Thursday, August 13, 2009
हाफ्ता बंद
कोण म्हणता पुरूष रडत नाही?? मी गेले काही दिवस दर बुधवार अन् गुरुवारी पुरूष रडताना बघतोय. झी मराठीवर 'हाफ्ता बंद नावाचा प्रोग्रॅम सुरू झालाय. तसा आधी कौन बनेगा करोडपती,दस का दम, छप्पर फाडके असे अनेक कार्यक्रम सुरू झले न बंद ही पडले..दस का दम चा दुसर पर्व सुरू झाला पण त्यात केवळ सेलेब्रिटीस येत आहेत ..सलमान खान सोबत नाच करतायेट आणि निघून जात आहेत...म्हणजे ज्यांच्या कडे आधीपासूनच कोट्यावधी रुपये आहेत ते केवळ टी आर पी वाढवण्यासाठी येऊन जात अहेत. असल्या प्रोग्रॅम चा सामन्या जनते साठी उपयोग काय ?? "हाफ्ता बंद " हा कार्यक्रम बघितल्यावर सत्या परिस्थिती कळते. गरज लोकांना काय काय करायला लावते हे कळता..अहो 1 कोटी वगेरे खूप लांबची गोष्टा आहे पण लोकांना 1 लाखाचा कर्ज फेडताना सुधा नाकी नउ आलेत...इथे येणारा माणूस त्या होस्ट ला भेटायला किंवा बघायला आला नसून सुखाची झोप घ्यायला येतो...मन्दि च्या काळात नोकरीची गॅरेंटी नसताना घरासाठी घेतलेला 15 लाखाचा कर्ज,नुकताच नवीन लग्ना झालेली जोडपी..नुकतेच पालक झालेल दांपत्या या लोकांनी समाधानाने झोपायचा,लहान मुलान्शि खेळायचा की कर्जाचा विचार करत राहायचा..त्यांच्या जागेवर स्वतःला इमॅजिन करून जरी बघितला तरी अंगावर काटा येतो... चैनी साठी कर्ज घेणारे अनेक लोका आहेत,कार लोन .टॅक्स वाचवण्यासाठी घेतलेला लोन..पण पोटासाठी,आपल्या कुटुंबाला सुखाने झोप लागावी म्हणून घर घेऊन स्वता कर्ज घेऊन रात्रभर जागा राहणार्या माणसा कडे बघून खरच कीव येते..आपण नेहमी आपल्या पेक्षा पुढे किंवा वरच्या पातळीवर च्या माणसा शी आपली तुलना करतो तेव्हा आपल्याकडे काय कमी आहे ह्याची जाणीव होते आणि आपण नेहमी ते मिळवण्या च्या मागे धावतो...ह्या प्रोग्रॅम मधे येणार्या लोकांकडे बघून आपण खरच किती सुखी आहोत हे कळता... ह्या विषयावर अनेक लेख आलेत,पेपर मधे च्ापून आलाय पण रिॅलिटी शो ची खरी गरज कोणाला आहे हे लक्षात आला...स्वाताची विवाहबाह्या संबंध सांगून कुटुंब उधवास्ता करून 1 लाख रुपये मिळवण्यात काय पॉइण्ट आहे?? ते 1 लाख गरजू लोकांना द्या..पुण्या तरी लाभेल...पण पैसा बोलता है बॉस... असले स्फोटक किस्से ऐकून त्याची लोका चर्चा करणार आणि परत परत ते बघणार..कशाला असले लोकांची रडगाणी ऐकत बसतील? कॉन्सेप्ट चांग्लियहे पण झी मराठी गरीब वाहिनी आहे त्यामुळे जिंकून जाणार्यांची संख्या खूप कमी आहे...पण किमान अशा गरजू लोकांच्या मदती साठी कोणीतरी काहीतरी करताय हे बघितल्यवारा खूप छान वाटला..आम्ही आपले घरी बसून लोकांना नुसता नाव ठेवणार..की साध्या प्रश्ना चा उत्तर देता येत नाही..स्वता उठून काही करणा माहीतच नाही आम्हाला...बाहेर स्वाइन फ्लू सुरू आहे...म्हणून आम्ही बाहेर पडायचा नाही..घरी बसून हॉस्पिटल मधे डॉक्टर काय करत आहेत ह्याला नाव ठेवायची...माणुसकी सुधा हप्त्या हप्त्याने बंद होत आहे... आणि मी सुधा फार काही वेगळा करणार नाहीए..ब्लॉग लिहिणार आणि झोपून माझा माणुसकी चा आजचा हाफ्ता बंद करणार...
Subscribe to:
Post Comments (Atom)
a different genre this time..
ReplyDeletea sensitive one...
true to the last word...
but yes i m no different...
i ll write a comment to ur blog and keep it aside assuming a HAFTA delivered by me...!
well written mann...
keep writing..
hey ashay the blog is asusual good!bt different subject and writting style this time!liked it!
ReplyDeletewhen we look at the others then we know that what we are going to is nothing just thank god that we are not going through what others are going.
and while running behind our dreams to achieve something havent ve forgotten to live life?
ditto sarode!!!
ReplyDelete