Tuesday, August 18, 2009

कमोड

"डिसक्लेमर:: खलचा ब्लॉग हा अत्यंत हिडिस आहे..परत म्हणू नका की आधी सांगितला नाही...ह्यात सांगण्यात आलेल्या गोष्टींचा वाचकांच्या (जीवित अथवा मृत ) आयुष्याशी काही साधर्मया आढळयास तो योगायोग नसून अनुभव समजावा" ज्यांना शीर्षकावरून हा ब्लॉग घाण असेल असा वाटताय त्यांनी पुढे वाचू नये...पण मी लिहिणार आहे...कारण ह्या गोष्टीचा महत्व मला नुकताच कळलेला आहे आणि ते म्हणतात ना की आपल्याकडे जी वस्तू नसते त्याची किमत आपल्याला कळते ,माझ्यबाबतीत तसाच काहीसा झाला आहे..वाचाकांमधे काही लोकांनी लहानपणा पासूनच त्याचा वापर केला असेल त्यामुळे त्यांना कदाचित वाचताना बोर होईल..पण आमच्या सारख्या लोकांनी ज्यांनी लहानपणा पासून स्वदेशी पध्धत वापरली आहे त्यांना विशेष कौतुक आहे गोष्टीचा...तसा बघायला गेला तर इंडियन स्टाइल ही एकदूम पर्फेक्ट आहे...बरोबर आपल्या पोटावर प्रेशर येता आणि पुढच्या गोष्टी आपोआप घडतात पण मला वाटता की ही स्टाइल अवलंबण्यमागे सुधा एक कारण आहे...ते म्हणजे लोकसंख्या...पहिल्यापासूनच वाडा संस्कृती आपण पाळत आलो आहे..जॉइंट फॅमिलीस जिथे 10-15 लोका एका घरात राहत असतात...त्यामुळे त्यांच्या कडे निवांत बसून असल्या गोष्टी करायला वेळच नसतो..निसर्गा पुढे हात टेकले म्हणतात ना ते खराय..कोंबड जसा ना चुकता सकाळीच आरवतो तसा ह्या क्रियेचा आहे...त्यामुळे झक मारत पटपट उरकायला लागता..आणि तीच वाडा संस्कृती पुढे मिड्ल क्लास लोकान मधे आली..पण वेस्टर्न कल्चर मधे आपल्याला ते आढळून येत नाही...डोळ्यासमोर नेहमी पेपर वाचत बसलेला माणूस दिसतो...तिथल्या पेपर वल्यांचा धंदा कसला चालत असेल..एकाच घरात 2 पेपर ..एक बाहेर आणि एक आत.. आता 'कमोड' हे नाव का पडला असेल असा प्रश्ना पडणा साहजिकच आहे पण मराठीत संधी सोडवा असा प्रश्ना असायचा तसा ट्राइ करून बघितला आणि उत्तर सापडला "कम-ओढ' म्हणजे अशी जागा जिथे कमी ओढाताण करायला लागते...आता ही गोस्ता मला कुठे सुचली तर त्याची जागा सुधा तीच आहे(फक्ता नशीब म्हणा की उत्तर सूचल्यावर मी आर्किमेडिस सारखा 'युरेका युरेका ' म्हणत नाही उठलो..)..मोठ्या मोठ्या लोकांनी मान्या केला आहे की सगळ्यात जास्त कॉन्सेंट्रेशन कुठे होत असेल तर ते तिथे आहे(तुमच्या मधले 99% लोका मान्या करतील).. आता ह्याची खरी महती जेव्हा आपल्या पचन प्रक्रियेत बिघाड होतो आणि जेव्हा सारख्या वार्‍या कराव्या लागतात तेव्हा कळते....पण शाळेत ज्यांनी खूप उठा बश्यांची शिक्षा भोगली असेल त्यांना फारसा काही प्रॉब्लेम येईल असा वाटत नाही..तसाच जे रेग्युलर जिम ला जौन बैठका मारतात त्यांना सुधा फारसा त्रास नाही होणार.. कमोड चे जसे फायदे आहेत तसे तोटे..मी आता त्याचा वर्णन करणार नाहीए...पण एक सगळ्यात मोठा प्रश्ना जो पडला तो म्हणजे की फ्लश चा नोब आहे मागे का असतो?? कसरत होते ..का लोका उलटी बसतात?? मला खरच काळात नाही..मस्त कार च्या गियर सारखा साइड ला द्यायचा...त्याचा जर काही सायंटइफिक कारण असेल तर प्लीझ सांगा मला... असो तर माझा असा मत आहे की एका घरात दोन्ही प्रकार असावेत..म्हणजे वेळ आली की उपयोगी पडता.. तर अश्या ह्या अत्यंटा हिडिस आणि विकृत ब्लॉग ची सांगता एका हिडिस गाण्यानी करावैशी वाटते.. "मैं नीकला चडडी लेके रस्ते पे ,सडक पे.. एक कमोड आया..मै उथ्थे ***** छोड आया..." पी : एस :: शक्यतो कॉमेंट्स शब्दान मधे टाका..ईईई,शिईईइइइइइइइइइइइई असला काही टाकु नका

Saturday, August 15, 2009

Y'Z" bridge ???

