Wednesday, August 12, 2009

"सी वाय जी" एका जत्रा….

काही वर्षांपूर्वी नवरात्रीत चतुर्षिंगी च्या जत्रेल ना चुकता जायचो…पिपाण्या,ट्परीवरची 15 रु ची पावभाजी,ज्वेलरी न पूर्ण कपड्यातली ममता कुलकर्णीचे रस्त्यावर विकायला ठेवलेले पोस्टर्स..न ते पोस्टर्स बघ्याला जमलेली गर्दी…अगदी नीट आठवतय..पण आता त्याच रस्त्यावर आइ सी सी चे ट्रेड टवर्स उभे राहीले..ममता कुलकर्णी ऐवजी आम्ही कमीत कमी कपडे जसस्तीत जास्त किमतीत विकतो हे दाखवणारे बिपाशा बसू,दीपिका चे पोस्टर्स लावणारे पिरमिड्स,क्रॉसवर्ड ची दुकाना सॉरी माल्स उभी राहिली..न त्यातच माझा ऑफीस असल्यामुळे..अजूनही ती पोस्टर्स बघायची हौस गेली नाहीए..असो..मला इकडे जॉइन होऊन 1 वर्षा झला..जॉइन झालो तेव्हा एका मोठा एल सी ड डिसप्ले वर कसला तरी काउंटडाउन सुरू होता..324 डेज़ तो गो न एका वाघोबा चा चित्रा होता..त्याचा नाव ‘जिगर’ असा काहीसा होता..ते नक्की जिगर आहे की स्पेलिंग मिस्टेक झलिये हे अजूनही काळळलेला नाहीए(पुणेकरांच्या इंग्रजी बद्दल मला पूर्णा कॉन्फिडेन्स आहे...)...तर मुद्दा हा की काही दिवसांनी कळला की पुण्यात 12-18ऑक्टोबर 2008 ला सी वाय जी होणारेत न त्याचा हेड ऑफीस आइ सी सी आहे.. एक वर्षा गेला न ऑफीस मधळ्यांनी टीम आउटिंग म्हणून सी वाय जी ला जायचा प्लान काढला..माझी आधी इच्छा नव्हती पण मग नंतर जाउयात म्हण ला तसही ऑफीस मधे बसून जी मेल न तेच रियलाइज़ेशन चे मेल वाचण्यात काही अर्थ नव्हता… अखेर तो दिवस उजाडला..ऑनलाइन बुकिंग केला..आधी खरतर लेडीझ स्वींमिंग चा शेड्यूल ला जाणार होतो पण त्याचे टिकेट्स 500रु होते सो जरा आवर घातला..आयुष्यात सगळ्याच गोष्टी बघायला मिळत नाहीत ह्याचा प्रत्यय आला..वमेन्स इवेंट सॉरी लेडीझ/गर्ल्स इवेंट अजुन कुठले आहेत का ते शोधत होतो(युथ गेम्स मधे बायका म्हणणा बरोबर वाटला नाही)..फाइनली बर्‍याच सर्च नंतर लेडीझ+ टेन्निस न तेही डबल्स दिसल्यावर सगळ्यांनी एकमताने त्यावर शिक्का मोर्तब केला… दुपारी 2 वाजता आमची स्वारी निघाली.. PMच्य कार मधे त्येही त्याच्या शेजारी बसून गेलो..बरीच कसरत करून पार्किंग पासून स्टेडियम पर्यंत बस मिळाली..मला खरच पी एम टी बद्दल खूप वाईट वाटता ..त्यांच्या नशीबी कायम गर्दीच लिहिलेली आहे..तीच लोंबकॅलणारी मान्सा..फरक फक्ता एवढाच होता की ह्यावेळी बस मधे सगळ्या क्लास ची लोका होती…”डॅड आर वी गोइंग टू द सेम स्टेडियम व्हेर द ओपनिंग सेरेमॉनी वाज़ हेल्ड?” पासून “अप्पा मला त्यो धावाधावीचा खेळ बघ्याचाय” म्हनणारी लोका दिसली. फॉरेन नर न फॉरिन मादी पण होतेच आधून मधून…न आधून मधून दिसणार्‍या फॉरिन मदिन कडे आम्ही साारखे सारखे बघत होतोज़… फाइनली आम्ही स्टडीउमच्या एंट्रेन्स पाशी पोचलो..