Thursday, August 13, 2009
मी इंजिनीरींग ला का आणि कसा आलो??
12वी पर्यंत आयुष्य हे घर-शाळा-कॉलेज एवढ्यापुरताच मर्यादित होता. अमुक अमुक टक्के किंवा इतका नंबर मिळवला तर अमुक अमुक मिळेल अशा कंडीशन्स मधे सतत शिक्षण झाल.5वी मधे पहिल्या 5 नंबर मधे आलास तर वीडियो गेम,10वी मधे 80-85 पडले तर सायन्स आणि 12वी ग्रूप मधे 90% च्या वरती मिळाले तर इंजिनीरींग (सुदैवाने सी ई टी भानगड आमच्यावेळी नव्हती आमची लास्ट बॅच होती.) लहानपणा पासूनच मला इंजिनीर् व्हायचा होता असा काही नव्हता काही लोकांचा मी बघितलाय की 8 वीतचठरवला होता की मला इंजी किंवा डॉक्टर व्हायचाय. माझ्या मते अशा लोकांना बाकीचे फील्ड्स नाहीतच नसतात आणि त्यातून 90% लोका ठरवलेल्या प्रमाणे होत्ाही नहित.कमि %मिळाले म्हणून बी एस सी नाहीतर बीकॉम करतात.. असो! मुद्दा हा नाहीए की कुणाला काय वाटताय मुद्दा हा आहे की मी इंजिनीर्ईग ला का अन् कसा आलो?? 9वी मधे असताना सायन्स 2 मधे लाइफ प्रोसेसेस या धड्यांमुळे मी बायोलॉजी घेऊन चीर्फाड करणार्यांमधला नाही (शाब्दिक चीर् फाड अपवाद आहे .तो अगदी व्यवस्थित जमतो) माझ्या मते आपल्याला काय हवाय यापेक्षा काय नकोय हे जर माहीत असेल तर आयुष्या अधिक आनंदात जगता येईल पण जर सगळाच मना प्रमाणे झाल तर मजा कसली?? ह्ंम्म्म्म्म !!! तर 10वी मधे 86% न 12 वि मधे 92% मिळाल्यावर घराण्याचा वंशा चा दिवा पेटला बाबा एकदाचा अशी घरच्यांची समजूत झाली . असो तर गरवारे कॉलेज मधे अड्मिशन घेऊन एन एम, के एम न खाके असे 3 क्लास लावून 12वी पास झालो..12वि च्या बोर्डाच्या परीक्षेला पहिले 2 पेपर खराब गेल्यावर रात्री वर्ल्ड कप ची मॅच बघून दुसर्या दिवशी पेपर चांगला जाणा म्हणजे अविस्मरणीया आनंद .म्हणजे मॅच पण जिंक्लो आणि पेपर ही चांगला गेला (डीटेल्स: भारत वि इंग्लेंड 2003 च्चा वर्ल्ड कप..आशिष नेहर ने उलट्या करून घेतळेलेल 6 विकेट्स न तेंडुलकरची कॅडिक च्या मुस्काटात मारलेली सिक्स खरच अप्रतिम!!!) मला अजुन कळलेला नाही की ह्या महत्वाच्या मॅचस नेहमी परीक्षेच्या वेळेसच का असतात?? कदाचित त्यावेळी सगळी पोरा घरी असतील अभ्यासासाठी त्यामुळे जास्त प्रेक्षकवर्ग मिळेल आणि उगीच शाळा कॉलेज बुडणार नाही..खरच किती काळजी नवीन पिढीची... 2 पेपर मधे 7 दिवसांची गॅप मिळाल्यावर घरच्यांनी नकार देऊन सुधा क्रिकेट खेळायला गेलो आणि एकलव्यसारखा ज्यांनी आम्हाला गणित शिकवला (मित्रापैईकीच) अशा द्रोणाचार्याला माझा उजवा अंगठा देऊन आलो...एकलव्याला अन् त्याचा फॅमिली ला कसा वाटला असेल ह्याची प्रचीती आली..पण हार न मानता तसाच पेपर लिहून परत क्रिकेट खेळल्यावर फाइट मारण्याचा स्पिरिट त्यावेळी पासूनच रक्तात होता ह्याची खात्री नंतर पटत गेली. रिज़ल्ट लागला अन् इंजिनेरींग ला जाण्याइतपत मार्क होते..तो पर्यंत कॉलेजस कुठली हे सुधा माहीत नव्हता..एम आय टी फक्ता ग्राउंड वर क्रिकेट खेळण्यासाठी (काही जाणा टेकडीवर जायचे..त्याचा कारण नंतर कळला)होता त्यामुळे माहीत होता खरी गंमत तर आता सुरू होणार होती..गंमत कसली 'पर्व' 4 जून 2003ला 12 वी चा निकाल लागला अन् त्यानंतर रोज पेपर मधे शिक्षण मंत्रालय आणि कॉलेजस ह्यांनी "आपली आवड" हा प्रोग्रॅम सुरू केल.रोज काहीतरी नविनच.ओप्तिओन फॉर्म कधी मिळणार?, फी किती असणार??,कॉलेज की ब्रांच?? बघता बघता 3 महिने सुट्ट्यांचे 6 महिन्यात रुपांतर झाले. एम आय टी - 72000/- व्ही आय टी-64,000/- असे लॉटरी च्या बक्षिसचे आकडे फी म्हणून पेपर मधे छापून येऊ लागले... सी ओ ई पी हे प्रतिष्ठीत कॉलेज फक्ता ऑप्षन फॉर्म भरणे ह्यासाठीच बघावे लागणार असे वाटले. ह्या कॉलेज चा मला आधी काही कललच नाही. बस कंडक्टर ला विचारला की सी ओ ई पी ला येणार का?? त्या वेळी त्याने 'हाडूक'(समजून घ्या) दिला... पण नंतर शिवाजीनगर चा इंजिनीरींग कॉलेज म्हणल्यावर टायच्या डोळ्यात एक वेगळाच आदर दिसत होता..