Thursday, September 14, 2017

काल काळ्या गेला...

काल काळ्या गेला ..काळ्या sucker मासा  होता .. आता  guilt घेऊन  किंवा  वाईट  वाटून  उपयोग  नाही ..
फिश  टॅंक  आणला  त्या  सोबत  तो  आला  होता ..आईला  वाटलं  तो  मेलाय  म्हणून  त्याला  फेकून  देणार  इतक्यात  तो  हलला  ..त्यानंतर  गेले  ३  वर्ष  तो  होता ..
आकर्षण गोल्ड  फिश  होता  पण  काळ्या आपला  इमाने  इतबारे  टॅंक  साफ  करायचा ..गोल्ड  फिश  ची  घाण  खायचा ..आणि  आम्हाला  बरं वाटायचं  कि  त्याला  वेगळा  काही  खायला  द्यावा  लागत  नाही  आणि  मुळात  काही  दिवस  टॅंक  साफ  ना  केल्याने  काही  फरक  पडत  नाही ..काळ्या  आहे  ना ..
हळू  हळू  फिश  टॅंक  ची  excitement कमी  झाली  आणि  आई  वर  सगळी  responsibility अली ..एक एक  करत गोल्ड  फिश  पण गेले ..हा  एकटा  राहिला ..त्यासाठी  फिश  टॅंक  काही  महिने  तसाच  ठेवला  होता  पण  पंप  बंद  पडला  होता  , बल्ब  गेला  होता  पण  काळ्या  ला  काही  लागत  नाही  म्हणून  दुरुस्त  करायचे  कष्ट  घेतले  नाहीत ..
रेवा  आता  उभी  राहायला  लागलीये ..उगा  कुठे  तो  टॅंक  अंगावर  ओढून  घेईल  ह्या  भीतीने  तो  टॅंक  काढायचा  निर्णय  घेतला ..काळ्या  ला  एका  नवीन  कोऱ्या  डस्टबिन  मध्ये  पाणी  घालून टेरेस   वर  ठेवला  आणि  टॅंक  माळ्यावर .

टेरेस वर  ठेवल्यावर एखादा  पक्षी त्याला उचलून नेईल  असा  वाटलं  होता  म्हणून  त्यावर  एक  फळी  ठेवली ..नंतर  ती  काढली ..
हळू  हळू  पाणी  गढूळ  व्हायला  लागला ..आतला  काही  दिसेनासा  झालं ..

एक  दिवस  संध्याकाळी  आल्यावर  आई म्हणाली कि बहुतेक काळ्याला उचलला पक्ष्या ने ..थोडा  वाईट  वाटलं ...
मग  अजून  2-4 दिवसांनी  आई  टेरेस  वर  गेली  आणि  तिचा  धक्का  लागला  डस्ट  बिन  ला  आतून  हालचाल  जाणवली  ..

मला  कळल्यावर  आनंद  झालं ..guilt निघून  गेलं.गणपती  विसर्जनाच्या रात्री अंधारात मी त्या डस्ट  बिन मधलाकाळ गढूळ पाणी काढलं आणि  नवीन  फ्रेश  पाण्यात त्याला सोडला आणि  पुन्हा  टेरेस  वर  ठेवलं..

ऋतिका ने  एक  aquarium  च्या  दुकानात  चौकशी  केली  तर  ते  म्हणले  कि  संभाजी  बागेत  किंवा  ताथवडे  उद्यानात  मासे  घेतात .. मी  हो  म्हणलं  आणि  काही  केलं  नाही .. संभाजी  बागे  समोर  ऑफिस  असून  काही  केलं  नाही  आणि  दर  शनिवारी  रविवारी  ताथवडे  शेजारी  2-3 तास  चहा  प्यायला  बसायचो  तरी  काही केला नाही ...


गेल्या  आठवड्यात  भयंकर  पाऊस  झालं ... एकदा  आला  डोक्यात  कि  गच्चीत  चक्कर  मारावी ...पण  काही  केलं  नाही ..