मला 100% खात्री आहे की जवळपास सगळ्यांनीच ह्या शीर्षकाचा नको तो अर्थ घेतला असणारे..पण त्याला काही इलाज नाही कारण आपली मेण्टालिटच तशी झाली आहे..असो पण तुम्हाला जसा वाटताय तसा ह्याचा अर्थ आत्ता तरी घेऊ नका..मी शीर्षक एस एम एस लॅंग्वेज मधे लिहिला आहे..'वाय झेड ब्रिड्ज म्हणजे व्हाय ज़ेड ब्रिड्ज ?? असा म्हणायचा होता मला..आता ह्या विषयावर ब्लॉग का लिहावसा वाटला मला तर त्याला कारण मला बर्‍याच दिवसांपासून पडलेले प्रश्ना आणि त्या पूलावर घडणार्या गोष्टी आहेत...पुण्यातील सगळ्यात गजबजलेल्या 2 रस्त्यांना जोडणारा हा पूल. लक्ष्मी रोड आणि जे एम रोड . तसा बघितला तर लाकडी पूल(जो आता लोखंडी आहे), ओंकारेश्वर चा पूल असे 2 पूल ह्या रोड वर आहेत .पण झेड ब्रिड्ज चा विशेष कौतुक आहे...तुम्ही जे एम रोड वरुन त्या पूलवरून निघालात तर गेल्या गेल्या लगेच डावीकडे त्या पूलाने पोक काढले आहे..हे बघितल्यवर लक्षात येता की हा पूल खूप विचार करून बांधण्यात आलेला अहे. ती पोक आलेली जागा केवळ प्रेमी युगूलनसाठी चा कट्टा आहे. कॉर्न वाले,भेळ वाले ह्यांचा जबरदस्त खप होतो त्या ठिकाणी..उद्या जर एखादा झेंडेवाला सुधा तिकडे उभा राहिला(15 ऑगस्ट,26 जानेवारी व्यतिरिक्ता) तर त्याचा सुधा खप होईल..अहो तिकडे येणारे लोका दिल्दार असतात..ते इतके खुश असतात की इतरांना ही खुश करत असतात(अर्थात वेग वेगळ्या पध्धतिने)...बर्‍याच वेळा त्या पूला वरुन गेलॉय..अजुन एक गोष्टा लक्षात आली ती म्हणजे त्याचा फूटपाथ हा त्याच्या रस्त्या इतकाच रुंद आहे..म्हणजे नगरपालिकेचा खरच कौतुक केला पाहिजे..ह्या अश्या युगुलांनसठी बांधलेला हा स्पेशल पूल...2 मन एकत्र आणणारा हा पूल..आता मला सांगा पुण्यातले बाकी सगळे पूल सरळ आहेत हाच एक का तेवढा लांब आणि झेड ह्या अकारचा??अजुन एक बेसिक प्रश्ना आहे मला सिविल इंजिनीर् लोकांना..पूल हा कायम सरळच का बांधतात?? तिरका नाही का बांधून चालत??.. असो तर मुद्दा काय आहे की काही लोका जी खूप आरडा ओरड करताहेत की पूलवर असंख्या जोडपी बसलेली असतात त्यांना तिथून हाकलला पाहिजे..अहो पण का?? तुम्ही गाडी फूटपाथ वरुन चालवता का रस्त्यावरून?? रस्त्यावरून जाताना ते काय करतायत हे काही दिसत नसता..एकदूम सिस्टेमॅटिक असता सगळा..गाडी फूटपाथ च्या कडेला पार्क करतात आणि इंजिनच्या मागे बसून स्वाताचा इंजिन सुरू करतात...कधी भाजत नाही का त्यांना?? असो रस्त्यावरून काही दिसत नाही म्हणल्यावर मी एकदा फूटपाथ वरुन पण चालत गेलॉय काही दिसता का बघायला अहो पण खरच सांगतो काहीच दिसत नाही..मला काय तर त्यांना सुधा एकमेकांचे चेहरे दिसत नाही(प्रेम आंधळ असता ह्यालाच म्हणत असतील)..हा अपवाद फक्ता काही दिवसांच्या जेव्हा तिकडे सर्कस आणि जत्रा भरते तेव्हा..तेव्हा अगदी लखकलखीत प्रकाश असतो... ज्या लोकांना ह्या प्रेमी युगुलांवर राग आहे त्यांनी कृपया आपल्या गाडी चालवण्यावर लक्षा द्यायवे...साहजिक्कच आहे जुन्या पिढीला हे पचवण आणि बघणा अवघड आहे ..अहो पेठेतल्या संस्कृती आणि जे एम रोड च्या मॉडर्न आणि पश्चिमच्या संस्कृती ला जोडणारा हा पूल आहे..आणि पुलाची लांबी लक्षात घेता पेठेतल्या लोकांना जे एम रोड वर जायला थोडा तरी वेळ लागणारच ना..थोडक्यात काय की त्या पुलाचा आलेला पोक,त्याची लांबी(अनेक जोडप्यांना सामावून घ्यायची त्याची क्षमता),त्याचा रुंद फूटपाथ यामुळे WHY 'Z' bridge ह्याचा उत्तर मिळता पण ज्यांना अजूनही त्यावर चालणार्‍या गोष्टींचा राग आहे त्यांच्या साठी मात्र हा Y 'Z' bridgech राहणार आहे....

Thursday, August 13, 2009

हाफ्ता बंद

कोण म्हणता पुरूष रडत नाही?? मी गेले काही दिवस दर बुधवार अन् गुरुवारी पुरूष रडताना बघतोय. झी मराठीवर 'हाफ्ता बंद नावाचा प्रोग्रॅम सुरू झालाय. तसा आधी कौन बनेगा करोडपती,दस का दम, छप्पर फाडके असे अनेक कार्यक्रम सुरू झले न बंद ही पडले..दस का दम चा दुसर पर्व सुरू झाला पण त्यात केवळ सेलेब्रिटीस येत आहेत ..सलमान खान सोबत नाच करतायेट आणि निघून जात आहेत...म्हणजे ज्यांच्या कडे आधीपासूनच कोट्यावधी रुपये आहेत ते केवळ टी आर पी वाढवण्यासाठी येऊन जात अहेत. असल्या प्रोग्रॅम चा सामन्या जनते साठी उपयोग काय ?? "हाफ्ता बंद " हा कार्यक्रम बघितल्यावर सत्या परिस्थिती कळते. गरज लोकांना काय काय करायला लावते हे कळता..अहो 1 कोटी वगेरे खूप लांबची गोष्टा आहे पण लोकांना 1 लाखाचा कर्ज फेडताना सुधा नाकी नउ आलेत...इथे येणारा माणूस त्या होस्ट ला भेटायला किंवा बघायला आला नसून सुखाची झोप घ्यायला येतो...मन्दि च्या काळात नोकरीची गॅरेंटी नसताना घरासाठी घेतलेला 15 लाखाचा कर्ज,नुकताच नवीन लग्ना झालेली जोडपी..नुकतेच पालक झालेल दांपत्या या लोकांनी समाधानाने झोपायचा,लहान मुलान्शि खेळायचा की कर्जाचा विचार करत राहायचा..त्यांच्या जागेवर स्वतःला इमॅजिन करून जरी बघितला तरी अंगावर काटा येतो... चैनी साठी कर्ज घेणारे अनेक लोका आहेत,कार लोन .टॅक्स वाचवण्यासाठी घेतलेला लोन..पण पोटासाठी,आपल्या कुटुंबाला सुखाने झोप लागावी म्हणून घर घेऊन स्वता कर्ज घेऊन रात्रभर जागा राहणार्‍या माणसा कडे बघून खरच कीव येते..आपण नेहमी आपल्या पेक्षा पुढे किंवा वरच्या पातळीवर च्या माणसा शी आपली तुलना करतो तेव्हा आपल्याकडे काय कमी आहे ह्याची जाणीव होते आणि आपण नेहमी ते मिळवण्या च्या मागे धावतो...ह्या प्रोग्रॅम मधे येणार्‍या लोकांकडे बघून आपण खरच किती सुखी आहोत हे कळता... ह्या विषयावर अनेक लेख आलेत,पेपर मधे च्ापून आलाय पण रिॅलिटी शो ची खरी गरज कोणाला आहे हे लक्षात आला...स्वाताची विवाहबाह्या संबंध सांगून कुटुंब उधवास्ता करून 1 लाख रुपये मिळवण्यात काय पॉइण्ट आहे?? ते 1 लाख गरजू लोकांना द्या..पुण्या तरी लाभेल...पण पैसा बोलता है बॉस... असले स्फोटक किस्से ऐकून त्याची लोका चर्चा करणार आणि परत परत ते बघणार..कशाला असले लोकांची रडगाणी ऐकत बसतील? कॉन्सेप्ट चांग्लियहे पण झी मराठी गरीब वाहिनी आहे त्यामुळे जिंकून जाणार्यांची संख्या खूप कमी आहे...पण किमान अशा गरजू लोकांच्या मदती साठी कोणीतरी काहीतरी करताय हे बघितल्यवारा खूप छान वाटला..आम्ही आपले घरी बसून लोकांना नुसता नाव ठेवणार..की साध्या प्रश्ना चा उत्तर देता येत नाही..स्वता उठून काही करणा माहीतच नाही आम्हाला...बाहेर स्वाइन फ्लू सुरू आहे...म्हणून आम्ही बाहेर पडायचा नाही..घरी बसून हॉस्पिटल मधे डॉक्टर काय करत आहेत ह्याला नाव ठेवायची...माणुसकी सुधा हप्त्या हप्त्याने बंद होत आहे... आणि मी सुधा फार काही वेगळा करणार नाहीए..ब्लॉग लिहिणार आणि झोपून माझा माणुसकी चा आजचा हाफ्ता बंद करणार...