मी कृष्णा सारखा गीता ऐकणार का असा अर्जुनाला विचारतोय अन् त्यावेळी अहो विचारतय काय सांगा असा म्हणताना पार्थाच चेहरा जसा झाला होता ना अगदी तसा होता... पु . ला. च्या पुणेकरांचा जाज्वल्य अभिमानाचा प्रत्यय मला आला.. पुण्यात फक्ता एकच इंजिनीरींग कॉलेज आहे ..बाकीच्यांना काहीच हक्का नाहीए स्वताहला पुण्यातला इंजिनीरींग कॉलेज म्हणून घ्यायची..पण हा अभिमान आहे की माज याचा उत्तर मला थोड्याच दिवसांनी मला मिळणारेत असा ते कॉलेज मला ओरडून सांगत होता.. पहिल्या राउंडला सी ओ ई पी मधे अड्मिशन ना मिळलल्याने मूड गेला होता पण त्यातला त्यात फी कमी असल्याने सिंहगड मधे अड्मिशन घेतली ..2 आठवडे त्या गडा वर चढलो अन् लढलो.. अक्टोबर उजाडला..6 अक्टोबर म्हणजे माझा वाढदिवस..त्या दिवशी पेपर मधे 4 त्या राउंड ची नोटीस आली होती...निदान त्या निमित्ताने तरी सी ओ ई पी मधे पाऊल ठेवता येईल म्हणून फॉर्म भरायला गेलो..कदाचित सी ओ ई पी नि दिलेली हाक आणि वाढ दिवसाची भेट असेल.. 2 दिवसांनी 8 अक्टोबर ला राउंड होती..काही अपेक्षा ना ठेवता गेलो होतो..बरेच लोका मेकॅनिकल,कंप्यूटर ब्रांच मिळत नाहीत म्हणून परत येत होते..मला त्याच्याशी काही एक घेणा देणा नव्हता..मला फक्ता सी ओ ई पी हव होता... तेव्हा आतून बातमी आली की सिविल, मेटलर्जी च्या जागा रिकाम्या आहेत असा कळला..पण सगळा आरामात झाला तर मग ते सारकारी कॉलेज कसला...ऐनवेळी बोनफाइड सर्टिफिकेट इस अ मस्ट असा त्या ऑफीसर ने मक्खपणे सांगितला..त्यावेळी त्याला 2 ठेवून त्याचा डेथ सर्टिफिकेट त्यालाच द्यावा असा वाटला ...पण अडला हरी .. हातात 1.5 तास होता..लंच टाइम झाला होता..मग मी अगदी तानाजी च्या आवेषात सिंहगडावर चढाई करायला निघालो. सोबत माझी घोरपड (बजाज एम -50). शिवाजीनगर ते सिंहगड कॉलेज दरम्यान केलेल माझा ड्राइविंग कदाचित आदित्या चोप्रा नि बघितला असेल आणि म्हणूनच त्याला धूम ची आइडिया आली असणार... नॅयेट्रोबूसटर्स लावल्यासारखी माझी गाडी पळत होती .किती निस्वारथी पणेपळत होती बिच्चारी .सी ओ ई पी मधे अड्मिशन मिळाली तर मी नवीन गाडी घेईन आणि हिच्याकडे बघणार सुधा नाही हे माहिती असून सुधा पळत होती...अहााह!!! काय ही स्वामिनिष्टा.. राणप्रताप च्या चेतक घोड्या नंतर माझीच एम 50.. सिंहगडावर पोचलो ..तिथे सरदार आणि मावळे जेवण करत होते..नंतर या असा सांगितला..पण मी सुधा अमिताभ चे सिनेमे बघितले होते..थेट प्रिन्सिपल च्या कॅबिन मधे घुस्लो आणि बोनाफआइड सर्टिफिकेट घेतला..आणि धूम 2 सारखा रिटर्न सी ओ ई पी मधे आलो.. अड्मिशन घेतल्यावर लोकांचा बघण्याचा दृष्टीकोनाच बदलला .."काय करतोस??", "इंजिनीरींग "-मी .समोरचा -"बर,कुठे?" मी-"पुण्यात" , ते- "अरे वा!!"पुण्यात कुठे??, मी- "इंजिनीरींग कॉलेज,शिवाजी नगर", ते-" काय सांगता,भारीच !!!" असे 3 डिग्री 3 वाक्यातून ऐकायला मिळाले.. आणि मग 10 ओक्टॉबेरला एका महान पर्वाची, कुणाचीची पर्वा न करता सगळ्या गोष्टी अगदी परवा घडल्यासारखा वाटणर्या गोष्टींची सुरूवात झाली..........
Subscribe to:
Post Comments (Atom)
wat an awesome post mannn...
ReplyDeleteNUMERO UNO for sure....!!!!!
awesome description of bona fide case..
and M 50 thing...hehe...
and EKALAVYA thing was awesome....
LMAO...!!!
layeeee bharrrriiiii...!!!!
dude keep writing......!!!!
bhari jamalay
ReplyDeleteghorpad part best ahe re.....
awadla\..
ani punyat ekach clg
bhari ahe idea...
keep it up..
Sahi lihilays...M-50 chya Nitroboostersni maja aanli! :)
ReplyDeleteShevatcha wakya tar agdich jamlay!!