काल  रात्री  घरी  आलो ..ऋतिका  ला  म्हणलं  कि  मी  आज  linkedin वर  मेलबॉर्न मधले  जॉब  opportunities शोधात  होतो . एकुणातच  मला  ते  शहर  फार  आवडलंय . त्यावर  एक  वाद -चर्चा -संवाद  झालं ...इथली  लोकांपासून लांब जायचं का ? तुला मिसळ कुठे मिळणार?
मी म्हणलं कि फक्त option बघत  होतो  ..कुठलाही  निर्णय  घेतला  नाहीये ..

झोपताना  आई  म्हणाली  आज  काळ्या  खरंच  गेलं ..त्याला  झाडाच्या  कुंडीत  ठेवून  दिलाय  खत  म्हणून . त्याचे  कधी  काही  नखरे  नव्हते , कधी  विशेष  लक्ष  द्यावा  लागला  नाही ..त्याने  काही  डिमांड  केला  नाही ..माझा मलाच राग येत होता..

झोपताना विंदांची कविता वाचत होतो
"कधी  धावतो  विश्व  चुंबावयाला
कधी  आपणाला  स्वहस्तेच  शापी"

रात्री  मला  माझ्या  आजूबाजूची  सगळी  काळी  माणसं  दिसायला  लागली ...

Sunday, March 26, 2017

रविवार सकाळ!

रविवार सकाळ-
(ह्या लेखाचा आणि पु.लंच्या लेखाचा काही संबंध नाही. माझी सकाळ त्यांच्या इतकी समृद्ध आणि सांस्कृतिक नाही पण अगदी सामान्य नक्कीच आहे म्हणून हा घाट !)

माझी सकाळ मुळातच ९.३० ला सुरु झाली.आता ह्याला सकाळ म्हणावी हा वेगळा मुद्दा आहे. असो.आणि त्याचा सगळं श्रेय माझ्या बायकोला आणि मुलीला जातं कारण त्या दोघी माहेरी गेल्यात.त्या असत्या तर कदाचित ५-१० मिन आधी उठलो असता इतकच.

सकाळी उठून हातात चहा , पेपर मध्ये असणाऱ्या त्याच त्याच आणि नकोश्या बातम्या , टीव्ही वर क्रिकेट. तासभर निवांत गेल्यावर सोसायटीची ११ ला मीटिंग आहे हे आठवला (मीच सेक्रेटरी आहे).पण कोणीतरी नोटीसच फाडून टाकली आहे असा कळलं याने एक असुरी आनंद झाला. योगायोग बघा कि मीटिंग घ्यायचा कारण बिल्डिंग मध्ये होणारे काही उपद्रव यासाठी  CCTV  कॅमेरे लावण्याबाबत चर्चा  करणे हे होता.

११ची मीटिंग होत नाहीये म्हणल्यावर आता काय करावे हा मुद्दा होता.तेव्हा आपल्या डोक्यावरची अजून एक जबाबदारी आहे ती कमी करावी हे लक्षात आलं - 'कटींग'

वारजे मधले सगळे सलून ट्राय केले होते आणि सध्या डोक्यात असलेला 'explore' करण्याचा भूत घेऊन कोथरूड च्या दिशेने निघालो.  'पायल मेन्स पार्लर' हि पाटी दिसली.
नाव नक्की काय आहे हे बघण्यासाठी मी थांबलो तर त्या दुकान बाहेर २-३ लोकं होती. गर्दी असेल म्हणून मी निघणार तितक्यात एकाने मला हाथ केला आणि बोलवून घेतले.माझे उभे राहिलेले केस बघून त्याला समजलेला असावा. सारसबागेतल्या पाव भाजी स्टॉल वाल्यांची आठवण अली. तिकडे फिरताना प्रत्येक स्टॉल च्या बाहेर एक माणूस मेनू कार्ड घेऊन आपल्याला जमलं तर आत ओढून न्यायच्या प्रयत्नात असतो.हे तसाच काहीसा होतं.