मी इंजिनीरींग ला का आणि कसा आलो??

12वी पर्यंत आयुष्य हे घर-शाळा-कॉलेज एवढ्यापुरताच मर्यादित होता. अमुक अमुक टक्के किंवा इतका नंबर मिळवला तर अमुक अमुक मिळेल अशा कंडीशन्स मधे सतत शिक्षण झाल.5वी मधे पहिल्या 5 नंबर मधे आलास तर वीडियो गेम,10वी मधे 80-85 पडले तर सायन्स आणि 12वी ग्रूप मधे 90% च्या वरती मिळाले तर इंजिनीरींग (सुदैवाने सी ई टी भानगड आमच्यावेळी नव्हती आमची लास्ट बॅच होती.) लहानपणा पासूनच मला इंजिनीर् व्हायचा होता असा काही नव्हता काही लोकांचा मी बघितलाय की 8 वीतचठरवला होता की मला इंजी किंवा डॉक्टर व्हायचाय. माझ्या मते अशा लोकांना बाकीचे फील्ड्स नाहीतच नसतात आणि त्यातून 90% लोका ठरवलेल्या प्रमाणे होत्ाही नहित.कमि %मिळाले म्हणून बी एस सी नाहीतर बीकॉम करतात.. असो! मुद्दा हा नाहीए की कुणाला काय वाटताय मुद्दा हा आहे की मी इंजिनीर्ईग ला का अन् कसा आलो?? 9वी मधे असताना सायन्स 2 मधे लाइफ प्रोसेसेस या धड्यांमुळे मी बायोलॉजी घेऊन चीर्फाड करणार्‍यांमधला नाही (शाब्दिक चीर् फाड अपवाद आहे .तो अगदी व्यवस्थित जमतो) माझ्या मते आपल्याला काय हवाय यापेक्षा काय नकोय हे जर माहीत असेल तर आयुष्या अधिक आनंदात जगता येईल पण जर सगळाच मना प्रमाणे झाल तर मजा कसली?? ह्ंम्म्म्म्म !!! तर 10वी मधे 86% न 12 वि मधे 92% मिळाल्यावर घराण्याचा वंशा चा दिवा पेटला बाबा एकदाचा अशी घरच्यांची समजूत झाली . असो तर गरवारे कॉलेज मधे अड्मिशन घेऊन एन एम, के एम न खाके असे 3 क्लास लावून 12वी पास झालो..12वि च्या बोर्डाच्या परीक्षेला पहिले 2 पेपर खराब गेल्यावर रात्री वर्ल्ड कप ची मॅच बघून दुसर्या दिवशी पेपर चांगला जाणा म्हणजे अविस्मरणीया आनंद .म्हणजे मॅच पण जिंक्लो आणि पेपर ही चांगला गेला (डीटेल्स: भारत वि इंग्लेंड 2003 च्चा वर्ल्ड कप..आशिष नेहर ने उलट्या करून घेतळेलेल 6 विकेट्स न तेंडुलकरची कॅडिक च्या मुस्काटात मारलेली सिक्स खरच अप्रतिम!!!) मला अजुन कळलेला नाही की ह्या महत्वाच्या मॅचस नेहमी परीक्षेच्या वेळेसच का असतात?? कदाचित त्यावेळी सगळी पोरा घरी असतील अभ्यासासाठी त्यामुळे जास्त प्रेक्षकवर्ग मिळेल आणि उगीच शाळा कॉलेज बुडणार नाही..खरच किती काळजी नवीन पिढीची... 2 पेपर मधे 7 दिवसांची गॅप मिळाल्यावर घरच्यांनी नकार देऊन सुधा क्रिकेट खेळायला गेलो आणि एकलव्यसारखा ज्यांनी आम्हाला गणित शिकवला (मित्रापैईकीच) अशा द्रोणाचार्याला माझा उजवा अंगठा देऊन आलो...एकलव्याला अन् त्याचा फॅमिली ला कसा वाटला असेल ह्याची प्रचीती आली..पण हार न मानता तसाच पेपर लिहून परत क्रिकेट खेळल्यावर फाइट मारण्याचा स्पिरिट त्यावेळी पासूनच रक्तात होता ह्याची खात्री नंतर पटत गेली. रिज़ल्ट लागला अन् इंजिनेरींग ला जाण्याइतपत मार्क होते..तो पर्यंत कॉलेजस कुठली हे सुधा माहीत नव्हता..एम आय टी फक्ता ग्राउंड वर क्रिकेट खेळण्यासाठी (काही जाणा टेकडीवर जायचे..त्याचा कारण नंतर कळला)होता त्यामुळे माहीत होता खरी गंमत तर आता सुरू होणार होती..गंमत कसली 'पर्व' 4 जून 2003ला 12 वी चा निकाल लागला अन् त्यानंतर रोज पेपर मधे शिक्षण मंत्रालय आणि कॉलेजस ह्यांनी "आपली आवड" हा प्रोग्रॅम सुरू केल.रोज काहीतरी नविनच.