Saturday, November 14, 2009

Job Satis'FAKE'tion

साल १९८०:-"मुलगा टाटा मोटर्स (तेव्हाचा टेलको) मधे लागला की घराला लाइटिंग !! रीटायर होई पर्यंत चिंता नाही "(हे वाक्या एका प्रख्यात शास्त्रिया गायकचा आहे माझा नही)

साल २०१० :-"मुलगा एका कंपनी मधे १ वर्षाहून जास्त वेळ टिकला तर घराला आणि कंपॅनिला दोघांनाही लाइटिंग !!!"(हे माझा आहे) गेल्या ३० वर्षांमधला हा फरक..
कारण :-" जॉब सॅटिस्फॅक्षन " (असा आजच्या / आमच्या / आपल्या पिढीचा म्हणणा आहे) आहे तरी काय हे जॉब सॅटिस्फॅक्षन ??कशावर डिपेंड करता??
१) तुमची कंपनी?
२)तुमचे सहकारी?
३)तुमचा पगार?
४)तुमचा काम?
५)तुमची इच्छा??
वरचे मुद्दे म्हणले तर एकमेकात गुंतलेले आहेत किंवा म्हनला तर अगदी वेगळे सुधा आहेत..
उ १) कंपनी- company is a artificial person created by law having seperate legal entity हे कंपनी चा पुस्तकि डेफिनेशन आहे..त्यामुळे जी गोष्टा मुळात अस्तित्वातच नाही त्याच्या मुळे नोकरी पकडना आणि मग सोडना हे जरा ना पटण्यासारखा आहे..त्यामुळे कंपनी चांगली नव्हती हे तर कारण होऊच शकत नाही
उ २) सहकारी :- एका स्मधे हे निष्पन्न झाला की जॉब स्विच किंवा सोडण्यमागे सगळ्यात महत्वाचा कारण म्हणजे त्यांचे बॉस , आणि इतर सहकारी हे आहे (MBA मधे आधी हेच शिकवला) पण लोकांचा काय घेऊन बसता ? आज आहेत ते उद्या नाहीत..आणि काय गॅरेंटी की दुसर्या कंपनी मधे तसेच लोका नसतील? त्यामुळे हे कारण सुधा जरा पटत नाही..
उ ३) पगार :- इतके दिवस वाटत होता की पगार हा सुधा एक मोठा घटक आहे ..पण गेल्या वर्षी सुरू झॅलेल्या "रिसेशन"/स्लोडाउन " मधे हा घटक सुधा दुय्यम वाटायला लागलाय..खूप जास्त पगार देणार्‍या नोकर्‍या बुडल्या..

उ४) काम::हा थोडा कळीचा मुद्दा आहे..कारण सध्या कुठला ही इंजिनियर सॉफ्टवेर मधे चालतो..त्यामुळे वर्षभराणंतर त्यातला इंट्रेस्ट कमी होणा साहजिक्कच आहे..पण तरीही एकदा सॉफ्टवेर चा शिक्का बसला की पुडे आपल्या आवडत्या फील्ड मधे परत काम करता येईलच असा नाही..

उ ५)इच्छा :: हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे माझ्या दृष्टीने .भलेही तुमचा बॉस ,सहकारी वाईट असुदेत पण जर तुमची खरच काम करायची इच्छा असेल ना तर मग कारकुनी नोकरी सारखी १०-५ , कुणाच्या अध्यात ना मध्यात पडता मुंडी खाली घालून काम करून निघायचा..पण काही वेळा इच्छा असते पण ह्या इतर बाबी इतक्या डोक्याला त्रासदयक असतात किती सोडून गेलेला बरा असा वाटायला लागता..पण जसा म्हनला की हे मुद्दे अगदी वेगळे सुधा आहेत किंवा अगदी गुंतलेले सुधा.. आता कारकुनी लोकाबद्दल सांगायची काही गरज नाही..कारण त्यांना बर्‍याचदा गरज असते म्हणून तसा काम करावा लागता पण काही लोका असतात जी अनेक वर्षा अगदी आवडीने तेच काम ना कंताळता ,कितीही खवचट लोका त्यांच्या आयुष्यात येउदेत ते काम करतच राहतात..