आत गेल्यावर माझं लक्ष नेहमी टेबल वर ठेवलेल्या मासिकांकडेच जातं . कित्येक वर्ष मी कटिंग ला केवळ त्याच कारणासाठी जातो आणि वेळ काढून जातो. आता ती मासिके बघितल्यावर लक्षात येत कि काही स्वप्न कधीच पूर्ण होणार नसतात. हा विचार आणि हातात मासिक चाळत असतानाच AC ची थंड हवेने अंगावर काटा आला.
मी खुर्ची वर जाऊन बसलो.सगळीकडे L'oreal चे प्रॉडक्ट्स होते, reclining खुर्च्या,चकाचक बेसिन ,२.१ सौउंड सिस्टिम .पुढचा एक तासभर मस्त जाणार याची खात्री होती.
ज्या मनुष्याने मला आत बोलावला तो स्वतः आत आला आणि माझी कटिंग तो करणार होता.त्याने ड्रॉवर मधून एक काळं कापड काढलं आणि माझ्या मानेभोवती बांधला . समोर आरश्यात बघून मी उडालोच. त्या कापडावर एक 'blonde' चा मोठा फोटो होतं. माझी नजर आरशावर खिळून राहिली . मला सेट करून तो मागे वळला आणि तोंडात एक पुडी टाकली, आणि रिमोट ने साऊंड सिस्टिम सुरु केली.
आणि कुमार सानू च्या आवाजात 'हेssss...हेsss' हे स्वर कानावर पडले.
एक्दम २ विरोधाभासी गोष्टी घडल्यामुळे मी भानावर आलो.
"सर ,कशी कटिंग करायची ?"- असा पुडीयुक्त प्रश्न ऐकलं.
"मिडीयम "
"मिडीयम" हा एक विलक्षण शब्द आहे. सांगणारा आणि करणारा दोघेही सेफ असतात.पाणीपुरी कशी हवी- मिडीयम,कटिंग कशी- मिडीयम ,कल्ले कसे ठेऊ- मिडीयम ,अंघोळीला पाणी कसा हवा - मिडीयम , प्यायला पाणी कसा देऊ - मिडीयम.

"वेगळी style करू का?"
"नको"- मी
"अहो मस्त केस वाढलेत.बघा ह्यात " असा म्हणत त्याने मला एक brochure दिला. चित्र विचित्र styles होत्या.सध्या असे बरेच लोकं मी डियो वर ट्रिपल सीट फिरताना बघतो.मी त्यातला नाही हे दाखवण्यासाठी हे कट नकोत.
"करून तर बघा.महिन्याभराचा प्रश्न आहे.हे नको असतील तर विराट कट, अक्की कट ?"
"नको म्हणलं ना"
त्याला सगळं समजला च्या आवेशात त्याने कंगवा ,कात्री घेऊन सुरु केलं. machine वगैरे मारून झाल्यावर त्याने अगदी प्रेमाने डोक्यातून हाथ फिरवला.
"ओके?"
"ओके !"- मी उगाच आरश्यात मान वाळवून म्हणालो.
खरंतर आहे ते केस मी फक्त कमी केले होते. ना त्याला काही वळण होतं ना 'style'. त्याने मागून पण एक आरसा धरला ..मला काही कळत नव्हतं तो काय दाखवतोय पण मी आपला हो बरोबर आहे म्हणून सोडून दिला.

"दाढी,तेल मसाज ?"

"अ..." मोबाईल मध्ये वेळ बघितली. ११.३० . match मध्ये जस्ट लंच झाला असेल सो अजून अर्धा तास आहे.
शेजारी बसलेला अजून एक ग्राहक मस्त चंपी करून घेत होतं. त्याचे बंद झालेले डोळे बघून मला पण राहवलं नाही.

"शेजारी आत्ता हे केलं ना डोक्यला ते करा "( हॉटेल मध्ये पण शेजारच्या टेबल वरचा बघून ऑर्डर करतो )

"तेल कोणता ?"-तो
"तुम्हीच सांगा "-मी
"थंडा थंडा "-तो
l 'oreal च्या बाटल्यांमधून त्याने एक नवरत्न तेलाची बाटली काढली. ती धार त्याने डोक्यावर सोडल्यावर 'अहाहा' झालं.माझे दोन्ही डोळे आपोआप बंद झाले. शंकराने आपला तिसरा डोळा उघडू नये म्हणून शिवलिंगावर गार दूध ओतत असतील असा उगाच मला वाटलं.
हे सगळं सुरु असताना मागची गाणी काही थांबायचं नाव घेईनात. कुमार सानू, मोहम्मद अझीझ, नितीन मुकेश, 'अ-शास्त्रीय' सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल,अलका ताई, कविता काकू यांची सुमधुर प्लेलिस्ट सुरु होती." तुझे ना देखू तो चैन मुझे आता नाही है ","पेह्ली पेह्ली बार मोहब्बत कि है", "धीरे धीरे प्यार को बढाना है ", "ना काजरे  कि धार ना मोतीयो कि हार" असे एक से एक गाणी होती.

