Thursday, October 20, 2011

“मैं कौन हुं ?”


" मैं कौन हुं ? मैं कहा हुं ? " हे एका typical स्मृती भ्रंश झालेल्या माणसाचा डोळे उघडल्या नंतरचा वाक्य असता ..मला कायम आशचर्य वाटता कि जर एखादा माणूस पूर्ण पणे सगळा विसरला असेल तर मग त्यालाआपलीभाषा तरी कशी लक्षात राहते..असो लेखक-दिग्दर्शक का चा स्वातंत्र्य ह्या नावाखाली आपण ते पचवतो देखील..असो तर मुद्दा हा आहे कि माणसाला केवळ सगळा विसार्ल्यानंतरच " मी कोण आहे ? " हा प्रश्न का पडतो ? त्याधी आपण कधीच हा विचार का करत नाही कि आपण कोण आहोत आणि आपण का इथे आलो आहोत ?(काही अपवाद आहेत "मद्यपान "!!!)
प्रत्येक बाळ जेव्हा जन्मायला येत तेव्हा ते रडत असता ..(मी रडलो नव्हतो !!!देवाशप्पथ!)
माझा मते त्या मागचा कारण त्याला देखील हाच प्रश्न पडलेला असतो " मी कोण आहे? मी का इथे आलोय ?" केवळ त्याला कुठली भाषा माहित नसते किंवा त्याला इतर कुठल्या प्रकारे त्या भावना व्यक्त करता येत नसतील म्हणून रडणे हा सोयीचा मार्ग असावा..
तो पूर्ण पणे LOST असतो..मुळात तो त्याचा मर्जी शिवाय ह्या जगात आलेला असो..त्यामागचा कारण काही असो पण त्याचा जगात येण्यामागचा प्रयोजन त्याला माहित नसता ..त्याच्या पुढे त्याच्या अस्तित्वाचाएक प्रश्न उभा राहतो ! ...ह्या सगळ्या गोष्टीनमध्ये त्याचा प्रश्न हा अनुत्तरीत राहतो किंवा काही वेळासाठी दुर्लक्ष केला जातो..

आता मला हा प्रश्न का पडला आणि ह्या वर लिहावासा का वाटला ? हे म्हणजे साजिद खान किंवाdavid dhawan ने Black , गुजारीश सिनेमांचा sequel , remake बनव्ण्यासारखा आहे पण तरीही विचार येतो डोक्यात आणि ते लिहिलाही जाता..
rockstar ह्या सिनेमाचा " कून फाया कून " हे सुफी गाणं ऐकत होतो..
रहमान चा संगीत..पेटी,गिटार,तो दर्ग्यात्ला माहोल ह्याने ते गाणं आधी आवडला खरा पण नीटऐकल्यावरत्यातला "कर दे मुझे ,मुझसे दीदार मेरा !" ह्या ओळीने अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी आला..का ते माहित नाही..

Kun (كن) is an Arabic word referring to the act of बेइंग . Faayakun means and it is !
" Be ..and it is !!! "
रहमान चाच " ख्वाजा मेरे ख्वाजा " ऐकताना आवडला होता पण पाहिल्यावर हसू आला होता.. गाण्याचा शेवटी ह्रितिक सारखा अप्रतिम dancer खांद्यावर कळशी आणि हातात बादली घेऊन असा का गोल फिरतोय कळत नव्हता..इतकाच काय तर बालगंधर्वा सारख्या मराठ मोळ्या सिनेमात देखील जेव्हा ते एकटे असतात तेव्हा सुफी गाण्याचा आधार घेण्यात आला होता...observe केल्यावर लक्षात आला कि सुफी आणि self - realisation ह्या २ common गोष्टी आहेत..गेल्या आठवड्यात timesमध्ये सुफिस्म वर लेख होता त्यात त्यांनी "संगीत" ह्या माध्यमातून देवा ला शोधणे हा मार्ग निवडला होता...(Sufism: Relating to God with deep passion by Sajjad Shahid )
इथे मला सुफिस्म ह्या विषयावर बोलायचा नसून..त्यांनी ज्या प्रकारे स्वताला ओळखण्याचा मार्ग शोधलात्याचा उदाहरण द्यायचा होता.. हि गाणी हे एक निमित्त झाला पण महत्वाचा काय आहे -- स्वतालाओळखा !!!
पण देवाला शोधणे म्हणजे आधी स्वताला ओळखणे हे सत्य ...
आता थोडा practical किंवा technical विचार करायचा म्हणलं तर MBA मध्ये Maslow's hierarchy of needs ची गाठ पडली..


