Sunday, August 2, 2009
"काका"
"काका" शालेत ब तुकडी मधे दात पुढे आलेला एक मुलगा म्हणून ओळखायचो त्याला आमच्या वर्गातल्या मुलांनी रॅबिट हे टोपण नाव ठेवल होता तसा बोलण्यातून फारसा कधी संबंध नाही आला पण तोंड ओळख होती 12वि नंतर अचानक हा गडी दिसला तो सिओइपी मधे 4त्या राउंड च्या लाईन मधे .तो पण माझ्यासारखीच कोणतीही ब्रांच घ्यायला तयार होता.. हा मुलगा 4 वर्षा सतत सोबत होता..आधी विकृत ग्रूप न मग नंतर नाटकाच्या ग्रूप मधे जॉइन झल्यामुळे हा टेप ड्ब्बल साईडेएड आहे हे लक्षात आला.. तसा 4 वर्षात त्याच्यात खूप बदल झला..बाहेर असलेले दात आत गेले न आत असलेला पोट दिसण्या इतपत बाहेर आल. गणपती मिरवणुकी मधे सुधा कोपर्यात उभा राहून न ते ही निंबाळकर ताल्मईच्या मिरवणुकीत स्वता सदाशीव पेठी असून सदाशीव पेठी मुलींकडे दुर्लक्ष करून मन्या न पश्या ह्यांच्या हालचालइंवर लक्ष्य ठेऊन असायचा न युनिक स्टायइल मधे हसायचा आधी फक्ता हवा बाहेर निघायची मग आवाज..एकदा मान्या कडून तो मार सुधा खाणार होता पण शिवी वरचा निभावल..तर असा हा नाच न करणारा नंतर साल्सा चा क्लास लावला न नाचायला लागल्यावर खुद्द गणपती डॅन्स करतोय असा वाटायला लावणारा 'काका' अरे हो ! सिधार्थ च नाव काका कसा पडला हा गूढ प्रश्नच आहे..त्याचा झाला असा की पहिल्या वर्षी आम्ही बीसीवर डबा खायला बसलो होतो तेहा काहीतरी झला न तो म्हणल की मी काय काका आहे का? झला एवढा बोलणा त्यावेळी पुरेसा होता त्यानंतर आमच्या ग्रूप मधे आम्ही कोणाला एवढी बोलायची संधी देखील दिली नाही..आधीच नावा पडून ठेवली उदा नाना, अन्द्य.तर सांगायचा मुद्दा हा की तो आमच्या ग्रूप मधला मानाचा गणपती आहे ज्याला नाव पाडल गेला... आता पर्यंतचा सगळा शिक्षण त्याने घरच्या 3किमी च्या रेडियस मधे केला पण ह्या पुढचा शिक्षण करायला हा 3 खंड / कॉंटिनेंट लांब गेला..तसा नोकरी साठी बराच फिरला म्हणजे ट्रेनिंग भुबनेश्वर मग पोस्टिंग कलकत्ता पण तिथे सुधा मराठी एच आर ला मस्का मारुन(मराठी माणूस मराठी माणसा साठी काही करत नसेल कदाचित पण मराठी बाई नक्कीच करते हे कळला ) मुंबई मधे आला न तिथून पुण्यात आला..न "ओवर लॅंप गिविंग लाइट तो नेबर्स हाउस" म्हणत परत सदशिव पेठेत स्थायिक झला..हे वाक्या मुद्दाम लिहिला कारण त्याचा स्वदेस ह्या सिनिमा वर्च प्रेम..आशुतोष गोवारीकारला देखील माहीत नसतील इतके डीटेल्स ह्याने पाहिलेत..