Wednesday, November 2, 2011

'MEN’tality !



आज दिवाळी पहाट..आणि मी एक अस्सल पुणेकर असल्याच कर्तव्य पूर्ण करण्यासाठी पहाटे ४.३० ला सारस बागेत आलोय...तस मी गेले ४ वर्ष इथे येतोय..पण आज विशेष होता...
आलो त्या वेळी अजून अंधारच होता ...पण एक वेगळीच प्रसन्नता होती वातावरणात ..सगळीकडे पंत्यानंचा एक नेत्रदीपक असा अविष्कार पाहायला मिळत होता ..कोणी त्या पणत्यांनी एक ोठी पणती बनवली होती तर कोणी त्यांचा आकाशकंदील केला होता ...कोणी शुभ दीपावली लिहिला होता तर कोणी "मेरा भारत महान !" (का ते माहित नाही ).जवळच एक stage बांधला होता आणि काही वेळातच मराठी ाण्यांचा कार्यक्रम सुरु होणार होता ...त्या रोषणाई मध्ये अत्तरांचा
सुगंध दरवळत होता ...एरवी deo च्या वासाची वय झालेल्यांना अत्तराचा सुगंध म्हणजे रोज chicken burger खाणार्यांना अस्सल गावरान कोंबडी चा वास येण्यासारखा आहे ..डोळे अपोआप बंद होतात आणि तो वास मेंदू मध्ये फीड होईपर्यंत घेत राहतात ..एक वेगळीच सुचीर्भूतातता ,प्रसन्नता ...तसाही अंधार असल्यामुळे डोळ्यांचा काही उपयोग होत नव्हता ..साधारण तासभर त्या रोषणाईत फिरून झाला होता ...
त्या stage वरून एक निवेदन झाला आणि गाण्याचे स्वर कानावर ऐकू येऊ लागले ...श्रीधर फडक्यांचा " तुला पहिले मी नदीच्या किनारी ...तुझे केस पाठीवरी मोकळे " ..
शब्द कानावर पडताच ..डोळे अजून घट्ट बंद झाले आणि एक वर्ष मागे गेला ...आठवणीत !...