त्याच्या theory नुसार कि माणसाचा अंतिम गरज हि self-actualization आहे ..पण त्यासाठी त्याला आधीच्या ४ गरजा पूर्ण झाल्याशिवाय मिळवता येत नाही..
“What a man can be, he must be.” This forms the basis of the perceived need for self-actualization ! This level of need pertains to what a person's full potential is and realizingthatpotential .
ते बाळ डोळे उघडून आजूबाजूला बघतो तर सगळे लोक त्याच्या कडे कौतुकाने पाहत असतात..कालांतराने त्याला नाव दिला जाता ..जात-धर्म-संस्कार ह्या सगळ्या गोष्टींशी आपला बाळू
जोडला जाऊ लागतो , मग पुढे शाळा - शिक्षण ह्या राम रगाड्यात तो पूर्णपणे system चा एक भाग बनून जातो..पुढे त्याचा mindset असा काही बदलला जातो कि तो पैसे,लग्न ह्या गोष्टींकडे ओढला जातो..बाळाराम वयाच्या तिशीत न चाळीशीत मुलांचे शिक्षण , आणि आपला समाजातला स्थान ह्याकडे पूर्ण वेळ जातो..पन्नाशी हि retirement ची स्वप्ना बघण्यात जातात..
बाळासाहेब आता ६० वर्षांचे झालेत ..सगळ्या जबाबदाऱ्या , कर्तव्य ,चैन ,मौज करून झाल्यानंतर पुढे काय हा प्रश्न पडतो न मग system प्रमाणे तो अध्यात्म कडे वळतो..न मग नित्य नियमाने भजन,कीर्तन,देवळात जाने,तीर्थक्षेत्र असले उद्योग सुरु करतो..न डोळे मिटतो..
मुद्दा हा आहे कि आपण आपला ८० % आयुष्य ह्या गरजा आणि बाह्य गोष्टींकडे लक्ष्य देण्यात घालवतो..पण केवळ १०-२० % आयुष्य आपण नक्की कोण आहोत ह्याचा विचार(???) करण्यासाठी घालवतो ..हे सुधा किती लोक करतात हा चर्चेचा मुद्दा आहे...

थोडक्यात काय तर आपण पूर्ण आयुष्य जागून झाल्यावर कसा जगलो ह्याचा विचार करतो आणि जर काही चूक, गिल्ट मनात असेल तर अध्यात्म कडे वळून त्याचा प्रयास्चीत करायचा बघतो..पण आपण जगलोच का हा विचार कधीच करत नाही..आपल्या हातातली कामा टाकून हा विचार करू नका असा मीम्हणत नाही ( मी करतोय कारण माझा हातात काम नाहीये , bench ह्या बिन कामाच्या नोकरी वर बसून ते हि पगार घेऊन ...
आणि मी जन्मल्यावर रडलो हि नसल्याने मला तशी विचार करायची गरजही नाहीये )
बर्याच लोकांना हा विचार करायची गरज हि वाटणार नाही..हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे...
पण निदान तुम्ही जाताना " मैं कौन था ? मैं यहा क्यू था ?" असा म्हणून जाऊ नका हीच इच्छा !!!!

Tuesday, October 4, 2011

सिनेमे जलन ....


Bf : सिनेमा पाहायला जाउयात ?

gf : हो जाऊ ना !

Bf : कुठला ? एखादा छान romantic ? तुला आवडतात ना तसे ..