ओप्तिओन फॉर्म कधी मिळणार?, फी किती असणार??,कॉलेज की ब्रांच?? बघता बघता 3 महिने सुट्ट्यांचे 6 महिन्यात रुपांतर झाले. एम आय टी - 72000/- व्ही आय टी-64,000/- असे लॉटरी च्या बक्षिसचे आकडे फी म्हणून पेपर मधे छापून येऊ लागले... सी ओ ई पी हे प्रतिष्ठीत कॉलेज फक्ता ऑप्षन फॉर्म भरणे ह्यासाठीच बघावे लागणार असे वाटले. ह्या कॉलेज चा मला आधी काही कललच नाही. बस कंडक्टर ला विचारला की सी ओ ई पी ला येणार का?? त्या वेळी त्याने 'हाडूक'(समजून घ्या) दिला... पण नंतर शिवाजीनगर चा इंजिनीरींग कॉलेज म्हणल्यावर टायच्या डोळ्यात एक वेगळाच आदर दिसत होता..मी कृष्णा सारखा गीता ऐकणार का असा अर्जुनाला विचारतोय अन् त्यावेळी अहो विचारतय काय सांगा असा म्हणताना पार्थाच चेहरा जसा झाला होता ना अगदी तसा होता... पु . ला. च्या पुणेकरांचा जाज्वल्य अभिमानाचा प्रत्यय मला आला.. पुण्यात फक्ता एकच इंजिनीरींग कॉलेज आहे ..बाकीच्यांना काहीच हक्का नाहीए स्वताहला पुण्यातला इंजिनीरींग कॉलेज म्हणून घ्यायची..पण हा अभिमान आहे की माज याचा उत्तर मला थोड्याच दिवसांनी मला मिळणारेत असा ते कॉलेज मला ओरडून सांगत होता.. पहिल्या राउंडला सी ओ ई पी मधे अड्मिशन ना मिळलल्याने मूड गेला होता पण त्यातला त्यात फी कमी असल्याने सिंहगड मधे अड्मिशन घेतली ..2 आठवडे त्या गडा वर चढलो अन् लढलो.. अक्टोबर उजाडला..6 अक्टोबर म्हणजे माझा वाढदिवस..त्या दिवशी पेपर मधे 4 त्या राउंड ची नोटीस आली होती...निदान त्या निमित्ताने तरी सी ओ ई पी मधे पाऊल ठेवता येईल म्हणून फॉर्म भरायला गेलो..कदाचित सी ओ ई पी नि दिलेली हाक आणि वाढ दिवसाची भेट असेल.. 2 दिवसांनी 8 अक्टोबर ला राउंड होती..काही अपेक्षा ना ठेवता गेलो होतो..बरेच लोका मेकॅनिकल,कंप्यूटर ब्रांच मिळत नाहीत म्हणून परत येत होते..मला त्याच्याशी काही एक घेणा देणा नव्हता..मला फक्ता सी ओ ई पी हव होता... तेव्हा आतून बातमी आली की सिविल, मेटलर्जी च्या जागा रिकाम्या आहेत असा कळला..पण सगळा आरामात झाला तर मग ते सारकारी कॉलेज कसला...ऐनवेळी बोनफाइड सर्टिफिकेट इस अ मस्ट असा त्या ऑफीसर ने मक्खपणे सांगितला..त्यावेळी त्याला 2 ठेवून त्याचा डेथ सर्टिफिकेट त्यालाच द्यावा असा वाटला ...पण अडला हरी .. हातात 1.5 तास होता..लंच टाइम झाला होता..मग मी अगदी तानाजी च्या आवेषात सिंहगडावर चढाई करायला निघालो. सोबत माझी घोरपड (बजाज एम -50). शिवाजीनगर ते सिंहगड कॉलेज दरम्यान केलेल माझा ड्राइविंग कदाचित आदित्या चोप्रा नि बघितला असेल आणि म्हणूनच त्याला धूम ची आइडिया आली असणार... नॅयेट्रोबूसटर्स लावल्यासारखी माझी गाडी पळत होती .किती निस्वारथी पणेपळत होती बिच्चारी .सी ओ ई पी मधे अड्मिशन मिळाली तर मी नवीन गाडी घेईन आणि हिच्याकडे बघणार सुधा नाही हे माहिती असून सुधा पळत होती...अहााह!!! काय ही स्वामिनिष्टा.. राणप्रताप च्या चेतक घोड्या नंतर माझीच एम 50.. सिंहगडावर पोचलो ..तिथे सरदार आणि मावळे जेवण करत होते..नंतर या असा सांगितला..पण मी सुधा अमिताभ चे सिनेमे बघितले होते..थेट प्रिन्सिपल च्या कॅबिन मधे घुस्लो आणि बोनाफआइड सर्टिफिकेट घेतला..आणि धूम 2 सारखा रिटर्न सी ओ ई पी मधे आलो.. अड्मिशन घेतल्यावर लोकांचा बघण्याचा दृष्टीकोनाच बदलला .."काय करतोस??", "इंजिनीरींग "-मी .समोरचा -"बर,कुठे?" मी-"पुण्यात" , ते- "अरे वा!!"पुण्यात कुठे??, मी- "इंजिनीरींग कॉलेज,शिवाजी नगर", ते-" काय सांगता,भारीच !!!" असे 3 डिग्री 3 वाक्यातून ऐकायला मिळाले.. आणि मग 10 ओक्टॉबेरला एका महान पर्वाची, कुणाचीची पर्वा न करता सगळ्या गोष्टी अगदी परवा घडल्यासारखा वाटणर्‍या गोष्टींची सुरूवात झाली..........