अशी ५ लोका मी बगीतलियेत(मार्केट रिसर्च केलाय :))
१) देव आनंद(का?? सांगतो)
२)पंडित जसराज
३)एम एफ हुसैन
४) सचिन तेंडुलकर
५) एन एम कुलकर्णी(पुण्यात ११वि-१२वी चे गणिताचे क्लास घेतात)

आता हीच लोका का? तर ५ही लोका थोड्या का होईना वेगळ्या फील्ड मधली आहेत..म्हणजे कला-क्रीडा ते अगदी प्रोफेशनल पर्यंत

उ १) देव आनंद: भारतीया चित्रपट सृष्टी मधले अनेक दिग्गजान्मधून ह्याचीच निवड का केली?? तर त्या मागे काही ऑब्ज़र्वेशन्स आणि सर्वे आहे..देव आनंद हा त्रिमूर्ति मधला एक म्हणजे १९५०-६० च्या दशकात देव-राज-दिलीप ह्या तिघांनी राज्या केला..सगळे एक्से एक सिनेमे..त्यातून देव अनाद चे गाइड ,ज्यूयेल थीफ सारखे अजरामर सिनेमे(बघितले नसतील तर जरूर बघ) देव आनंद चा शेवटच हिट सिनिमा म्हणजे हरे राम हरे कृष्णा (१९७०) त्यानंतर आजतगाय्त त्याचा एकही पिक्चर हीट काय थियेटर मधे सुधा लागला नाही पण तरीही त्याने सिनिमा काढायचा थांबवला नाही..दर २ वर्षाला एखादा तरी बोगस पिक्चर तो काढतोच..का?? काय हौस आहे एवढी??एखादा असता तर सन्मानने रिटाइयर्मेंट घेतली असती आणि अवॉर्ड फंक्षन ला म्हणा किंवा गेस्ट अपीयरेन्स देत बसला असता एखादा ...पण नाही..इच्छा !!!लोका काही म्हणू देत मी पिक्चर काढणार लोकांना आवडू दे अथवा नको मला आवडता मी काढणार.. हे म्हणजे जॉब सॅटिस्फॅक्षन !!!

उ २) पंडित जैसराज:: संगीत मार्तंड हा मान मिळवणारे..वय वर्षा ८०+ ..सगळा आयुष्या गाण्याचा रियाझ , मैफिली ह्यात गेला अनेक सण समारंभला ते गायला असत..पण उमेदि,कमवण्याच्या वयात ठीक पण अजूनही दिवाळी पहाट ला कुठे तरी त्यांची मैफिल असतेच..का?? छान घरी बसावा सण साजरा करावा,अभ्यांग स्नान,फराळ करावा..पण नाही..अजूनही तीच स्वर साधना..तीच इंटेन्सिटी . श्रोत्यांना मंत्रमुग्धा आणि स्वाताचा आत्मा सुखी करण्याची इच्छा ...कोणी ऐकायला येऊडे किंवा नको..मी गाणार हे म्हणजे जॉब सॅटिस्फॅक्षन!!!

उ३)एम एफ हुसैन वय वर्षा ९४..इतके वर्ष चित्रा काढली पण ह्या वयात नुसता ब्रश जरी हातात धरला तरी थारथरण्या मुळे आपोआप चित्रा काढला जाईल..आणि इतका नाव ऑलरेडी झॅलेला आहेच की काही जरी चित्रात असला तरी ते मॉडर्न आर्ट म्हणून करोडो रुपयन्ना विकला जाईल..पण तरीही काहीतरीई भन्नाट चित्रा काढून त्यावर होणारी कॉँट्रोवेर्सीला तोंड द्यायला तयार.(भारत मातेचा नग्न चित्रा त्यांनी काढला होता..त्यावरून वाद होणार हे त्या पेंटिंग मधल्या भारत मातेल सुधा माहिती होता..)तरी ते चित्रा काढला ..कारण इच्छा!!! अरे हो तो गजगामिनी चा उल्लेख राहिलाच..त्यात माधुरीची ची पाठ त्याने २०मिन दाखवली होती..असो तो सिनिमा त्यांच्या चित्रान्न सारखाच होता.. हे म्हणजे जॉब सॅटिस्फॅक्षन