Gf : वेडा-बिडा झालायेस का? आवडायचे !!! आता नाही...

bf : मग आता ?

GF : ढिशुम ढिशुम वाले ...सलमान,अजय,जॉन,...moustache men !!!!

bf : OK (मिसुर्डा हि ना फुटलेला चेहऱ्यावरून रुमाल फिरवत ...)

तर मित्र हो हि वेळ आलेली आहे.. मुलांनी माधुरी,राणी,ऐश्वर्या ह्यांना पाहण्यासाठी (खरा कारण वेगळा आहे ) सिनेमाला जायचे दिवस आता गेले..आता

Action films are back !!! Moustache men are roaring !

bodyguard - superhit !, wanted - superhit , Dabangg - Blockbuster , सिंघम- Superhit ,Ghazni - blockbuster !!!

सध्या जो बघेल तो ढिशुम-ढिशुम चे सिनेमे काढतोय..न ते चांगला धंदा पण करतायेत..जॉ अब्राहम चा 'फोर्से' नामक सिनेमा सध्या गाजतोय..थोडक्यात मारामारीयुक्त ची चांदी होतीये...इतकाच काय तर आपला 'romance king ' SRK पण पुढचे २ सिनेमे मारामारीचेच घेऊन येतोय ...

तर मुद्दा हा आहे कि मला सिनेमांची खूप आवड आहे..typical हिंदी सिनेमे..आणि अगदी लहान पणापासून मी theatre मध्ये जाऊन सिनेमे पाहिलेत

( आभार : आई-बाबा, ना वि वि )....म्हणजे मला कळायला लागल्यापासून मी सिनेमे पहिल्याचा मला आठवतंय..

मुळातच फालतू विषयांवर चर्चा करणे आणि फुकट वेळ घालवणे हे आवडते काम असल्यामुळे हे सिनेमे इतके का पैसे कमवू लागले न त्याही पेक्षा लोकांना का आवडू लागलेत ह्याचा विचार खूप डोक्यात घोळू लागला..

तर ह्या गोष्टीची सुरुवात होते १९३० पासून ...जेव्हा बरेच चे सिनेमे हे संत पट होते, किंवा स्वातंत्र्याशी निगडीत होते ( directly or indirectly )..

त्यानंतर १५ ऑगस्ट १९४७ चा दिवस उजाडला न सगळा छान छान वाटू लागला...१५० वर्ष बोर्डिंग स्कूल मध्ये राहिल्यावर सकाळी आपल्या घरी आपल्या बेड वर झोपेतून उठल्यावर जसा वाटता ना तसा..ह्याचे प्रतिबिंब सिनेमान मध्ये सुधा दिसले.. आता आपल्याला स्वातंत्र्य मिळाला ..सगळा कसा छान छान होणारे..फील गुड होता सगळीकडे..सिनेमे सुधा तोच फील continue करू लागले..लोकांना स्वप्ना दाखवणारे सिनेमे सुरु झाले..देव आनंद,दिलीप कुमार,शम्मी कपूर,राजेंद्र कुमार असे सगळे मिशी नसलेले हिरो लोकांना आवडू लागले..प्रेम कहाण्या,काश्मीर चे locations , college मध्ये नेहमी पहिला येणारा हिरो,मा का लाडला बेटा, बेहेन का प्यारा भैय्या ,नोकरी करणारा..काही अपवाद होते त्यातला एक मिशीवाला म्हणजे राज कपूर आणि दुसरा म्हणजे गुरु दत्त ..ह्या दोघांनी जरा वास्तविक सिनेमे केले..समाज,ग्रामीण समस्यांशी निगडीत गोष्टी सांगितल्या..हे साधारण १९६० च्या दशकात घडत होता..हरित क्रांती सारखे उपक्रम घडल्यामुळे भूक बळींची संख्या कमी झाली.."सुजलाम सुफलाम " ह्या घोषणा ऐकू येऊ लागल्या.. हा तेव्हा काही मारामारी सिनेमे पण निघाले पण ते भारत- चीन युद्ध ह्या वर आधारित होते..त्या व्यतिरिक्त मारा मारी म्हणजे तोंडाने "ढिशुम ढिशुम " असा आवाज काढून प्राण,प्रेम नाथ,प्रेम चोप्रा ह्यांना मारण्या पुरताच मर्यादित होती..त्यातूनच राजेश खांना नामक अजून एक बिगर मिशी वाला तरुण लोकांपुढे उभा राहिला आणि बाकी सगळ्यांना आडवा पडला..पोरी त्याच्या मागे फिदा होत्या.."superstar " हि ख्याती मिळवणारा हा पहिले हिरो..


