Saturday, August 15, 2009

Y'Z" bridge ???

मला 100% खात्री आहे की जवळपास सगळ्यांनीच ह्या शीर्षकाचा नको तो अर्थ घेतला असणारे..पण त्याला काही इलाज नाही कारण आपली मेण्टालिटच तशी झाली आहे..असो पण तुम्हाला जसा वाटताय तसा ह्याचा अर्थ आत्ता तरी घेऊ नका..मी शीर्षक एस एम एस लॅंग्वेज मधे लिहिला आहे..'वाय झेड ब्रिड्ज म्हणजे व्हाय ज़ेड ब्रिड्ज ?? असा म्हणायचा होता मला..आता ह्या विषयावर ब्लॉग का लिहावसा वाटला मला तर त्याला कारण मला बर्‍याच दिवसांपासून पडलेले प्रश्ना आणि त्या पूलावर घडणार्या गोष्टी आहेत...पुण्यातील सगळ्यात गजबजलेल्या 2 रस्त्यांना जोडणारा हा पूल. लक्ष्मी रोड आणि जे एम रोड . तसा बघितला तर लाकडी पूल(जो आता लोखंडी आहे), ओंकारेश्वर चा पूल असे 2 पूल ह्या रोड वर आहेत .पण झेड ब्रिड्ज चा विशेष कौतुक आहे...तुम्ही जे एम रोड वरुन त्या पूलवरून निघालात तर गेल्या गेल्या लगेच डावीकडे त्या पूलाने पोक काढले आहे..हे बघितल्यवर लक्षात येता की हा पूल खूप विचार करून बांधण्यात आलेला अहे. ती पोक आलेली जागा केवळ प्रेमी युगूलनसाठी चा कट्टा आहे. कॉर्न वाले,भेळ वाले ह्यांचा जबरदस्त खप होतो त्या ठिकाणी..उद्या जर एखादा झेंडेवाला सुधा तिकडे उभा राहिला(15 ऑगस्ट,26 जानेवारी व्यतिरिक्ता) तर त्याचा सुधा खप होईल..अहो तिकडे येणारे लोका दिल्दार असतात..ते इतके खुश असतात की इतरांना ही खुश करत असतात(अर्थात वेग वेगळ्या पध्धतिने)...बर्‍याच वेळा त्या पूला वरुन गेलॉय..अजुन एक गोष्टा लक्षात आली ती म्हणजे त्याचा फूटपाथ हा त्याच्या रस्त्या इतकाच रुंद आहे..म्हणजे नगरपालिकेचा खरच कौतुक केला पाहिजे..ह्या अश्या युगुलांनसठी बांधलेला हा स्पेशल पूल...2 मन एकत्र आणणारा हा पूल..आता मला सांगा पुण्यातले बाकी सगळे पूल सरळ आहेत हाच एक का तेवढा लांब आणि झेड ह्या अकारचा??अजुन एक बेसिक प्रश्ना आहे मला सिविल इंजिनीर् लोकांना..पूल हा कायम सरळच का बांधतात?? तिरका नाही का बांधून चालत??.. असो तर मुद्दा काय आहे की काही लोका जी खूप आरडा ओरड करताहेत की पूलवर असंख्या जोडपी बसलेली असतात त्यांना तिथून हाकलला पाहिजे..अहो पण का?? तुम्ही गाडी फूटपाथ वरुन चालवता का रस्त्यावरून?? रस्त्यावरून जाताना ते काय करतायत हे काही दिसत नसता..एकदूम सिस्टेमॅटिक असता सगळा..गाडी फूटपाथ च्या कडेला पार्क करतात आणि इंजिनच्या मागे बसून स्वाताचा इंजिन सुरू करतात...कधी भाजत नाही का त्यांना?? असो रस्त्यावरून काही दिसत नाही म्हणल्यावर मी एकदा फूटपाथ वरुन पण चालत गेलॉय काही दिसता का बघायला अहो पण खरच सांगतो काहीच दिसत नाही..मला काय तर त्यांना सुधा एकमेकांचे चेहरे दिसत नाही(प्रेम आंधळ असता ह्यालाच म्हणत असतील)..हा अपवाद फक्ता काही दिवसांच्या जेव्हा तिकडे सर्कस आणि जत्रा भरते तेव्हा..तेव्हा अगदी लखकलखीत प्रकाश असतो... ज्या लोकांना ह्या प्रेमी युगुलांवर राग आहे त्यांनी कृपया आपल्या गाडी चालवण्यावर लक्षा द्यायवे...साहजिक्कच आहे जुन्या पिढीला हे पचवण आणि बघणा अवघड आहे ..अहो पेठेतल्या संस्कृती आणि जे एम रोड च्या मॉडर्न आणि पश्चिमच्या संस्कृती ला जोडणारा हा पूल आहे..आणि पुलाची लांबी लक्षात घेता पेठेतल्या लोकांना जे एम रोड वर जायला थोडा तरी वेळ लागणारच ना..थोडक्यात काय की त्या पुलाचा आलेला पोक,त्याची लांबी(अनेक जोडप्यांना सामावून घ्यायची त्याची क्षमता),त्याचा रुंद फूटपाथ यामुळे WHY 'Z' bridge ह्याचा उत्तर मिळता पण ज्यांना अजूनही त्यावर चालणार्‍या गोष्टींचा राग आहे त्यांच्या साठी मात्र हा Y 'Z' bridgech राहणार आहे....

6 comments:

  1. some very good points!! civil engg query, cultural gap in Peth and JM road, 15 aug ani 26 jan nastana pan flags business chalne, and the best of it all - ur title 'Y' 'Z' Bridge!! nice post overall!

    ReplyDelete
  2. मजा आली पोस्ट वाचताना! तू blog लिहितोस हे माहित नव्हतं!
    अगदी ओघवतं लिहिलं आहेस.
    निनादने सांगितलेले मुद्दे मलाही आवडले. शिवाय "फूटपाथवरून चालताना तरी दिसतं का ते पाहिलं " यासारख्या वाक्यांनी post मध्ये "आशय" दिसतो आहे.

    ReplyDelete
  3. hey nice topic, and well dicussed, and appropriately presented, jst one suggestion - jst increase the font size a bit.

    ReplyDelete
  4. @sooraj:: i tried it but i guess this template doesnt hav that feature..will try it again next time...

    @mak::post madhe ashay disto mhanje nakki mhanaycha kay ahe tula?? :)

    @ninad:: thnks buddy!!!

    ReplyDelete
  5. arre ..bhari ahe blog khupach. maja ali vachatana... and I am just curious.. why are you advertising so much about its 'fayade'? swanubhava-varun? tu pan gadi chya engine chya mage asatos ki kay kadhi kadhi? :)

    ReplyDelete
  6. Hey buddy... I didn't know you were such a nice writer.. neatly presented.Bharpur divsaani kahitari changla wachlay te hi marathi madhe :D.

    ReplyDelete