उ४) सचिन तेंडुलकर:: एकदिवसीया मधे १७०००+ धावा (२रा नंबर ला कोण आहे ते माहीत नाही पण त्याच्या १२००० धावा आहेत फक्ता) सेंचुरीस:४५ (२रा -२६ सेंचुरीस) टेस्ट मधे थोडी कॉंपिटेशन आहे..पण तरीही पॉंटिंग खेळपर्यंत सचिन खेळेल..त्यामुळे फारसा टेन्षन नाही.. आज त्याला २० वर्षा झाली डेबु करून...किती लोकांचे करियर त्याने बघितले,कपिल देव पासून ते ईशांत शर्मा,रवि शास्त्री पासून अमित मिश्रा आणि त्यामधे येणारे किमान २०० खेळाडू त्याने बघितले असतील..मॅच फिक्सिंग चा प्रकरण,वर्ल्ड कप फाइनल मधे हार,२००७ मधे आधीच बाहेर पडले ,सिड्नी टेस्ट मधली कॉंट्रोवर्सी अशा गोष्टी आहेत..इनकम तर विचारायलाच नको..एखादा असता तर मस्त रिटाइयर्मेंट घेऊन कॉम्मेंटर्य करत बसला असता..पण नाही अजूनही तीच १६ वर्षा च्या मुलसारखी एग्ज़ाइट्मेंट ..उलट जास्त जोश,शेवटचे काही दिवस राहिलेत त्यामुळे अजुन जास्त पेटून खेळतो तो..परवाच्या १७५ च्या इन्निंग बद्दल तर काही बोलायलाच नको..३५० चे बरोबर अर्धे १७५ त्याने केले आणि बाकीच्या १० लोकांना तेवढे सुधा करता आले नाहीत.. त्याचा खेळ पाहून १६ वर्षा चा energitic मुलगा २० वर्षाचा अनुभव आहे असा खेळात होता.. का???इच्छा!!! हे म्हणजे जॉब सॅटिस्फॅक्षन...

उ५)एन एम कुलकर्णी::हे उदाहरण घायचा कारण की मी स्वता ह्यांना काम करताना बघितलाय..आधीचे ४ लोका कायम बातम्या किंवा टी वी माधेच बघितले...हा माणूस गेले १५-२० वर्षा गणिताच शिकवटोय न ते सुधा फक्ता ११-१२वी..सकाळी ५.३०ला पहिली बॅच सुरू होते ते रात्री १०.३० ला संपते.. १० बॅचस १२वी च्या आणि ३-४ ११वी च्या..आम्ही त्याच्या आन्यूयल इनकम काढला होता २००१ साली..तर सगळा कट करून ५५-६०लाख त्यांच्या हातात पडत असतील..आता असा असता तर २ वर्षा नंतर सगळा सोडून आरामात कोट्याधीश होऊन राहीले असते..पण नाही सकाळी त्याच लॅडीस साइकल वर येणार,गुरुवारीच सुट्टी देणार न फक्ता दिवाळीचय २ सुट्ट्या..असा त्यांचा दिनक्रम.. का?? इच्छा!!! ह्याला म्हणतात जॉब सॅटिस्फॅक्षन...

हा बराच चर्चेचा विषय आहे..त्यामुळे चर्चा झाल तर उत्तम..इतरांशी नाही तरी स्वतशी चर्चा करा..नक्की काय हवाय???माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोचल्या असतील तर तुमच्या भावना कळू द्या जर नसतील काही तर भाव ना देता वाचा आणि जर उत्तर मिळाला तर मला पण सांगा..तेवढाच मला सॅटिस्फॅक्षन मिळेल :)