Wednesday, August 12, 2009

"सी वाय जी" एका जत्रा….

काही वर्षांपूर्वी नवरात्रीत चतुर्षिंगी च्या जत्रेल ना चुकता जायचो…पिपाण्या,ट्परीवरची 15 रु ची पावभाजी,ज्वेलरी न पूर्ण कपड्यातली ममता कुलकर्णीचे रस्त्यावर विकायला ठेवलेले पोस्टर्स..न ते पोस्टर्स बघ्याला जमलेली गर्दी…अगदी नीट आठवतय..पण आता त्याच रस्त्यावर आइ सी सी चे ट्रेड टवर्स उभे राहीले..ममता कुलकर्णी ऐवजी आम्ही कमीत कमी कपडे जसस्तीत जास्त किमतीत विकतो हे दाखवणारे बिपाशा बसू,दीपिका चे पोस्टर्स लावणारे पिरमिड्स,क्रॉसवर्ड ची दुकाना सॉरी माल्स उभी राहिली..न त्यातच माझा ऑफीस असल्यामुळे..अजूनही ती पोस्टर्स बघायची हौस गेली नाहीए..असो..मला इकडे जॉइन होऊन 1 वर्षा झला..जॉइन झालो तेव्हा एका मोठा एल सी ड डिसप्ले वर कसला तरी काउंटडाउन सुरू होता..324 डेज़ तो गो न एका वाघोबा चा चित्रा होता..त्याचा नाव ‘जिगर’ असा काहीसा होता..ते नक्की जिगर आहे की स्पेलिंग मिस्टेक झलिये हे अजूनही काळळलेला नाहीए(पुणेकरांच्या इंग्रजी बद्दल मला पूर्णा कॉन्फिडेन्स आहे...)...तर मुद्दा हा की काही दिवसांनी कळला की पुण्यात 12-18ऑक्टोबर 2008 ला सी वाय जी होणारेत न त्याचा हेड ऑफीस आइ सी सी आहे.. एक वर्षा गेला न ऑफीस मधळ्यांनी टीम आउटिंग म्हणून सी वाय जी ला जायचा प्लान काढला..माझी आधी इच्छा नव्हती पण मग नंतर जाउयात म्हण ला तसही ऑफीस मधे बसून जी मेल न तेच रियलाइज़ेशन चे मेल वाचण्यात काही अर्थ नव्हता… अखेर तो दिवस उजाडला..ऑनलाइन बुकिंग केला..आधी खरतर लेडीझ स्वींमिंग चा शेड्यूल ला जाणार होतो पण त्याचे टिकेट्स 500रु होते सो जरा आवर घातला..आयुष्यात सगळ्याच गोष्टी बघायला मिळत नाहीत ह्याचा प्रत्यय आला..वमेन्स इवेंट सॉरी लेडीझ/गर्ल्स इवेंट अजुन कुठले आहेत का ते शोधत होतो(युथ गेम्स मधे बायका म्हणणा बरोबर वाटला नाही)..फाइनली बर्‍याच सर्च नंतर लेडीझ+ टेन्निस न तेही डबल्स दिसल्यावर सगळ्यांनी एकमताने त्यावर शिक्का मोर्तब केला… दुपारी 2 वाजता आमची स्वारी निघाली.. PMच्य कार मधे त्येही त्याच्या शेजारी बसून गेलो..बरीच कसरत करून पार्किंग पासून स्टेडियम पर्यंत बस मिळाली..मला खरच पी एम टी बद्दल खूप वाईट वाटता ..त्यांच्या नशीबी कायम गर्दीच लिहिलेली आहे..तीच लोंबकॅलणारी मान्सा..फरक फक्ता एवढाच होता की ह्यावेळी बस मधे सगळ्या क्लास ची लोका होती…”डॅड आर वी गोइंग टू द सेम स्टेडियम व्हेर द ओपनिंग सेरेमॉनी वाज़ हेल्ड?” पासून “अप्पा मला त्यो धावाधावीचा खेळ बघ्याचाय” म्हनणारी लोका दिसली. फॉरेन नर न फॉरिन मादी पण होतेच आधून मधून…न आधून मधून दिसणार्‍या फॉरिन मदिन कडे आम्ही साारखे सारखे बघत होतोज़… फाइनली आम्ही स्टडीउमच्या एंट्रेन्स पाशी पोचलो..शिवाजी महाराजाचा आश्वारूढ पुतळा बघून धन्य वाटला..कदाचित ते आज जिवंत असते तर त्यांनी देखील हॉर्स राइडिंग न स्वॉर्ड फाइटिंग मधे नक्कीच रेप्रेज़ेंट केला असता…1-2 मेडल्स तर नक्कीच जिंकले असते.. .”.पुण्यनगरीत आधी होते शिवाजी न आता आहेत सी वाय जी” वाईट आहे पण चालता तेवढा… टिकिट काउंटर वरुन आम्हाला टिककिट्स कलेक्ट करायचे होते..तिकडे गेल्यावर..रस्ता..रस्ता कसला मोटो क्रॉस चा ट्रॅक होता तो..पण इवेंट कॅन्सल झल्या मुळे(अंडर 18 ला ड्राइविंग अल्लौड नसता हे नंतर लक्षात आला असेल ओर्गनािझेर्स च्या) असेल कदाचित तिथेच टिकिट काउंटर उघडले होते..10 वर्षा पुर्वी चतुर्षिंगीच्या जात्रेला एंट्री टिकिट काढताना जो अनुभव यायचा अगदी तसाच आला..घाणएरडया हॅंडराइटिंग मधे 50रु टिकिट सोल्ड आउट लिहिले होते.. मजा म्हणजे जिथे गावकडील पब्लिक ची गर्दी होती तिकडे इंग्लीश मधे नोटीस होती न जिथे फॉरिनर्स जायचे तिकडे मराठी मधून अनाउन्स्मेंट होती…आहे की नाही पुणे भारी.. असो आम्ही आत मधे गेलो..मोबाइल वागेरे सगळा बाहेर ठेवला होता..सो जगाशी काहीच कॉंटॅक्ट नव्हता कारण सारा जगच तिकडे जमला होता..आधी एका टेन्निस कोर्ट मधे गेलो तर तिकडे नायजेरिया विरुध न्यू झिलँड अशी ब्लॅक अँड व्हाईट मॅच सुरू होती..पण समोर एका इनडोर स्टेडियम मधून शिट्ट्यांचा आवाज ऐकू आला..त्यावरून कळला की आत मधे आपलाच पब्लिक आहे..आत गेलो तर भारत वि इंग्लेंड टेन्निस लेडीझ डबल्स सुरू होती..पहिला सेट जिंक्लो..पब्लिक फुल्ल शिट्ट्या मारत होता..शेवटी तो रेफ्री इतका भडकला की उठून बडवतो की काय असा वाटला…पूर्णा मॅच नाही बघता आली..ऑफीसला यायचा होता..भारत जिंकेल ह्या अशेने आमी निघालो..पुन्हा तोच पर्तीचा प्रवास..तेच मोटो क्रॉस चे रस्ते.. सहजच बाजूला लक्षा गेला तर एका मोकळ्यावर मैदानावर निवांत पणे क्रिकेट खेळणारी पोरा बघितली न पु लांच्या पुणेकरच्या जाज्वल्या अभिमानाला जपणर्‍या पुणेकरांना ह्या पुणेकरचा सलाम करून तिथून निघालो…निघताना एक विचार डोक्यात आला . पुण्याच्या जग्प्रस्सिध अशा 2 गोष्टी होत्या.. 1) बाकरवडी (चितळेनचीच) 2)हींजेवडी न आता त्यात अजुन एकाची भर पडली..अं ती म्हणजे "बालेवाडी"

