Saturday, October 17, 2009

My 'GF' - Guilt feeling....

स्थळ :-.शिवाजीनगर बस स्टॉप वेळ:- रात्री ७.३० एक माणूस साधारण 30-35 चा ,किरकोळ शरीर्यष्टी आणि हातात सूटकेस..
तो:-" हडपसर किती लांब आहे इथून?". .
मी :-" साधारण १५ की मी आहे." तो:- "रिक्षा ने . किती वेळ लागेल आणि किती रु घेतील??"
(.असे उगाच प्रश्ना विचारले की माझा डोका फिरता.) .मी (अत्यंत त्रसीक पणे):- 20मी आणि 70-80 रु
तो:-".आणि बस नि?"
मी( अजुन चिडून):- अर्धा तास आणि 25 रु तो:-"..आणि चालत??" मी (त्याच्याकडे लक्षा ना देता):-" 1.5-2 तास "
तो:-"धन्यवाद"(नंतर काहीच बॉलला नाही) .
पण काही क्षणा नंतर मला स्ट्राइक झला..परत ते शब्दा कानात घुमले.."चालत??" मी त्या माणसाकडे बघितला पण तो पर्यंत तो चालत निघाला होता..त्या गर्दीत तो मला दिसेनासा झाला ..मी सुन्ना होऊन त्या गर्दी मधे शोधत होतो .. .तो माणूस खरच चालत गेला??पुढे त्या माणसाचा नक्की काय झला ह्याचा सतत विचार माझ्या डोक्यात होता..कदाचित त्याची मानसिक आणि शारीरिक तयारी असेल देखील चालत जायची...पण मी जर त्याला 10 रु दिले असते तर माझ्यावर काही आभाळ कोसळणार नव्हता...त्याने भीक वागेरे सुधा मागितली नव्हती तरी मी इतका तुसडे पानाने वागलो.. आता ही काही फार मोठी घटना नाहीए पान तरी उगाच मनाला चूटपुट लाउन जानारे प्रसंग आहेत. हे जे येणार गिल्ट फीलिंग असत ना ते फार वाईट असत. ऐन दिवाळी च्या दिवशी असा का लिहितोय मी?? मला पण नाही माहीत पण गेल्या १ महिन्यात काही अशा घटना घडल्यात जुन्या गोष्टी आठवल्या आणि लिहावसा वाटला ...

नाव: अक्षय ताठे
वय: 22 माझ्याशी
संबंध:: आम्ही दोघा कॉलेज च्या एका फंक्षन साठी बंगलोर ला ५ (१०-१५ सप्टेंबर) दिवस एकत्र होतो..ओळख फारशी नाही..तो मला कॉलेज मधे एक वर्षा सीनियर पण वयाने १ वर्षा ने लहान .मूळचा नागपूरचा...मुंबईच्या एम बी ए कॉलेज ला अड्मिशन मिळून देखील त्याची गर्ल फ्रेंड पुण्यात असते म्हणून त्याने इथे अड्मिशन घेतली..रिसेशन च्या काळात देखील आय बी एम मधे प्री प्लेसमेंट ऑफर..घरात एकुलता एक. सगळा अगदी सेटल्ड ..एकदम मन मिळाउ. पण त्याच्या नशिबात काहीतरी वेगाळच लिहिला होत..१५ ला पुण्यात आल्यावर २० ला तो आणि काही मित्रा दिवे अगर ला गेले..पोहता येणार्‍यांपैकी हा एक..इतर ५ लोकं सोबत पाण्यात गेला..पण परत आलाच नाही..अचानक हाइ टाइड आली ,वाळू सरकली आणि तो अडकला..बाकीचे ४ वाचले पण हा नाही..असेल काहीतरी चुक पण ती एवढी महाग पडेल असेल कोणाला वाटला ही नव्हता..इतर ४ लोका १० दिवस कॉलेज मधे येउच शकले नाहीत ..आमचा जीव वाचला ह्या आनंदापेक्षा त्याचा जीव वाचावता आला नाही ह्याचा गिल्ट फीलिंग होता सगळ्यांना...
एक क्षण होत्याचा नव्हता करू शकतो..
वय वर्षा २२ ....

