस मध्ये चक्कर मारू लागलो.काही पुस्तकं बघून , 'हि आपल्याकडच्या कलेक्शन मध्ये आहेत' असा विचार मनात सुरु असतानाच ऋतिका  ने 'अरे हा फोटो कोणाचाय असा माझा इगो सुखावणारा प्रश्न विचारला.'जिदडु (जे) कृष्णामूर्थी ' असं उत्तर दिलं.
मी एक पुस्तक घेऊन बसलो आणि ऋतिका फेरी मारायला गेली.अधून मधून कॉफी मशीन चे आवाज येत होते. आता मस्त कॉफी पियूआत असं म्हणेपर्यंत रेवा च्या विशेष कार्यक्रमाचा गडगडाट झाला. आम्ही लगेच सतर्क पालकांसारखे तिथून बाहेर पडलो आणि परत आत आलोच नाही.

ना आम्ही तिथे काही वाचलं, ना कॉफी घेतली,ना अर्ध्या तासापेक्षा जास्त बसलो, ना #Revafirstvisit असं टॅग केलं , ना feeling blissful असं चेक इन केलं. पण तरीही तिथून बाहेर पडताना एक 'sigh of relief ' घेऊन बाहेर पडलो.

15 सप्टेंबर च्या जवळपास बाळ येणार हे कळताच आनंदसोबत ऐन गणपतीत ट्रॅफिक आणि आवाजाचं काय करायचा हा प्रश्न पडला होता. मृत्यू नंतर माणसाची 'बॉडी' होण्यात जसा वेळ लागत नाही तसंच पोटातून बाळ बाहेर आल्यावर जबाबदारीची जाणीव व्हायला देखील वेळ लागत नाही.बाळाला हातात घेतल्या क्षणापासून गोष्टी वेगळ्या दिसायला लागतात . वाढणारा ट्रॅफिक, वातावरणातला pollution , DJ चे आवाज.पेपर मध्ये शिक्षक मंत्री काय म्हणले हे देखील नजरेत पडायला लागतं.अशात सतत नेगेटिव्हिटी पोचवणाऱ्या बातम्या नको म्हणून न्यूज चॅनेल पण बंद केले. तरी आजूबाजूला लागणारे फ्लेक्स, ट्रिपल सीट होंडा डियो वरून प्यां प्यां  करत जाणारी पोरं, रखडलेला फ्लाय ओव्हर , मोर्चे , संप जाणवत राहतात.सध्या पुण्यात चिमण्या जाऊन आजार पसरवणारे आणि कसलाही उपयोग नसणारे कबुतरं वाढतायेत हे त्याचाच लक्षण आहे . एकी कडे नुसता संघर्ष दिसतोय काहीतरी मिळवण्यासाठी तर दुसरीकडे 'एन्जॉय' करणारे गट . सतत भरलेली हॉटेल,शॉपिंग फेस्टिवल, वाढदिवस, 4 दिवस चालणारे लग्न समारंभ. मध्ये एका वाढदिवसाला गेलो होतो तिकडे एक इव्हेंट मॅनेजर आला होता. 'hey  people  we are here to enjoy ' हे एकच वाक्य तो सारखं म्हणत होता.शेक्सपिअर म्हणाला होता ' life is a stage ', मध्यंतरी 'life is a race ' अशी भावना होती आता एकुणात 'life is  an event'  अशी म्हणायची वेळ आलीये. TV  वर सतत कुठला तरी सोहळा त्याचे  डोळ्यात जाणारे LED , निऑन रंगांचे कपडे-accesesories , ओरडून बोलणारी लोकं , वाजणारे DJ  .कुमार गंधर्वांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं 'फार noise वाढतोय सध्या ' ते सतत आठवत राहतं.
मला स्वतःला हे बोम्बार्डमेंट आणि बटबटीतपणाने  गुदमरल्यासारखं होतं.
हे सगळं सुरु असताना त्या वारीतल्या अर्ध्या तासाने असं काय दिलं कि जे दिलासा देणारा होतं?
 तिथे खूप पुस्तकं होती पण दाटीवाटी करून न ठेवलेली , लोड ,उश्या, चटया , टेबलं, खुर्च्या असं हवं तसं बसायची मुभा असलेली जागा होती. दिव्यांचं हि तसंच, हँगिंग लॅम्प्स मध्ये पिवळे दिवे, tubelight पण डोळ्यात ना जाणारा प्रकाश.सर्व्ह करणारी मंडळी होती पण ऑर्डर घ्यायची घाई नव्हती. कुठेही 'पॅटर्न' नव्हता.अघळ पघळ पण एक cozyness होतं.
मी इकडे सारखा येईन असं 'मोठ्यांदा' ठरवलंय पण खरंच किती वेळा येईन माहित नाही.
वारी म्हणजे प्रवाह चा एक रूप. पण हि वारी कोथरूडच्या मॅकडोनाल्ड culture च्या 180 डिग्री opposite  एक 'ठेहराव' देणारी वास्तु आहे .
" एक दिवा जपायचा तर आयुष्य पुरत नाहीये मला आणि इथे तर झुम्बरेच्या झुंबरे शोभेला लावण्याची अहमहमिका सुरु आहे ".कवी ग्रेस यांच्या ओळींचा प्रत्यय वारी ने दिलाय.
वारी ने हे दिवा लावायचं काम केलं आहे ..ह्यापेक्षा ह्या समाजाला आणि एका बापाला दिवाळी ची दुसरीकाय भेट असू शकते.

एक वारकरी.