Friday, August 7, 2009

सिनेमा आज कल

गेल्याच आठवड्यात 'लव आज कल" नावाचा सिनिमा बघून आलो..नोकरीला लागल्यापासून फर्स्ट डे ला सिनेमा बघायची सवय झलिये.. 2005 मधे आमिरखान चा तब्बल 4 वर्षांनी मंगल पाणडेय नावाचा सिनिमा आला होता...खूप जास्त गाजावाजा झला होआत...आमची विकृत गँग सुधा अगदी आतुरतेने वाट बघत होती त्या सिनेमाची...सिनेमाच्या ट्रेलर वरुन तासन्तास चर्चा व्हायची...1 आठवडा आधी जौन अड्वान्स बुकिंग वागेरे केला होता..काकाला त्या सिनेमाला जौन सलाम् नामस्ते चा ट्रेलर बघायचा होता तर लम्ब्यल राणी मुखेरजी..तिच्या प्रत्येक एंटरीला " अरे काय डोळे आहेत तिचे!!" असा जोरात बोलायचा..शेवटी समोर बसलेला एक माणूस ज्याचा सुधा आमच्यासारखाच अपेक्षभंग झला होता अगदी वैतागलेल्या सुरात म्हणला " अरे डोळे एवढे आवडले तर घेऊन जा घरी"..संपूर्णा सिनिमा बघताना हा सगळ्यात एंटरटेनिंग किस्सा होता.. पण तो सिनिमा इतका साफ आपटला की त्यानंतर फर्स्ट डे फर्स्ट शो चा खूळ डोक्यातून सॉफ उतरला.. असो पण परत एकदा ते खूळ सुरू झला 'ओम शांती ओम','सावरिया'(वर्स्ट एवर ब्लू फिल्म),'तारे जमीन पार"(बेस्ट मूवी एवर),'तशन"(अत्यंत हिडिस सिनेमा) न अजुन बरेच लिस्ट आहे..तर असे चांगले वाईट अनुभव आले.. "जब वी(पोस्टर वाले "वुई" असा का लिहितात काय माहीत..हे म्हणजे इंडियन आयल सारख आहे ) मेट' हा सिनेमा अनपेक्षितपणे खुपच चांगला निघाला..इतका आवडला की दर वीकेंड्ला कुठल्यातरी चॅनेल वर तो असतोच(न मी बघतोच) त्यासोबत अजुन 3 सिनेमे असतात 1) सिंग इस किंग 2)नो एंट्री 3) वेलकम सध्या तर डॉन नो 1,ईंद्रा द टाइगर असले साउत इंडिया चे सिनेमे दाखवायला लागलेत... असो तर जाब वी मेट सॉरी वुई मेट च्या यशा नंतर न सोचा ना था सरक्या तरुण पिढीला आवडेल असा सिनेमा काढल्यानंतर इमियज़ आली चा हा 3रा चित्रपट बघायची हौस होती... पण हा सिनेमा नाही आवडला मला...मी स्टोरी वगेरे काही लिहीत बसणार नाहीए...पण काही सिनेमे कंपेर केले की नक्की काय खराय किंवा कशावर विश्वास ठेवावा हेच कळट नाही... आता लव आज काळ मधे ही दिपिका आधी स्वात्हून ब्रेक उप करते (त्याची पार्टी सुधा देतात हे आवडला मला) मग भारतात येऊन दुसर्या मुला सोबत सूत जमवते त्याच्याशी लग्ना करते...हनिमून ला घेऊन जाते न तिकडे गेल्यावर तिला साक्षातकर होतो की आपल्याला आधीचाच मुलगा आवडतो...न नवर्‍याला सॉरी म्हणून निघून येते...मला ह्या अशा नवर्‍यलोकांचा वाईट वाटत..त्यांची परिस्थिती हात को आया लेकिन मु ना लगा अशी होते...बिच्चारे...आधीच्या सिनिमा मधे लग्नाच्या मंडपात तरी पळून जायचा किंवा निघून जायचा प्रकार घडायचा..इथे अजुन एक पाऊल पुढे..आता हे झला ह्या सिनेमाचा.. तसाच काही वर्षांपूर्वी " हम दिल दे चुके सनम" नावाचा सिनेमा आला होता..त्यात खुद्द नवरा तिला प्रियकारकडे घेऊन जातो न तिला तिकडे गेल्यावर कळता की आपला सुख नवर्‍यासोबतच आहे... आता प्रश्ना हा आहे की लग्न सारख्या पवित्रा बंधनात अडकल्यावर नवर्‍याला देव समजून त्याच्या सोबत अड्जस्ट होऊन संसार कॅरणारी ऐश्वर्या खरी की दीपिका सारखा लग्न झल्यावर मी अजुन तुला त्रास देणार नाही म्हणत नवर्‍याला हनिमूनला एकटा सोडून जाणारी ही बायको खरी...हे म्हणजे देवाचा अपमान केल्यासारखा आहे.....त्याला बिच्चार्याला एकपात्री सगळा करावा लागला असेल...असो मुद्दा तो नाहीए . मुद्दा हा आहे की नवीन पिढीने नक्की करावा काय??मान्या आहे की सध्या मुला मुलींचा एकत्रपणे वावरणा जास्त सोप्पा आहे त्यामुळे साहजिकच एकमेकांना हवा तसा जोडीदार निवडता येतो..नाही पटला एकमेकांचा तर सोडता ही येता.....आता तो कुछ कुछ होता है बघा..आपण शाहरुख ला हीरो म्हणतो..पण तोच त्याचा स्टेट्मेंट्सला कॉंट्रडिक्ट करतो..आईला उपदेश देत असतो " मा,हं एक बार जीते है एक बार मरते हाई और शादी(पॉज़) शादी भी एक बार होती है" न शेवटी काय मूक गिळून हाताने आय लव उ म्हणतो न तेही त्या सर्दारजी चा बघून..घ्या...हा कसला हीरो?? खरा हीरो सलमान खान ...लग्न स्वाताचा पण नवरा बायको वेगळेच असतात..न लोका काय नावा ठेवणार न जेउन जाणार म्हणजे परत ह्यालाच सगळा भुर्दंड..... अजुन एक प्रश्ना मला असाच "डी डी एल जे " बघताना पडला होत. युरोप मधे असताना रात्री काजोल बाई दारू पिऊन हॉटेल वॉर येतात..सकाळी उठल्या वर लक्षात येता की आपले कपडे कोणीतरी बदलले आहेत...रात्री काय झालाय हे जाणण्यासाठी ती हीरो ला बोलावटे..तो आधी चुक झालयाचा नाटक करतो पण मग भारत की नारी की इजजत की क्या किमत होती है असा लेक्चर देऊन तिला इंप्रेस करतो..न जाताना म"मेरा शर्ट देदो असा म्हणून तो काढायची आक्टिंग करतो...आता मला सांगा की तियाचा शर्ट कोणी बदलला???? तेव्हा कुठे गेली तिची ईजजत???न बोटांना लिपस्टिक लावून कसे ओठांचे मार्क्स काढता येतात??..पण बॉलीवुड चा सिनिमा म्हणले की डोका बाजूला ठेऊन जायचा असता ते हेच...सिनिमा बघायचा ते फक्ता त्यांचा कॅरेक्टरिज़ेशन ,फॉरेन चे लोकेशन्स यासाठी...पारवा एकाशी हेच बोलत होतो तर लक्षात आला की आज कालच्या सिनेमांना काही मोटिवच नाहीए...एक कपल घ्यायचा न त्यांचे उतार चढव दाखवत बसायचा..ते कमी पडला तर लव त्रिकोण,नाहीतर मग 2 जोड्या..हे असाच वाढवत रहायचा..त्या उलट अमिताभ वागेरे चे सिनेमे बघायचे..बापाला मारला म्हणून विल्लेन ला शोधायचा न मारायचा...किवा लॉस्ट न फाउंड फंडा..काहीतरी मोटिव होत. अश्या सिनेमांची आतुरतेने वाट बघ्तोयं...होपफुली पुढच्या आठवड्यात येणारा "कमिने" काहीतरी चांगला देऊन जाईल...तो पर्यंत हे सिनेमे दर वीकेंड्ला टी वी वर बघत राहणे...