नाव:: अथर्व साठे
वय:१५ (१० वी) माझा
संबंध: माझ्या मैत्रिणीच्या बहिणी च्या वर्गात शिकत होता... शाळेत कायम पहिला ,पंडित विजय कोपरकरांकडे शास्त्रिया शिकायचा..कट्यार काळजात घुसली मधे अभिनय आणि गायन असा दोन्ही करायचा, १०वि तच आय आय टी चा ध्येय बाळगणारा..रविवार खडकवासल्याला सायकलिंग करत जाण्याचा प्रोगराम होता..थोडी प्रॅक्टीस हवी म्हणून घरातून सायकल घेऊन बाहेर पडला..मृत्युंजेश्वर जवळ पी एम टी ची धडक बसली आणि १२ दिवस कोमात गेला..काही दिवसांपूर्वी गेला.. त्या १५ वर्षाच्य पोराने काय इतका पाप केला की थेट जीव गमवावा लागला??
परत एक क्षण..
वय वर्षा १५.....
ब्लॉग मधे त्यांचा उल्लेख करायचा हेतू उगाच सहानू भूति किंवा आरेरे किती वाईइट झला अश्या रिॅक्षन अपेक्षित नाहीयेत..पण खरच एकदा आपण काय काय गोष्टी केल्यात ह्याचा विचार केलाय का??.. बरेच लोका म्हणतील की लाइफ खूप अनसर्टन आहे तर जे काही करायचा राहून गेला असेल तर ते करून घाया..एन्जॉय करा..पण त्याधी जर आपल्या हातून कोणी दुखावला गेला असेल तर एकदा सॉरी म्हणा,कोणी मदत केली असेल तर थॅंकस म्हणा...नाती जपा...आपल्याला समजून घेणारे,माफ करणारे खूप लोका आहेत..त्यांना जोडा..इमॅजिन करा दिवाळीत एक पण मेसेज,फोन नाही आला तर खरच दिवाळी वाटेल तुम्हाला?? अहो हे सण समारभ एकत्र येण्याचा एक कारण आहे..नका मिस करू ह्या गोष्टी.. रस्त्यात कुठे अपघात झाला असेल तर कोणी तरी येईल आणि हॉस्पिटल मधे नेतील असा म्हणून आपण अनेकदा त्यांच्या बाजूने निघून गेलॉय..हू केर्स ??? ह्या आटिट्यूड नि बराच वागलोय.. अनेकदा मित्राना,नातेवाईकानना भेटण्यात काही इण्टरेस्ट नाही म्हणून जरा काम आहे सो भेटटा नाही येणार अशी सरळ थाप मारुन घरात तंगड्या वर करून टीवी बघत लोळत पडलोय...का?? मित्रा ना सांगू शकत नव्हतो मी की बाबानो आज मला जाम बोर झाला आहे मी काही आज तुम्हाला भेटू शकत नाही...
३-४ महिन्यात एकदा क्धीतरी नातेवाईक भेटनार पण कुठे त्यांचे प्रश्ना ऐकायचे " नोकरी का सोडली?, किती वर्षा अजुन शिक्षण?? " त्यांच्याशी आमची फ्रीक्वेन्सी जूळत नाही असा आई ला कारण सांगून तिला खोट बोलायला लावायचा.. पण जर १ तास थोबाड् दाखवून आलो असतो तर काय एवढा आभाळ कोसळणार होता?? नंतर ह्या गोष्टीचा विचार करत बसायचा आणि मला गिल्ट फीलिंग आलाय असा म्हणायचा...

झाला गेला विसरून जा हे म्हणतात ते खराय पण जर आपल्याशी कोणी वाईइट वागला असेल तर ते विसरा..तुम्ही तसे वागले असाल तर लक्षात ठेवा.. असे विचार बर्‍याच सिनिमा,नाटक आणि साहित्यिकांन कडून ऐकले वाचले असतील..आज एका मित्राचा ऐका...सकाळी उठताना कुठलाही गिल्ट फीलिंग घेऊन उठउ नका...जर लक्षात येत नसेल तर आठवा..आणि आठवणीने फोन,मेसेज करा... आपल्याला दिवाळी आणि आयुष्या शुभ करायची संधी मिळलीये असा समजा ...
लाइफ खूप अनसर्टन आहे.
.एक क्षण पुरेसा ठरतो....
वय वर्ष......