अशीच एक दिवाळी पाहत होती गेल्यावर्षीची ...असाच मी पाहते 5.३० ला आलो होतो ...मित्रांनी एकाच गोष्ठी चा आमिष दाखवून मला सरस बागे पुन्हा बोलावला होता ..मी अत्यंत नाराजी ने आलो होतो . .अंधारात मला काही दिसत नव्हता ...मी as usual वेळ पाळणारा असल्यामुळे आपल्या मुळे उशीर नको व्हायला म्हणून दबंग स्नान उरकून येऊन बसलो होतो ..पण कोणीच आलेला नव्हता ..त्यामुळे चीड चीड झाली होती ..नुसता बसून तरी काय करायचा म्हणून ते दिवे पाहत
जांभया देत फिरत होतो ..शेवटी एका ठिकाणी येऊन थांबलो ..तासभर झाला तरी अज्जून कोणाचा पत्ता नव्हता ..जवळच बांधलेल्या stage वर mic testing चा कर्कश्य आवाज येत होता .. मानसिक त्रासात अजून भर पडत होती ...तसा मी रागावर नियंत्रण ेवायला शिकलोय ..नाहीतर 3 वर्ष एकाच IT कंपनी मध्ये काम नसतो कर शकलो ... छान झोप सोडून ,मित्रांच्या आमिष पोटी मी इथे single मुलगा पाडव्याला जिथे maximum जोडपी येतात अशा ारसबागेत येऊन उभा होतो .. mic testing चा आवाज अजून वाढल्याने मी डोळे मिटले आणि कान पण बंद केले ..काही क्षणातच एक गाणं सुरु झाला .."तुला पहिले मी नदीच्या किनारी ...तुझे केस पाठीवरी मोकळे .." जरा सुसह्य वाटला म्हणून आधी कानावरचा हात काढले .अंधाराची जागा आता प्रकाशाने घेतली होती ..उजाडायला लागला होता ..एकदम उजेड झाल्यामुळे डोळे पटकन उघडले नाहीत ...हळू हळू डोळे उघडले तर समोरच 3-4 मुलींचा घोळका उभा होता ...त्यातली एक माझाकडे पाठ रून उभी होती आणि बाकीच्या तिच्या शी बोलत होत्या ..त्यामुळे centre ऑफ attraction तीच होती ..तिचे केस लांब होते आणि मोकळे सोडलेले होते ...सलवार
कुर्ता होता ..मोरपंखी रंगाचा ...तिचा चेहरा पाहण्याची इच्छा झाली ...न काय आश्चर्य ..दुसर्या क्षणी ती मागे फिरली माझा कडे पाहून हसली
hi ! केला ...मला काही सुधरलाच नाही पण प्रसंगावधान राखून मी ुधा हसलो ! पण सकाळी लवकर यायच्या नादा brush करायचा राहून गेला हे आठवल्या क्षणी मी माझा हसणं थांबवला ..न तोंड बंद केला .. बाल
हनुमानासारखा चेहरा करून उभा राहिलो ..पण नंतर माझा तल्लख बुद्धीने मला " अरे एका दिवशी दात नाही घासले तर दात लगेच पिवळे होत
नाहीत !" असा सुचवल्यावर माझी बत्तीशी पर बाहेर काढली ...हे झाल्यावर मी आता Hi ! साठी माझा हाथ उचलणार इतक्यात माझ्या मागून एक मुलगी आली आणि तिने
त्या समोरच्या ललनेला मिठी मारली ...माझा हत्ती झालाय हे माझा लक्षात आले
(हत्ती म्हणजे मोठा पोपट होणे !!)..मी पटकन मान खाली घातली आणि खिशातून mobile बाहेर काढला त्यावर उगाच buttons दाबत बसलो (आपण busy आहोत किंवा काहीतरी msg आलाय हे उगाच दाखवण्यासाठी !)... मी खालीच पाहत होतो ..mobile
च्या screen वर ..पण आता मला तिचा चेहरा त्यात दिसत होता ...मी डोळे मिटून परत उघडले तरी तेच ..mobile पण switchoff करून पहिला तरी तेच ...मला काय झालाय हे समजायल फार वेळ नाही लागला ...लांब केस (माझे विसकट लेले ), टप्पोरे डोळे (मला चष्मा ),उंची 5'4" (मी 5'10"), सडपातळ बांधा (मी एकदम fit पण थोडासा पोट सुटलेला ), चेहऱ्यावर हसू (मी बाल हनुमान ) ,रंग गोरा (मी पण जन्मता गोरा पण उन्हात cricket खेळून जर करप्लो होतो )..थोडक्यात मला suit होणारी मुलगी मला सापडली होती ...मी लग्नाच्या वयात आल्यामुळे माझात आपोआपच confidence आला होता ..मी उत्साहाने वरती पहिला तर तो फुलांचा गुच्छ ज्यातली एक माझी निशिगंध आणि बाकीच्या तिच्या हिरव्या पाला पाचोळ्या होत्या त्या गायब झाल्या होत्या ....माझी नजर सैरभैर फिरत होती ...
सापडली!!...तो गुच्छ गणपतीच्या दर्शनासाठी पायर्या चढत होता ..माझे मित्रा अजूनही आले नसल्याने मी त्यांच्या मागे ेलो ..मागे फुलले रे क्षण
माझे गाणं सुरु झाला होता ..
मी गणपती ला flying नमस्का केला पटकन त्याला प्रदक्षिणा मारायला सुरुवात केली ...हा गणपती मला फारच आवडला होता ..त्याच्या देवार्याला खिडक्या होत्या ..मी माझा speed असा match केला होता कि समोरून दर्शन घेताना
ती समोरच्या खिडकीत दिसत होती ..मी डावीकडे गेलो तेव्हा पण माझा स मोरच्या चौकटीत दिसली ..आज मी उजव्या सोंडेचा गणपती डावीकडून पहिला ...असा करात तिच्या मागे येऊन थांबलो गणपती ला front view मध्ये आम्ही एकत्र दिसू अशा pose ध्ये थांबलो ..न मनोमन हि प्रार्थना केली कि पुढच्या वेळी जोडीने येउदेत म्हणून ...