Thursday, August 6, 2009

राखी फ्लू न स्वाइन ग्रहण

राखी फ्लू न स्वाइन ग्रहण शीर्षक जरा वेगळाच आहे पण त्याला कारणच तसय ..काल राखी पोर्णिमा होती पण गेले 3-4 दिवस त्व वॉर राखी सावंत नावाचा फ्लू आहे .राखी का स्व्यमवर हा अतिशय हिडिस असा प्रोग्रॅम सुरू झालाय...15 इच्छुक हॉतकरू तरुणांपैकी राखी एकाला निवडणार होति.. सासू सासर्‍यांची भेट ,गरम कोळश्यावरून चालून दाखवणए वगेरे प्रकार करायला सांगितले होते...आता राखी च्या होणार्‍या नवर्‍याचा न कोळशाच्या संबंध कुठे येणारे हे अजूनही मला कळलेला नाहीए..कदाचित तिने मेकप उतरवल्यावरा ती कोळशा सारखी दिसत असेल न ती स्वतल हॉट म्हणते म्हणून गरम कोळसा वागेरे कॉन्सेप्ट असेल(वाइइट कमेंट असेल तर सोडून द्या ...) असो तर एक-एक करत स्पर्धक गळत(?) (सुटत) गेले ..शेवटी राहीले 3..तर शनिवार दि 1 तारखेला तिचा मेहेंदिचा प्रोग्रॅम होता ..सगळ्या न्यूज़ चॅनेल वर तेवढी एकाच बातमी ब्रेकिंग न्यूज़ म्हणून फ्लॅश होत होती...सोबत अजुन एक बातमी होती ती म्हणजे स्वाइन फ्लू न त्याची सात पुण्यात सुरू आहे रोज वाचनात येत होता.. अखेर दि 2 ला राखी चा स्वायमवर ची वेळ उजाडली..वो (अ)शुभ घडी आ गई ...अगदी रामायण-महाभारत सीरियल मधे होणार्‍या सीता न द्रौपदी च्या स्व्यमवर ची आठवण आली..3 मूल समोर उभी आहेत..जुन्या काळी शॉर्टलिसटिंग प्रकार नव्हता नाहीतर सीता ला सुधा 3-4 लोकांना मधून शॉर्टलिस्ट कारवा लागला असता पण त्यात जर फॅशन किंवा स्त्यालिश कपड्यांची राउंड असती तर त्या आपले प्रभू रामचंद्रा बाद झले असते..तेव्हा ते त्यांच्या गुरू कडे राहायला होते(नाव नाही आठवत) न तिथून डाइरेक्ट लग्नाला आले होते...त्यांचा नशीब बलवत्तर म्हणून तिकडे ते धनुष्या ची टेस्ट होती...(धनुष्याचा नाव मला माहितीये पण नाव घायायला कसा तरी होताय)..सेम केस वित द्रौपदी ..पण तिला एक के सात 4 फ्री मिळाले...असो असता एकेकाचा नशीब.. हा तर विषय होता राखी न तिच्या समोर उभ्या असलेल्या 3 पुरुषांचा...तिच्या लग्नात तिला आशीर्वाद की पब्लिसिटी मिळवायला कोनिपण हजर होता..आता त्या क्युंकी सास भी कभी बहू ती मधल्या 'बा' चा काय संबंध??? सीरियल मधे तिने आपल्या खापर पणतू चा पण लग्न बघितला तरी हौस काही फितत नाही ह्या बायकांची...असो पण स्वाती चिटणीस चा काय काम तिकडे?? कोण तो रवि किशन..भॉजपुरी फिल्म्स चा सूपरस्टार तो तर मानलेला भाउ म्हणून आला...इकडे तिचा स्वयांवर तर तिकडे तिची सख्खी आई रडतीये..बेटी मुझे माफ कर्दो...माय-लेकी दोघी तशयच नाटकी...फाइनली तिने परदे सियाच निवडला...कॅनडा मधला इलेश म्हणून कोनेतरि टक्ला निवडला ..मेहेंदिच्या रात्री त्याने त्याचा गाण्यावर नाच केला होता..अरे देवा काय तो नाच !!! दोन्ही पायाथील बूटांच्या लेस जर एकमेकांना बांधल्या न नाच म्हणल्यावर जसा एखादा नाचेल तसा नाचत होता अगदी..असो राखी नाचवेळ बरोबर... एकमेकांना अंगत्या घातल्या न,हार घातले न मग लगेच प्रेस कान्फरेन्स..राखी बाई बोलू लागल्या..हॅमे थोडा वक्त चाहिए..उगाच आत्ता घाई करून 4 महिन्यात डाइवोर्स घेण्यापेक्षा (काय पण कॉन्फिडेन्स आहे ) त्याला आधी मला विदौट मेकप बघू दे(सत्य कटू असता..पचवणा खरच अवघड आहे ते) असो त्यांच ते बघून घेतील ...आता हे मला सगळा कसा माहिती तर अर्थात आपल्या न्यूज़ चॅनेल मुळेच...फक्ता बातम्या बघून मला एवढी माहिती आहे तर जर मी पूर्णा सीरियल बघितली असती तर काय झला असता..बातम्या बघण्या मागे कारण पुण्यात असलेली स्वाइन फ्लू ची सात...संपूर्णा भारतात पुण्यनगरीलॅच ह्या रोगाने निवडलाय...बर रोग व्हावा तर जरा चांगला व्हवा ना...उंदीर न डुककापासून होणारे रोग...70-80 वर्षांपूर्वी प्लेग ची साथ आली होती..त्यानंतर हीच..... संपूर्णा पुण्यात फक्ता एकाच हॉस्पिटल मधे त्याचा चेकिंग करतायेट नायडू हॉसप ..स्टेशन जवळ आहे हे...टिपिकल सारकारी द्वखाना आहे..त्यातून एका मुलीचा परवा मृत्यू झला..कारण स्वाइन फ्लू असा म्हणतायेट त्यामूल लोकांची एकाच झुंबड उडाली आहे..न सगळे काळ सुट्तीच्या दिवशी हॉस्पिटल मधे जौन चेकिंग करतायेट .. त्याचे लाइव टेली कास्ट करतायेट ..रांगेत उभा रहन पुणेरी लोकांना माहीतच नाहीए..तिकडे सुधा मारामर्‍या सुरू आहेत... नेमका तोंडावर मास्क असल्या मुळे काय भांड्तायेट ऐकू येत नव्हता नाहीतर पुणेरी शिव्या ऐकायला मजा येते..शब्दकोशात नक्कीच भ्र र पडली असती ...असो तर असा हा काल चा दिवस सतत राखी न स्वाइन च्या सानिध्यात घलवुन आम्ही राखी पोर्णिमेचा सण साजरा केला.. न म्हणूनच हे शीर्षक राखी चा फ्लू न स्वाइन चा ग्रहण .