१९७० ची सुरवात होती.. स्वातंत्र्य मिळून २५ वर्ष झाली होती.. पण नेहरू-शास्त्रींनी बघितलेली स्वप्ना पूर्ण होताना दिसत नव्हती..अन्नाचा उत्पादन वाढला होता पण रेशन मध्ये भ्रष्टाचार पण वाढला होता..

इंदिरा गांधी सत्तेवर आली आणि socialist mindset ने सरकार चालवू लागली.. तरुण लोकांना स्वप्ना दाखवली गेली होती.पण ती पूर्ण करण्यासाठी त्यांना ज्या संध्या मिळायला हव्या होत्या त्या मिळत नव्हत्या...सगळा छान होणार हे केवळ एक मृगजळ वाटू लागला होता.. एक आग आत मध्ये धुस्मात होती.. एक घुसमट होती,मनात एक चीड होती,license raj मुले तरुण उद्योजक हैराण झाले होते... JRD TATA पण ह्याला अपवाद नव्हते.. त्यांच्या 'महाराजा' ला देखील शरण यावा लागला होता..(आज त्याची काय अवस्था झालीये हे आपण पाहू शकतो )....


तो बुळबुळीत पण,खोटा गोड गोड वागणं,ह्यातून एक frustration बाहेर पडणार होता न ते पडला देखील..ते सिनेमातही दिसला..अमिताभ ची अंग्री युंग मन image , गुलझार चा मेरे अपने, सलीम-जावेद चा दिवार,शोले ,त्रिशूल,काला पथर ,शत्रुघन सिंह चा "खामोश" हा त्या भावना व्यक्त करत होता... कॉलेज मध्ये पहिले येणारे हिरो आता रस्त्यावरचे बूट पोलिश करणारे झाले..लहानपाणी एका पोळीचा तुकडा चोरताना पाळणारा मुलगा धावता धावता एक दागिना लुटून पाळणारा हिरो झाला.. पोलीस मागेच असतात..त्यातूनच emergency सारखे कलंक आपल्यावर फासले गेले..हीच स्तिथी १९८० मध्ये पण होती..सिनेमा अजून थोडा वास्तववादी झाला..ओम पुरी चा अर्ध सत्य असो किंवा नाना पाटेकरचा अंकुर..सनी देओल चा अर्जुन,घायल असो..चीड मनात होतीच...आणि ती पडद्यावर दिसत होती..लोकांना ते आपलासा वाटत होता....

१९८० चा शेवट आणि भारत कर्ज बाजारी झाला..पण त्या अंधारा मधेच एक आशेचा किरण दिसला..यशवंत सिंह ने आपली आर्थिक धोरण बदल्याचे पाऊल टाकले आणि ते नव्या पिढीला खूप उर्जा देऊन गेले..त्याच सुमारास अनिल कपूर ,जाकी श्रॉफ ह्या मिशी वाल्यांच्या मध्ये आमीर आणि सलमान हे बिगर मिशी वाले हिरो 'कयामत से कयामत तक' आणि " मैने प्यार किया " असे प्रेम कहाण्या घेऊन आले...आपला रोमान्तिक शाहरुख सुधा TV वर हात पाय मारतच होता...


आणि अखेर तो दिवस उजाडला..२० जून १९९१ भारताचा दुसरा स्वन्तान्त्र्या दिवस..मनमोहन ,मोन्टेक आणि चिदंबरम ने नवीन आर्थिक धोरण स्वीकारला..LPG (liberalisation ,privatisation ,globalisation ) ने भारताचा बाजार दुसर्या देशांसाठी खुला केला..