गायत्री जोशीचा एका शॉट मधे चहाचा कप डाव्या हातात असतो न दुसर्या आंगल मधे तो उजव्या हातात असतो हे अब्ज़र्व केल्याबद्दलत्याचा विशेष कौतुक... नाटकाच्या ग्रूप मधे तो म्यूज़िक सेक्षन चा बॅकस्टेज म्हणून आला होता आणि जर त्याला ललित नि ठेवून घेतला असता तर सी ओ ई प च्या इतिहासात अशी जागा निर्माण करणारा तो पहिलाच मुलगा न अशा जागेवर काम करणारा हा पहिलाच ठरला असता पण ललित नि त्याच्या इच्छेला प्रोत्साहन देत स्वरुप कडे आणून सोडला न तो नुसताच बॅकस्टेज मधे आला..पण म्यूज़िक वर चा त्याचा प्रेम काही कमी झला नाही..तो एकहाती केबोर्ड वाजवतो (दुसर्या हाताने वाजवायला तो शिकतोय..न मे हे गेले 6 वर्षा बघतोय)..रहमान नि युवा सिनेमात रिक्षा च्या मीटर चा आवाज कसा वापरलाय हे अगदी आत्मीयतेने ऐक्वतो... म्यूज़िक वरचा प्रेमपेक्षा त्याचा खाण्यवरचा प्रेम अधिक जास्त आहे..त्याच्या इतकी सुरेख कंपनी तुम्हाला कोणी डेउच शकत नाही..काही लोका आपल्याला कंपनी द्यायला येतात पण आपल्याच प्लेट मधले खातात(अशी लोका मला बिलकुल आवडत नाहीत पण काय करणार मी पण त्यातलाच एक आहे) पण हा गडी स्वतसाठी वेगळी डिश ऑर्डर करतो...न त्याला जर दुर्या जोशी ची साथ मिळाली तर किस्सा होतो..आम्ही एकदा गोव्याला गेलो होतो..तिकडे नाश्ता करायला एका हॉटेल मधे गेलो..वेळेत न आवरल्यामुळे त्यांना हॉटेल वॉर यायला उशीर झाला..आम्ही डोसा वगेरे ऑर्डर दिली होती..पश्याने मेनु कार्ड मधे सगळ्यात 10 रुपयाची पावभाजी शोधून काढली न दोघही सदाशीव पेठी कोकणस्था ब्राम्हण असल्यामुळे तेच ऑर्डर केला पण ते समोर आलयवर दोघांचेही डोळे बघण्यासारखे होते..वेटर नि भाजी म्हणून बटाट्याचा रस्सा न 1 पाव असा त्यांच्या पुढयात आणून ठेवल ..पण ते सुधा अगदी चविणे खाणारा हा काका...गेल्या काही दिवसात महिन्यात त्याने खाण्यावर आपला लक्षा जास्त केंद्रित केलाय स्मॉकिं जोस चे पीझझा,जॉर्ज मधला चिकन ,बेडेकरची मिसळ ,अजुबत्ल मसाला पाव,सुजाता ची मस्तनी ,कॅड ब ह्या गोष्टींसाठी त्याची ना ज्या व्यक्तीने ऐकली असेल त्याने मला येऊन भेटवे(मी काही करणार नाहीए नुसता येऊन भेटवे..अशी म्हणायची एक पध्धत असते)... असो तर असा हा कायम अक्टीवा स्कूटी असे नॉन गियर गाड्या चालवणार्या मुलाने ने आपला गियर बदलला आहे न शिक्षणासाठी 3 किमी नाही तर 3 खंड (व्हाया लंडन) लांब चालला आहे..त्यासाठी तुला हार्दिक शुभेच्छा !!! आशय
Subscribe to:
Post Comments (Atom)
uttam...!! maja aali wachtana :)
ReplyDeletepan akkha machkur tu wachakanna address kelays ani fakta shevatcha wakya 'kaka' la..mala thoda odd watla!!
Excellent, kaka cha observation uttam ahech, pan tu 6 varsha kaka la kiti observe kelays he lagech kalta!!
ReplyDelete