Sunday, August 2, 2009

"काका"

"काका" शालेत ब तुकडी मधे दात पुढे आलेला एक मुलगा म्हणून ओळखायचो त्याला आमच्या वर्गातल्या मुलांनी रॅबिट हे टोपण नाव ठेवल होता तसा बोलण्यातून फारसा कधी संबंध नाही आला पण तोंड ओळख होती 12वि नंतर अचानक हा गडी दिसला तो सिओइपी मधे 4त्या राउंड च्या लाईन मधे .तो पण माझ्यासारखीच कोणतीही ब्रांच घ्यायला तयार होता.. हा मुलगा 4 वर्षा सतत सोबत होता..आधी विकृत ग्रूप न मग नंतर नाटकाच्या ग्रूप मधे जॉइन झल्यामुळे हा टेप ड्ब्बल साईडेएड आहे हे लक्षात आला.. तसा 4 वर्षात त्याच्यात खूप बदल झला..बाहेर असलेले दात आत गेले न आत असलेला पोट दिसण्या इतपत बाहेर आल. गणपती मिरवणुकी मधे सुधा कोपर्‍यात उभा राहून न ते ही निंबाळकर ताल्मईच्या मिरवणुकीत स्वता सदाशीव पेठी असून सदाशीव पेठी मुलींकडे दुर्लक्ष करून मन्या न पश्या ह्यांच्या हालचालइंवर लक्ष्य ठेऊन असायचा न युनिक स्टायइल मधे हसायचा आधी फक्ता हवा बाहेर निघायची मग आवाज..एकदा मान्या कडून तो मार सुधा खाणार होता पण शिवी वरचा निभावल..तर असा हा नाच न करणारा नंतर साल्सा चा क्लास लावला न नाचायला लागल्यावर खुद्द गणपती डॅन्स करतोय असा वाटायला लावणारा 'काका' अरे हो ! सिधार्थ च नाव काका कसा पडला हा गूढ प्रश्नच आहे..त्याचा झाला असा की पहिल्या वर्षी आम्ही बीसीवर डबा खायला बसलो होतो तेहा काहीतरी झला न तो म्हणल की मी काय काका आहे का? झला एवढा बोलणा त्यावेळी पुरेसा होता त्यानंतर आमच्या ग्रूप मधे आम्ही कोणाला एवढी बोलायची संधी देखील दिली नाही..आधीच नावा पडून ठेवली उदा नाना, अन्द्य.तर सांगायचा मुद्दा हा की तो आमच्या ग्रूप मधला मानाचा गणपती आहे ज्याला नाव पाडल गेला... आता पर्यंतचा सगळा शिक्षण त्याने घरच्या 3किमी च्या रेडियस मधे केला पण ह्या पुढचा शिक्षण करायला हा 3 खंड / कॉंटिनेंट लांब गेला..तसा नोकरी साठी बराच फिरला म्हणजे ट्रेनिंग भुबनेश्वर मग पोस्टिंग कलकत्ता पण तिथे सुधा मराठी एच आर ला मस्का मारुन(मराठी माणूस मराठी माणसा साठी काही करत नसेल कदाचित पण मराठी बाई नक्कीच करते हे कळला ) मुंबई मधे आला न तिथून पुण्यात आला..न "ओवर लॅंप गिविंग लाइट तो नेबर्स हाउस" म्हणत परत सदशिव पेठेत स्थायिक झला..हे वाक्या मुद्दाम लिहिला कारण त्याचा स्वदेस ह्या सिनिमा वर्च प्रेम..आशुतोष गोवारीकारला देखील माहीत नसतील इतके डीटेल्स ह्याने पाहिलेत..गायत्री जोशीचा एका शॉट मधे चहाचा कप डाव्या हातात असतो न दुसर्या आंगल मधे तो उजव्या हातात असतो हे अब्ज़र्व केल्याबद्दलत्याचा विशेष कौतुक... नाटकाच्या ग्रूप मधे तो म्यूज़िक सेक्षन चा बॅकस्टेज म्हणून आला होता आणि जर त्याला ललित नि ठेवून घेतला असता तर सी ओ ई प च्या इतिहासात अशी जागा निर्माण करणारा तो पहिलाच मुलगा न अशा जागेवर काम करणारा हा पहिलाच ठरला असता पण ललित नि त्याच्या इच्छेला प्रोत्साहन देत स्वरुप कडे आणून सोडला न तो नुसताच बॅकस्टेज मधे आला..पण म्यूज़िक वर चा त्याचा प्रेम काही कमी झला नाही..तो एकहाती केबोर्ड वाजवतो (दुसर्या हाताने वाजवायला तो शिकतोय..न मे हे गेले 6 वर्षा बघतोय)..रहमान नि युवा सिनेमात रिक्षा च्या मीटर चा आवाज कसा वापरलाय हे अगदी आत्मीयतेने ऐक्वतो... म्यूज़िक वरचा प्रेमपेक्षा त्याचा खाण्यवरचा प्रेम अधिक जास्त आहे..त्याच्या इतकी सुरेख कंपनी तुम्हाला कोणी डेउच शकत नाही..काही लोका आपल्याला कंपनी द्यायला येतात पण आपल्याच प्लेट मधले खातात(अशी लोका मला बिलकुल आवडत नाहीत पण काय करणार मी पण त्यातलाच एक आहे) पण हा गडी स्वतसाठी वेगळी डिश ऑर्डर करतो...न त्याला जर दुर्‍या जोशी ची साथ मिळाली तर किस्सा होतो..आम्ही एकदा गोव्याला गेलो होतो..तिकडे नाश्ता करायला एका हॉटेल मधे गेलो..वेळेत न आवरल्यामुळे त्यांना हॉटेल वॉर यायला उशीर झाला..आम्ही डोसा वगेरे ऑर्डर दिली होती..पश्याने मेनु कार्ड मधे सगळ्यात 10 रुपयाची पावभाजी शोधून काढली न दोघही सदाशीव पेठी कोकणस्था ब्राम्हण असल्यामुळे तेच ऑर्डर केला पण ते समोर आलयवर दोघांचेही डोळे बघण्यासारखे होते..वेटर नि भाजी म्हणून बटाट्याचा रस्सा न 1 पाव असा त्यांच्या पुढयात आणून ठेवल ..पण ते सुधा अगदी चविणे खाणारा हा काका...गेल्या काही दिवसात महिन्यात त्याने खाण्यावर आपला लक्षा जास्त केंद्रित केलाय स्मॉकिं जोस चे पीझझा,जॉर्ज मधला चिकन ,बेडेकरची मिसळ ,अजुबत्ल मसाला पाव,सुजाता ची मस्तनी ,कॅड ब ह्या गोष्टींसाठी त्याची ना ज्या व्यक्तीने ऐकली असेल त्याने मला येऊन भेटवे(मी काही करणार नाहीए नुसता येऊन भेटवे..अशी म्हणायची एक पध्धत असते)... असो तर असा हा कायम अक्टीवा स्कूटी असे नॉन गियर गाड्या चालवणार्या मुलाने ने आपला गियर बदलला आहे न शिक्षणासाठी 3 किमी नाही तर 3 खंड (व्हाया लंडन) लांब चालला आहे..त्यासाठी तुला हार्दिक शुभेच्छा !!! आशय