"कल कॉलेज बंद हो जायेगा  तुम अपने घर को जाओगे" .असा एक काव्याने भरलेले गाणं ऐकल्यावर माझं patience संपला. सकाळीच कवी ग्रेस यांचा आज स्मृतिदिनावरचा लेख वाचून आलो होतो. सांस्कृतिक अध:पतन झाल्यासारखा वाटलं.
मी न राहवून विचारला.
"का हो..हि प्लेलिस्ट तुम्ही स्वतः बनवलेत का?"
"नाही हो आमच्या गावाकडे readymade  CD मिळतात."
"कुठला गाव ?"
हे ऐकल्यावर त्याने पुडी ची पिंक बेसिन मध्ये मारली आणि पाणी सोडला.
"उस्मानाबाद . एकदम relaxe  वाटतं ना ऐकताना ?"
त्याचा उत्साहित आवाज आणि डोळ्यातील चमक बघून मी हो म्हणालो.
त्याने अजून उत्साहात चंपी सुरु केली.
मान वाळवून कडकड मोडली. अक्षय कुमार च्या खिलाडी सिनेमाची आठवण आली.मग त्याने माझं कान टॉवेल मध्ये धरून मोडून दाखवला तेव्हा मला सरफरोश मधल्या त्या शेळी सारखा वाटलं जिचा कान गुल्फम हसन ने कापला होतं.
मी आधारासाठी काही तरी शोधात होतो तेव्हा आरश्यात मागे स्वामी समर्थांचा फोटो आणि वाक्य दिसला.
"भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे" आता हे वाक्य मला भिऊ नको म्हणून होतं कि माझ्या पाठी मागे सगळे प्रयोग करणाऱ्या त्या कटिंग वाल्याचा होतं हे कळेनासा झालं.
मी फारसा विचार करणं सोडून दिला.

१० मिनिटांनी मला जाग आली. एका ग्लानीत होतो मी. आणि serene वाटत होतं.

त्याचा निरोप घेऊन घरी आलो.
दुपार झालीये. डोक्यात शांतता आहे..दर महिन्याला मी कटिंग करतो पण एखादा काम उरकल्यासारखा. पण ते इतका छान असू शकता असा वाटलं नव्हता. आपला डोकं एखाद्या माणसाच्या हातात द्यावा आणि निश्चिन्त व्हावा.म्हणलं तर किती विरोधाभासाच्या गोष्टी होत्या पण तरीही तिथून बाहेर पडताना 'relaxed ' होतो.

हेअर कंडिशनिंग सारखा brain unconditioning काही निघाला तर फार बरं होईल.
निदान मी वेगळी हेअर style तरी ट्राय करेन.मध्ये इन्व्हेस्टमेंट च्या एका सेमिनार ला एक जण म्हणाले होते कि सध्या आपण 'community ' मध्ये राहतो 'crowd ' मध्ये नाही. आणि crowd  इस रिऍलिटी. त्या दुकानात जे मी बघत होतो ते म्हणजे रिऍलिटी आणि virtual रिऍलिटी मधला फरक होता. रिऍलिटी shows च्या गोंधळात थोडा रिऍलिटी चेक दिसला इतकाच .IT मध्ये नोकरी करत असल्यामुळे US कडे लक्ष आहे पण USmanabad मध्ये काय चाललंय ह्याचा काहीच अंदाज नाहीये.

असो रविवार सकाळ इतकी वैचारिक गेल्यानंतर निदान दुपार सत्कारणी लावतोय . कलकत्ता सादा पान , चमन चटणी युक्त पुडी मुखात सरकवली आहे , रेडिओ वर 'nostalgic nineties ' ऐकत डोळे बंद होतायेत.

खास  तुमच्यासाठी  काही  एपिक  गाणी !
https://www.youtube.com/watch?v=guxbAb6p81Y
https://www.youtube.com/watch?v=cJf1pzCnBx4
https://www.youtube.com/watch?v=Y2n-SuONw7E
https://www.youtube.com/results?search_query=dil+jigar+nazar+kya+hai