ती आता खाली उतरायला लागली होती ..मी नेमके sport shoes घातल्यामुळे माझी कसरत झाली ..बुटांची lace सोड्याची सवय इथे नडली ..कसे बसे ते पायात अडकवून मी खाली पळत आलो ...त्यांच्यामागे पळत जात असतानाच मित्राची हाक ऐकू आली .."कुठे पळतोस रे ???" आता काय उत्तर द्यावा ह्या विचारात मी "शाळेतला मित्र दिसलाय ! त्याला भेटून येतो "अशी थाप मारली ..मुळात १२ वर्षांनंतर मी शाळेतल्या एकही मुलाला ओळखू कलो नसतो ...पण अशावेळी शाळेतला मित्र हा उत्तम उपाय आहे हे लक्षात आला ..त्यातून मी अत्यंत मट्ठ बोरिंग होतो शाळेत त्यामुळे मला पण ओळखेल असा कोणी नव्हता ..

मी त्यांच्या मागे गेलो खरा पण ती काही दिसेनाशी झाली ...थोडा हिरमुसून परत मित्रांपाशी आलो .." भेटला का रे मित्र ?"..
मी : " नाही रे ..तसा वाटला मला .."असो अरे नवीन SLR वाटता ! दिवाळी खरेदी का ?" मी त्याच्या नवीन camera कडे बघत म्हणालो ..
" हो अरे ..म्हनला आज जरा मनोहर दृश्य बघायला मिळतात ..म्हनला फोटो काढावेत "
"अरे माकडा थोडा आधी आलास तर काही बिघडला असतास का ??"(मी मनातल्या मनात )

असा म्हणे पर्यंत पुन्हा ती दिसली ..माझ्या मित्राच्या मागे ..मला काय करावा सुचेना ..मी पटकन मित्राला त्याचा कॅमेरा मागितला ..आणि त्याला pose द्यायला सांगितली ..त्याला FB वर profile pic चा आमिष दाखवून माझ्या निशिगांधला आणि माझा ओबड -धोबड विखुरलेल्या मित्राला एका frame मध्ये capture करायचा ठरवला ..निदान photo तरी मिळेल ह्या आशेवर मी photo click केला ..पण तिचा
नेमका अर्धा चेहरा आला ..डोळे आणि तरतरीत नाक ...परत काढायचा म्हणलं तर तो ओंडका माझा कडे धावत येऊन आपला FB चा फोटो पाहायला लागला होता ..त्यामुळे 2nd click शक्य नव्हता ..internet वर एखादा software असेल कि फोटो फीड करून नाव कळेल ह्या आशेवर मी कॅमेरा मित्राला दिला ..

सकाळचे 8.30 झाले होते आणि मित्रांनी निघायची तयारी सुरु केली ..तो गुच्छ पण आता निघणार होता ..मी त्यांच्या मागे जायचा ठरवला ..पण मित्रांनी ज्या गोष्टीचा आमि मला दाखवला होता त्याची आठवण करून दिली --"बेडेकरांची मिसळ !!" 8 ला सुरु होता ..पण मी त्यांना म्हणलं कि तुम्ही पुढे व्हा number लावा मी येतोच ...

मी माझा निशिगंधाच्या मागे जाऊ लागलो ...ती गाडीवरून सहकारनगरला जाऊ लागली ..ह्या area मध्ये चांगल्या मुली राहत असतील अशी माझी समजूत झाली .मी स्वतावर खुश होऊन आरशात पाहून केसांमधून hero सारखा हाथ फिरवू लागलो .पण ती अचानक कुठल्या तरी गल्ली मध्ये वळली आणि मी तिला शोधात राहिलो ..अर्धा तास फिरत होतो पण काहीच काळात नव्हता ..तेवढ्यात phone वाजला ..." मिसळ संपत आलीये !!" एवढा एकच वाक्य बोलला ेला मी गाडी वळवली ...

त्या दिवसानंतर मी बरेच दिवस coffee प्यायला relaxe मध्ये येऊ लागलो ..कोथरूड ला राहत असून देखील दुर्गा च्या ऐवजी मी relaxe मध्ये आलो ...