शिवाजी महाराजाचा आश्वारूढ पुतळा बघून धन्य वाटला..कदाचित ते आज जिवंत असते तर त्यांनी देखील हॉर्स राइडिंग न स्वॉर्ड फाइटिंग मधे नक्कीच रेप्रेज़ेंट केला असता…1-2 मेडल्स तर नक्कीच जिंकले असते.. .”.पुण्यनगरीत आधी होते शिवाजी न आता आहेत सी वाय जी” वाईट आहे पण चालता तेवढा… टिकिट काउंटर वरुन आम्हाला टिककिट्स कलेक्ट करायचे होते..तिकडे गेल्यावर..रस्ता..रस्ता कसला मोटो क्रॉस चा ट्रॅक होता तो..पण इवेंट कॅन्सल झल्या मुळे(अंडर 18 ला ड्राइविंग अल्लौड नसता हे नंतर लक्षात आला असेल ओर्गनािझेर्स च्या) असेल कदाचित तिथेच टिकिट काउंटर उघडले होते..10 वर्षा पुर्वी चतुर्षिंगीच्या जात्रेला एंट्री टिकिट काढताना जो अनुभव यायचा अगदी तसाच आला..घाणएरडया हॅंडराइटिंग मधे 50रु टिकिट सोल्ड आउट लिहिले होते.. मजा म्हणजे जिथे गावकडील पब्लिक ची गर्दी होती तिकडे इंग्लीश मधे नोटीस होती न जिथे फॉरिनर्स जायचे तिकडे मराठी मधून अनाउन्स्मेंट होती…आहे की नाही पुणे भारी.. असो आम्ही आत मधे गेलो..मोबाइल वागेरे सगळा बाहेर ठेवला होता..सो जगाशी काहीच कॉंटॅक्ट नव्हता कारण सारा जगच तिकडे जमला होता..आधी एका टेन्निस कोर्ट मधे गेलो तर तिकडे नायजेरिया विरुध न्यू झिलँड अशी ब्लॅक अँड व्हाईट मॅच सुरू होती..पण समोर एका इनडोर स्टेडियम मधून शिट्ट्यांचा आवाज ऐकू आला..त्यावरून कळला की आत मधे आपलाच पब्लिक आहे..आत गेलो तर भारत वि इंग्लेंड टेन्निस लेडीझ डबल्स सुरू होती..पहिला सेट जिंक्लो..पब्लिक फुल्ल शिट्ट्या मारत होता..शेवटी तो रेफ्री इतका भडकला की उठून बडवतो की काय असा वाटला…पूर्णा मॅच नाही बघता आली..ऑफीसला यायचा होता..भारत जिंकेल ह्या अशेने आमी निघालो..पुन्हा तोच पर्तीचा प्रवास..तेच मोटो क्रॉस चे रस्ते.. सहजच बाजूला लक्षा गेला तर एका मोकळ्यावर मैदानावर निवांत पणे क्रिकेट खेळणारी पोरा बघितली न पु लांच्या पुणेकरच्या जाज्वल्या अभिमानाला जपणर्‍या पुणेकरांना ह्या पुणेकरचा सलाम करून तिथून निघालो…निघताना एक विचार डोक्यात आला . पुण्याच्या जग्प्रस्सिध अशा 2 गोष्टी होत्या.. 1) बाकरवडी (चितळेनचीच) 2)हींजेवडी न आता त्यात अजुन एकाची भर पडली..अं ती म्हणजे "बालेवाडी"

1 comment:

  1. Not just another "NIKHAL MANORANJAK" post by u..
    amazing stuff...
    mamata, bipasha, race track, and FOREIGN NAR & FOREIGN MADI is tooooooo gudd...!!!
    awesome..

    looking forward for ur next post...!

    ReplyDelete