गुंतवणूक वाढली, उद्योजकांना प्रोत्साहन दिला.. पुन्हा सगळा छान छान होणार असा वाटू लागला..

IT ची झेप डोळे दिपवणारी होती...मध्यम वर्गीय माणूस आता mall , विमान, परदेश वारी ची स्वप्ना पूर्ण करू लागला...इकडे सिनेमान मध्ये आमीर,सलमान आणि शाहरुख पुन्हा स्वप्ना दाखवू लागले..

काश्मीर ची जागा आता switzerland नि घेतली..फुल blouse ची जागा आता स्लीवेलेस ने घेतली..विमानातून उतरणारा राहुल..पोरींना वेडा करू लागला..शांत प्रेम मुलींच्या प्रेमाच्या अपेक्षा वाढवू लागला... आता फरक फक्त एवढाच होता कि हिरो हा कॉलेज मध्ये उशिरा येणारा , नापास होणारा,पार्ट्य करणारा पण देवळात जाणारा,घरच्यांचा मान राखणारा असा portray होऊ लागला त्यामुळे सर्व सामान्य मुला देखील वेडी झाली....

१९९० चा दशक ह्याचा पुरावा होता.. DDLJ , HMHK ,KKHH ,DTPH असे सिनेमे तरुणाई ला त्या प्रवाहात ओढू लागले..

परत सगळा छान छान होणार असा वाटत असताना भ्रष्टाचार, बोंब स्फोट,दंगली,terrorist attack ..सुरु झाले..शिक्षण संस्था खूप सुरु झाल्या पण वशिले बाजी पण तितकीच बळावली..पैसे दिले कि काम होतात, पास होऊ,degree मिळेल ह्या सगळ्या मुले मध्यम वर्गीय सुशिक्षित तरुण हा बेरोजगार राहू लागला... हळू हळू frustration वाढू लागला..पुन्हा तीच चीड सुरु झाली....

मुंबई सारख्या शहरावर अनेक वेळा रेप केले गेले तरी मुंबई स्पिरीट च्या नवा खाली सगळ्या भावना मारल्या गेल्या..दुसर्या दिवशी नोकरीला ला गेलो नाही तर रात्री जेवायला मिळणार नाही ह्या भीतीने माणूस कामावर जाऊन लागला..कसला आलाय मुंबई स्पिरीट....

IT नि घेतलेली झेप २००२ मध्ये फटाका चा रोकेट कसा परत खाली येत ना तसा खाली आला..अनेक लोक पुन्हा बेरोजगार झाले..२००८ च्या मंदी ने तर कळस गाठला .. आपल्या कुवती पेक्षा जास्त कर्ज घेऊन स्वताचीच मारून ठेवली..आधी फक्त नोकरी नव्हती आता तर गहर हि जायची वेळ आली होती..परदेशात जाऊन शिकायची craze अंगावर आली..

परत सगळी चीड वाढली...मग प्रेम कहाण्या करणारे आमीर,शाहरुख आणि सलमान मिशी वाढवू लागले...त्याला साथ दिली अजय,अक्षय,जॉन ह्यांनी..

स्वप्ना चिरडली जाऊ लागली ...सगळी घुसमट पुन्हा बाहेर पडू लागली...सिनेमान मध्ये आग दिसू लागली...सिनेमाने ते ओळखला आणि त्यात पैसा कमवू लागले...त्याचा उत्तम उदाहरण म्हणजे bodyguard - superhit !, wanted - superhit , Dabangg - Blockbuster , सिंघम- Superhit ,Ghazni - blockbuster ..

सलमान झाला,आमीर झाला,अजय झाला ...आता लोक वाट बघतायेत शाहरुख ची ...

आणि मी वाट पाहतोय तिसर्या स्वातंत्र्याची आणि माझी मिशी वाढण्याची !!!

आशय