हे सगळा डोळ्यापुढून जात होता तेवढ्यात mic चा कर्कश्या आवाजाने भानावर आलो ...डोळे उघल्डे तर उजाडायला लागला होता ...माझी नजर पुन्हा सैर भैर फिरू लागली .ती दिसतीये का शोधू लागलो ...
वर्ष गेला होता ...बराच काही घडला ह्या वर्षात ...दिवाळी नंतर ५ महिने US ला onsite जाऊन आलो ..आल्यावर तिला शोध्य्नासाठी परत त्या relaxe मध्ये जात होतो ..एकदा मित्रासोबत कॉफ्फी पीत असताना एका लांबच्या काकाने मला पहिला ...आणि त्याच्या भाची करता माझा स्थळ सुचवला ...आई -बाबांना ती आणि तिला मी आवडलो. असा दुघ्धाशार्कारयो जुळून आल्यामुळे माझा लग्न उरकून टाकण्यात आला ..

" चला देवळात जाऊयात ?" बायकोच्या ह्या प्रश्नाने मी पुन्हा भानावर आलो आणि मान हलवून उत्तर दिला ..
माझी नजर अजूनही तिला शोधात होती ...गणपतीने माझी मनोकामना गर्दी मुळे नीट ऐकली नसावी ..त्याने जोडीने मला बोलावून घेतला पण जोडीदार वेगळी होती ...असो हरकत नाही ... मी खाली येताना परत तिला शोधात होतो ..कुठे दिसतीये का माझी रजनीगंधा ...

" कोणाला शोधताय ? मी मगासपासून बघतीये तुम्ही काहीतरी शोधायचा प्रयत्न करताय ? कोणी येणार होता का ? "

" होय ...शाळेतला मित्र !!!" मी एवढा बोलून खिशातून माझा mobile काढून त्यात पाहू लागलो ....

afterall men will be men!!!

8 comments:

  1. surekh, i thgt this was going somewhere, but was a bit dissappointed on realising that it was a fictional story! tumcha svatahcha anubhav asta tar vachayla maja ali asti ;)

    by the way, some references did strike a chord...read on -
    1) attar ani deo chi comparison!
    2)"tula pahile mi" hya ganya cha honara effect...kamaal keli ahe phadkenni!!
    3)camera vala mitrala "ondka" mhanne - tujha koni Onkar navacha mitra ahe ka?? jo camera mirvat baki group madhlya lokanche foto kadhaycha??? uncanny resemblance in that reference bro!!!

    overall - aprateem lekhni..soppi bhasha..vachtana agdi thet sarasbaget gheun geli...ani tujha "nishigandha" chi end paryanta "rajanigandha" zali he odd pan nahi vatla!! :)

    ReplyDelete
  2. Hello Ashay,

    Got to know about this post from Ketki Pathak's FB comment and it would have been contempt of your writing had not left a comment.

    Very nice writing. The flow is just too good.... and frankly as opposed to Ninad, I actually liked that you didn't end the story with some cheesy ending.
    The sprinkled humor keeps up to its responsibilities! Excellent piece of writing.
    Keep it up.

    -Shridhar

    ReplyDelete
  3. मस्त रे!

    लग्नाचे वेध लागलेत आता साहेबांना...कळतंय..कळतंय!! :)

    ReplyDelete
  4. Ek Number re Mitra..... Once again.... Ekdum "Dil Ho chu Lene wala" Vishay... mala ekdum ya warshiche padwa pahat atavale!!! hehaha!!!!!

    ReplyDelete
  5. :) छान लिहिलंयस..
    'एरवी deo च्या वासाची सवय झालेल्यांना अत्तराचा सुगंध म्हणजे रोज chicken burger खाणार्यांना अस्सल गावरान कोंबडी चा वास येण्यासारखा आहे '!!
    आणि 'मी गणपती ला flying नमस्कार केला..'!! फारच आवडलं! जियो!!!

    ReplyDelete
  6. nehmipramane chhan lihilaye...
    pan shevat changla expect karat hoto...
    mala watla kaahi aahe ki kaay bua....
    aso...
    MEN aslyacha nirmal aanand milala...
    barra watla khup diwasanni tujhi post baghun...
    keep it up..

    ReplyDelete
  7. Ajun ek chhan post...I think u have changed ur writing style haan!!! gud one man. chhan ahe.
    kahi kahi goshti khup chan hotya - sagalyat awadaleli goshta mhanaje diwali pahat chi athavan karun dilis...its been 4 years i haven't attended it!
    :(
    baki bharich!

    ReplyDelete